....आणि मी माबोकर झालो

Submitted by शापित गंधर्व on 2 November, 2011 - 07:00

दोन एक महिन्यापुर्वीची गोष्ट. एका मित्राने चेहरे पुस्तकात त्याच्या लडाखः ट्रिप चे प्रचि टाकले होते. प्रचंड आवडले मला ते प्रचि. मग अधिक माहिति आणि प्रचि मिळवण्यासाठी "गुगल" देवाला साकडे घातले आणि गुगल देवाने आमच्या पदरात (म्हणजे स्क्रिन वर हो..तुम्हि पण नाsss...) टाकली एक अनोखी लिंक. आपल्या "पक्का भटक्या" च्या "उदंड देशाटन करावे ... लडाख" ची लिंक. अप्रतिम लेखनशैली आणि तितक्याच अप्रतिम प्रकाशचित्रांनी भारावुन गेलो. तब्बल १६ भाग. सगळे च्या सगळे एका बैठकीत वाचुन काढले राव. सगळेच भाग भन्नाट.

पण अजुन पोट भरल नव्हतं. मग सुरु झाली माबो ढुंडो ढुंडो मोहिम. नवीन लेखन, हितगुज, गुलमोहर, लेखमालिका, रंगीबेरंगी सगळी कडे फिरुन आलो आणि जाणिव झाली ती अलीबाबाची गुहा सापड्ल्याची. जादुगाराच्या पोतडीतून काय वाट्टेल ते बाहेर पडावं तसं कथा, कादंबर्‍या, कविता, गझल, विनोद, प्रकाशचित्र, उखाळ्या-पाखळ्या, सांत्वनाचे शब्द, मोलाचे सल्ले आजून किती नि काय काय सापडत होत माबो वर.

गेल्या पाच वर्षांपासून भारता बाहेर असल्यामुळे मातृभाषेला दुरावल्याची जाणीव माबो ने एक क्षणात दुर केली.

अपवाद वगळता सगळं साहित्य लेखन तर चांगल होतच, पण जास्त मजा आली ते प्रतिसाद वाचुन. बरेच "पु.ले.शु." म्हणत उत्साह वाढवणारे तर काहि कान उघडणी करणारे. पण सगळेच मनापासुन.

लेखन तर लेखन, सगळे माबोकर पण भन्नाट. जगाच्या या टोकापासुन त्या टोकापर्यंत पसरलेले. आपल्या मातृभाषेच्या पाउलखुणा जगाच्या कानाकोपर्‍यात उमटवणारे. बर हे माबोकर नुसतेच व्हर्चुअल नाहित तर चक्क हाडामांसाचे. गटग करुन एकमेकासं भेटणारे. वविची मज्जा लुट्णारे. एकमेकांची सुखःदुखः शेअर करणारे.

इतक्या वर्षात आपण काय काय मिसलं याचि जाणिव मनाला चटका लावुन गेली. म्हटल आता बास झाल. जे मिसलं ते मिसलं आत आण़खी नाहि मिसणार. लगेचच माउस पाँईटर "सद्स्य प्रवेश" कडे सरकू लागला .... आणि मी माबोकर झालो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शापित गंधर्व.. खूप छान लिहिलंयस
सर्वांचे अनुभव जवळ जवळ सारखेच आहेत. मलाही नेट वर संचार करताना अगदी अभावितपणे सापडली ही साईट आणी सर्व लिखाण वाचता वाचता किती वेळ झाला याचं भानच राहिले नाही..
मायबोलीचे व्यसनच लागले आहे असे म्हटले तरी चालेल, नाहीतरी ह्या परक्या देशात आपल्या देशाचा अनुभव करवुन देणारे दुसरे साधन तरी कोठले आहे म्हणा>>>१००००..अप टू इन्फिनिटी % अनुमोदन.
माझा नवरा तर म्हणतो कि मी आत्ताचं आडनाव बदलून 'मायबोलीकर' हे आडनाव रजिस्टर केलं पाहिजे Lol

मी काही दिवसांपासून लेखण करत होतो. मुख्यतः फेसबुकवर मग एका मित्राने ते ब्लॉग वर टाकले. माझे ब्लॉग लेखण सुरु झाले. एकदिवस ब्लॉगवर कुठून कुठून लोक आपला ब्लॉग पहातात हे पहिले तर कानोकानी वरून काहीजण आल्याचे दिसले. तिथे गेलो तर माझ्या ब्लॉगची लिंक दिसली व डॉक्टर आंबेडकरांनवर मी लिहिलेल्या लेखाचा मचकूर ......मग मी सदस्य झालो व माझा पुढचा लेख विनोबांना वरील इथे लिहिला ....व मी मायबोलीकर झालो .....सद्या मजा येते आहे. थोडा नवीन आहे. चू.भू. क्ष.अ

मी तर एवढा प्राचिन आहे की आता आठवतच नाही मी मा.बो. कडे कसा वळलो. पण सुरुवात मात्र नाशिक पानावरन झाली होती. एवढंच आठवतय ! Happy

मी तर एवढा प्राचिन आहे की
>> ट्वाळ तु एवढा प्राचिन आहे की तुला बहुदा 'लोथल' मधुन शोधुन कढला आहे भारतियांनी... Wink

ए त्या निमित्ताने आईने अकबरी परत वाचले व हहपुवा.
असल्या शॉर्ट फॉरम्स चा पण एक बाफ इथे आहे जरूर वाचा. माबो गीत ऐकले कि नाही. खूप छान आहे.

ए त्या निमित्ताने आईने अकबरी परत वाचले व हहपुवा>>> हो अरे. खरच जबरी होत ते प्रकरण. दिनेशदांनी लिंक दिली होती Happy

छान लिहिलय Happy
आवडलं
मी विशाल दादा मुळे माबोकरिण झालेय हे आता सगळ्यांना माहित झालय जवळपास
ज्यांना माहित नव्हतं त्यांना आता माहितं होईल
पण आता विप्रो सोडुन इथेच ड्युटी करतेय Proud

पण सगळे इथे का लिहितयेत ते माबोकर कसे झाले त्याचा वृतांत? Uhoh

आईने अकबरी ची लिंक आज मी प्रथमच वाचली. खरच अशक्य आहे काही केल्या हसू आवरूच शकत नाही. मला वाटत ह्या निखळ विनोदाचा आनंद फक्त मायबोलीवरच मिळू शकतो. ह्यातच मायबोलीच वेगळेपण दडलेलं आहे.

माझी मायबोलीची ओळख झाली ती २००५ मध्ये. सुरवातीला University dorm वर खूप एकटे पण जाणवायचं. कुणाशीतरी प्रत्यक्ष मराठी बोलाव, काही चांगल मराठी वाचयला मिळाव ह्याचा शोध घेता घेता माझी आपल्या मायबोलीशी ओळख झाली. पण सुरवातीला मी सदसत्व न घेता फक्त वाचत होते अधून मधून.

मायबोलीवर लिहिणार्यांच बहुतेक सगळ्यांचंच मराठीवर खूप चांगले प्रभुत्व आहे. त्या मुले मला बरीच वर्ष लागली मायबोलीवर मी सुधा मराठीत लिहू शकते हा आत्मविश्वास मिळवायला. अजूनही माझी हिम्मत फक्त प्रतिक्रिया देण्या पर्यंतच आहे पण आत्ता विचार करते आहे लवकरच काही तरी लिहाव मायबोलीवर. आत्ता मायबोलीवर लिहायला दडपण नाही येणार कारण माझ्या चुका दाखवणारे आणि माझा उत्साह वाढवणारे सगळेच आपले मायबोलीकर असणार न. म्हणून मग राग नाही येणार उलट अजून चांगल मराठी वर प्रभुत्व मिळवणार!!!

आत्ता मायबोलीवर लिहायला दडपण नाही येणार कारण माझ्या चुका दाखवणारे आणि माझा उत्साह वाढवणारे सगळेच आपले मायबोलीकर असणार न. म्हणून मग राग नाही येणार उलट अजून चांगल मराठी वर प्रभुत्व मिळवणार!!!>>> नक्किच अनन्या. तु म्ह्टल्या प्रमाणे हेच मायबोलीच वेगळेपण आहे Happy

तुझ्या लेखना साठी शुभेच्छा!!!

ओह म्हणजे तू दोनच महिन्यांपुर्वी आलायस का....सही मग लगेचच रुळलास्...तसंही तुझे गंधर्वलोकीचे फोटु पाहिले की काय त्रास देणार नं उगीचच...
माझा पण आय डी जरी जुना असला तरी आजकाल वेळ मिळायला लागलाय म्हणून असते पडीक इथे पण..
अवांतर इथले बरेच जणांचे लेख मी त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावरही पाहिलेत पण मदत्/माहिती मागणे आणि ती मिळणे हे मला इथं जास्त आवडतं.....:)

मी सुद्धा मा. बो. चा. नियमित वाचक आहे. काही सुद्धा मिस होऊ नये म्हणून गूगल रीडर मध्ये लिंक टाकून ठेवली आहे.

http://www.google.com/reader/view/feed/http%3A%2F%2Fwww.maayboli.com%2Fg...

RSS फीड मुळे काहीही नवीन आले की चटकन समजते.

छान लिहीलय Happy आता तुमचे परदेशवास्तव्याचे अनुभव जरुर मान्डा इथे Happy
(अन देशात परत याल तेव्हा न विसरता माझ्यासाठी तिकडली चिल्लर घेऊन या! Proud )

अन देशात परत याल तेव्हा न विसरता माझ्यासाठी तिकडली चिल्लर घेऊन या!
>>> आम्ही आलो होतो भाउ.. पण आपली भेट राहुन गेली.. Wink

मस्त लिहिलेय.. मलाही अशीच अचानक गुगलवरच सापडली होती मायबोली.म्हणजे २००५ मधे.. दिशा०१३ ह्या नावाने मायबोलिकर झाले होते.
मधे मधे केवळ वाचन सुरु ठेवु शकले,आता परत नवीन पासवर्ड घेवुन एन्ट्रि..

मला आज अजिबात आठवत नाही की आंतरजालावर भटकेगिरी करताना मी इथे कशी पोहोचले. या भुलभुलैैय्यात इतकी गुंगून गेले की परतीचा रस्ता पार विसरले Happy
४वर्षंाहून अधिक काळ वाचनमात्र राहिल्यावर नुकतीच मायबोलीकर झाले

मला मराठी वाचनाची आवड असल्याने माझ्या नवऱ्याने मला मायबोलीची ओळख करून दिली, काही वर्ष मी फक्त वाचक होते, नवरा सांगायचा मला सदस्य हो पण मी कंटाळा करायची पण डोंबिवली बाफ वाचून मी त्यावर लिहायचं म्हणून सदस्य झाले. आता व्यसनच लागलंय मायबोलीचं.

माझ्या वाचनाच्या वेडापायी मी नेटवर मराठी साहित्याच्या साईटस् शोधत असताना मायबोलीचा खजिना सापडला. आता 24 तास मायबोलीवर पडिक असते.
जराही वेळ मिळाला की तो मायबोलीवरचे माहितीपूर्ण नवे-जुने लेख वाचण्यात सत्कारणी लागतो.
धन्यवाद.

Pages