द 'अनऑफिशिअल' मेकींग ऑफ रा.वन

Submitted by लसावि on 29 October, 2011 - 15:40

रा.वन ज्यांनी पाहिला आहे व ज्यांनी पाहिला नाही त्या सर्व पब्लिकसाठी आस्मादिकांनी अत्यंत मेहनत करुन गोळा केलेला हा स्कूप ऑफ़ द इअर आहे. आता काही छिद्रान्वेषी याला स्पूफ म्हणतील याला आमचा नाईलाज आहे.रा.वन सारखी शतकातून एकदाच येणार्‍या पाथब्रेकिंग, माईंडब्लोईंग निर्मितीमागचे रहस्य आम्ही उघड करीत आहोत.
**********************************************************************************************************************
रेड चिलीज इंटरन्यॅशनलचे हापिस. शाहरुख खान (यापुढील लेखात याचा 'शाखा' म्हणून उल्लेख होईल) (वैधानिक इशारा - शाखा शब्दाच्या अशा वापराने ज्यांच्या भावना दुखावतील त्यांनी लेख वाचू नये, इतरत्र जाउन शिव्या घालाव्यात).
तर शाखा ढसढसा रडतोय. करण जोहर (यापुढील लेखात याचा 'केजो' म्हणून उल्लेख होईल, त्याच्या कसल्याही उल्लेखाने कुणाच्या भावना दुखावण्याचा संभव नाही, तरी 'तसे' काही असल्यास....काळजी घ्या).
तर शाखा ढसढसा रडतोय, केजो त्याचे अश्रू पुसतोय, अर्जुन रामपाल (याचा उल्लेख रामपाल असाच केला आहे, खरे तर त्याची लायकी रामलाल इतकीच आहे) वारा घालतोय. सगळे टेन्स, शाखाच्या रडण्याचे कारण कळत नाही. केजो मान वेळावतो आणि धाडस करुन विचारतो - 'शाखा, तुला काय झाल्ये, तुला काय हव्ये?' (आता हे तो गोनीदांडेकरी मराठीत बोलतो का? असा प्रश्न चाणाक्ष* माबोकरांना पडलाच असेल, पण ही सटायरीकल लिबर्टी** आहे असे समजा).

विसू. - शाखाचे सर्व संवाद त्याच्या खास बकरीटोनमधे, केजोचे त्याच्या खास हातवार्‍यासकट आणि रामपालचे त्याच्या अ‍ॅक्सेंटसकट इमॅजिन करावेत.

शाखा (रडवेल्या आवाजात) - 'तुला नाही समजणार, माझी इतक्या वर्षांची मेहनत पाण्यात चाल्लीय. मुझे कोई नही पुछता'

रामपाल- 'शाखा, अरे रागोवच्या तोंडचे वाक्य तू का म्हणतो आहेस'

शाखा - 'असं कसं, तीन्ही खानात माझं काय राह्यलयं. तो आमिर कधीतरी एक सिनेमा करतो, नुस्ते पब्लिसिटी स्टंट करत फिरतो, खोटारडे अवॉर्डही घेत नाही आणि तो म्हणे इंडस्ट्री बदलणारा गेमचेंजर, चीटर,चीटर चीटर!

केजो - हाय, शाखा! अगदी कुकुहोहैमधे म्हणतोस तस्से म्हणालास, चीटर,चीटर चीटर!

शाखा - हेच ते हेच ते. हे अस्ले पांचट रोमँटीक सिनेमे करुन तू माझी वाट लावलीस.

केजो - अरे पण तू कित्ती कित्ती पॉप्युलर आहेस.

शाखा - पॉप्युलर? अरे हॅट! माझ्यापेक्षा तर.........तो गाजतोय.

रामपाल (अनवधानाने) - तो कोण? सलमान? (या नावासरशी केजो एक उसासा टाकतो, पण शाखाच्या नकळत)

शाखा रागाने डोळे फिरवतो, केजो रामपालला दटावतो.

शाखा - श्शी! कसले त्याचे सिनेमे, काय त्यांची नावं आणि तरीही इतके हीट?

केजो आणि रामपाल - अरे पण तू तर बादशहा आहेस ना? किंग खान?

शाखा - कसला डोंबलाचा किंग, क्लास आणि क्रिटीक आमीरकडे, मास आणि मनी त्या सल्ल्याकडे आणि मी घेऊन बसलोय हे, 'करन अर्जून'. ते काही नाही, मलापण एक असा सिनेमा पायजे की मी ह्या दोघांच्या उरावर बसेन, मीच असेन गेमचेंजर.

केजो - आयडीआ!

शाखा - हे आणखी एक, आयडीआ म्हटलं की मला तो म्हातारा आणि त्याची फ्यॅमिली आठवते, त्याचे केबीसीपण माझ्यापेक्षा चांगले. रिटायर का होत नाय थेरडा?

केजो - अरे ऐक तर, गेमचेंजर व्यायचेय ना तुला, मग 'व्हिडीओ गेम'वरच सिनेमा काढूया ना?

रामपाल - येस्स, आणि तू हो सुपरहीरो, त्या सहाबोट्यासारखा.

केजो- भरपूर अ‍ॅक्शन घालू त्यात अगदी सलमानस्टाईल.

शाखा - (मनात- माझ्या सिगारेट पिउन खंगलेल्या बॉडीला अ‍ॅक्शन कशी शोभेल?) प्रत्यक्षात - पण माझ्या इमोशनल इमेजचे काय?

रामपाल - डबल रोल ठेउ, एक इमोशनल एक फ़ाईटवाला.

केजो - अरे तू रोबो हो, तुलातर अजून विग आणि मेकअपची गरज नाही त्या......कोण तो (घाबरुन चाचरतो)

शाखा - ओके, ओके आलं लक्षात, म्हंजे माझी कुठलीही अ‍ॅक्शन जस्टीफाय होईल, इतरांसारखी माईंडलेस फाईट वाटणार नाही!

केजो - बघ म्हंजे सलमानसारखी मारामारी तर जमली आता राहिला प्रश्न आमिरचा.

शाखा - थांब, थांब पण लोक मला रोबो म्हणून अ‍ॅक्सेप्ट करतील का? त्या साउदीचा एक रोबो आत्ताच झालाय की.

केजो - एकदम करतील, तुझा मानेइखा पाह्यलाच की लोकांनी, तसच ब्लँक चेहयानी वावरायचे.

शाखा - व्हॉट डू यु मीन?

केजो - (एकदम जीभ चावत) म्हंजे असं की तू वेगळं काही केलसं की लोकांना आवडतं.

रामपाल - ठरलं तर, एक रोल नॉर्मल; दुसरा रोबो.

केजो - पहिल्या रोलमधे ओव्हरअ‍ॅक्टींग दुसयात नोअ‍ॅक्टींग (मनात- ह्याच्याशिवाय याला येतेय काय).

शाखा - बट आय वाँट टू लुक डिफ़रंट, तो आमिर पहा. प्रत्येक सिनेमात वेगळा लुक, गिमिक्स नुस्ते.

रामपाल - नो प्रॉब्लेम, तू साउथैंडीअन बन, कुरळे केस, काळा इ.इ.

केजो - नो यार, हा पंजाबी नाय बोल्ला तर एनाराय मार्केट्चे काय?

शाखा - ते काही नाही, फ़ार तर हिरवीणीला पंजाबी करु, तेवढेच पॅनइंडीअन अपिल.

रामपाल - पण हिरविण कोण? काजोलला घ्यायचे का?

केजो (पापण्या फ़डफ़डवत) - आय जस्ट अडोर हर

शाखा - नॉनसेन्स, तिथे ते दोघे आपल्यापे़क्षा निम्म्या वयाच्या पोरीबरोबर रोमान्स करताहेत आणि तुम्ही त्या काकूबाईशीच माझी जोडी लावणार? नथिंग डुईंग, मला कत्रिना किंवा कंगना पायजे.

केजो आणि रामपाल हबकून एकमेकाकडे बघतात. शेवटी कसेबसे करिनावर एकमत होते.

शाखा - रोबो आणि बेबो दोन्ही ठीक आहे पण स्टोरी काय असेल?

रामपाल - फ़िकीर नॊट, रागोव आणि संजय गुप्ताच्या डिव्हीडी लायब्ररीचा मी मेंबर आहे, पायजे तेवढ्या आयडिआ, सॊरी; कल्पना देतो.

केजो - माझ्या डोक्यात तर स्टोरी आलीच आहे. 'टर्मिनेटर टू'मधला लहान मुलगा आणि रोबोतला इमोशनल बाँड, ’ट्रॉन' आणि 'स्पाय किड्स'’मधला व्हिडीओ गेम, झालच तर ’२०१२’ टाईप विध्वंस, मस्त भेळ करु.

रामपाल - आणि हे सगळं करुन मी इंडस्ट्रिची पत वाढवतोय, अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी देतोय वगैरे भंकस करायला लाग.

केजो - दॅट्स ईट, झालासच तू मग गेमचेंजर

शाखा - सिनेमाच्या पब्लिसिटीवर मी सॉलिड जोर देणार आहे आमिरपेक्षाही जास्त.

केजो - पण त्यासाठी सिनेमाचे नाव आधीच फ़िक्स करुन टाक, वातावरण नुस्तं तापलं पायजे.

शाखा - नावात काय अवघड आहे, माझ्या कॅरेक्टरचे नाव तेच सिनेमाचे नाव, मी हिरो आहे.

रामपाल - इथेच तर चुकतोयस, गेमचेंजर व्हायचेय ना तुला तर मग सिनेमाला हिरोचे नाय तर व्हिलनचे नाव दे, उदा. गज़नी.

केजो- आयला हो रे

शाखा - ही काय पिडा आहे? आता व्हिलनचे नाव काय ठेवायचे?

केजो - सोप्पेय, पुराणातले व्हिलन आठव दुर्योधन, महिषासुर, कंस, रावण!

शाखा - अरे पण ’त्यांचा’ एक रावण ऑलरेडी झालाय.

रामपाल - तो कस्ला भिजका, फ़ुसका रावण! आपण याला म्हणू रा.वन. कायतरी भारी टेक्निकल वाटेल.

शाखा - आणि म्हातार्‍याची टिंगल केल्यासारखे ही होईल

केजो - हो ना तेवढीच काँट्राव्हर्सी, पब्लिसिटीला उत्तमच.

शाखा - ठरलं तर मग, पुढच्या दिवाळीला उडवून देउ बार.
**********************************************************************************************************************
तर अशा रोमहर्षक पद्धतीने या कल्टक्लासिक सिनेमाची सुरुवात झाली. आता काही लोक याला 'कळ ते का सीक' म्हणतात याला काय म्हणावे?

तळटीपा-
* चाणाक्ष - या प्रकारच्या माबोकरांची संख्या सतत वाढत आहे, किंबहुना इथे सदस्य होताच लोक चाणाक्ष बनत आहेत, हे आमचे जाताजाताचे निरिक्षण
** सटायरीकल लिबर्टी - म्हणजे काय? ती असावी काय? तिचा वापर कसा करावा इ.इ. गहन प्रश्नावर तज्ञांनी जरुर धागा काढावा, आम्ही सूत जोडयला येउच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल पाहिला रा१.. अत्यंत बिलो बेल्ट विनोद.. मुलांना सोबत घेऊन बघायचा झाल्या अत्यंत एम्बॅरसिंग होतं.. अत्यंत चांगल्या कल्पनेचा इस्कोट आहे हा रा१!!

Pages