घरकाम बेक्कार काम नाही......

Submitted by मी शर्वरी on 25 October, 2011 - 12:22

घरकाम म्हणजे एकदम बेक्कार काम... असे एक खूप उर्मट वाक्य मध्ये कुठेतरी वाचले आणि मनात विचार सुरू झाले. खरच घरकाम बेक्कार असते का ?

माझ्या आईला आणि बाबांना तर मी नेहेमी खूप मनापासून घराची काळजी घेतांना, प्रत्येक गोष्ट निगुतीने करतांना बघायची. घरात कामाला बाई वा गडीमाणसे यायची, घर झाडायची पुसायची, भांडी घासायची. पण ते काही आई बाबांचा त्याकडे बघयचा द्रूष्टीकोन असा तुच्छ्तेचा होता म्हणून नाही, ती माणसे येवो न येवो घर तर आपलेच आहे ते छान मस्त ठेवण्यात त्यासाठी दोघांनी मिळून छोट्या मोठ्या गोष्टी करण्यात नुसते काम असा भाव नाही तर एक आनंद मिळायचा आई बाबांना. अगदी लहान्पणापासून मला, भावाला पण छोट्या छोट्या कामात सहभागी करून घ्यायचे. आपले असे काहीतरी आपण सगळ्यानी एकत्र येउन सांभाळण्याचे समाधान मग घरभर पसरायचे, आणी घरात एक आनंदाचे वातावरण असायचे.

पाण आईचाच द्रुष्टीकोन असा तुच्छ्तेचा असता तर घर कसे असते ? बाह्य रुप तर सदा अस्ताव्यस्त्च, पण आतूनही घरात कधी समाधान, आनंद नसेल अशा घरात, चिड्चिड, वैताग, तूतू, मीमी अशाने सुंदर घर, सुंदर संसार कसा उभा रहाणार ? म्हणजे कोणा एकाची जरी अशी व्रुत्ती असेल तरी घराचा नरक होणार, आणि दोघांचीही असेल तर उकीरडाच होईल ना ?

आजी म्हणायची वास्तु नेहेमी तथास्तु म्हणत असे. ते भाबडेपणाचे वाटायचे, पण त्याचा अर्थ असे घराशीच नाळ तुटलेले आणि त्यामुळे संसार बेचव झालेले पाहिले की लक्षात येते.

सध्या कोणी सणवार साजरे केले की त्यांना नावे ठेवा, कोणी घरी चाम्गला स्वयंपाक करत असेल की तिला हिणवा, कोणी नवर्याशी प्रेमाचा संसार करत असेल तर तिला गुलाम म्हणून डिवचा असे दिवस आहेत. ज्याम्ना हे सगळे जमत नाही, हे गुण अंगात नसतात, फक्त कुचके बोलून फिदीफिदी हसता येते अशाच बायका यामागे असतात. त्यात आता मनापासून घर सांभाळनार्‍यांना बेक्कार काम करणार्ञा म्हणून हिणववण्याची भर पडु नये असे वाटले म्हणून हा लेख..

चला तर दिवाळिच्या निमित्तने आपले घर आनि मनही चकचकीत करूया. सर्वाम्ना दिवाळिच्या शुभेच्छा.

गुलमोहर: 

सॉरी, मी खूप घाईघाईत कमेंट टाकली आधीची..
तुम्ही इथे नव्या आहात, इतर काही पोस्टस नाहीत, लेख नाहीत.. डायरेक्ट हा लेख हे (आणि तुमच्या लेखाचा हेतू) हे सगळं उशीरा कळंलं.
पुलेशु! Happy

अगं शर्वरी ....अगदी माझ्या मनातलं लिहिलंस!
अर्थातच हे लिहिण्यामागे काही हेतु असल्यास माहिती नाही.
तुला दिवाळी शुभेच्छा!

उत्तम.
हेतु असलाच तर तो चांगलाच दिसतो आहे.
आधी घाईघाईने प्रतिसाद द्यायचा आणि मग खेद व्यक्त करायचा ही अनेकाना असलेली सवय चांगली नाही. पण खेद तरी व्यक्त करतात ही बाब मात्र चांगली आहे. त्यामुळे विसरून जाणे चांगले!

ज्याला जे काम जमते, आवडीने करावेसे वाटते ते करण्यात काहीच गैर नाही. काही स्त्रीया अत्यंत आवडीने व निष्ठेने घरकाम करतात, त्या तशाच चिकाटीने आपले अन्य करिअर घडवणार्‍या स्त्रीया वा पुरूषांइतक्याच कौतुकास पात्र आहेत. कुठल्याही कामाची प्रतवारी करणे आणि हीन-उच्च ठरवणे योग्य नाही.

सध्या कोणी सणवार साजरे केले की त्यांना नावे ठेवा, कोणी घरी चाम्गला स्वयंपाक करत असेल की तिला हिणवा, कोणी नवर्याशी प्रेमाचा संसार करत असेल तर तिला गुलाम म्हणून डिवचा असे दिवस आहेत. ज्याम्ना हे सगळे जमत नाही, हे गुण अंगात नसतात, फक्त कुचके बोलून फिदीफिदी हसता येते अशाच बायका यामागे असतात. त्यात आता मनापासून घर सांभाळनार्‍यांना बेक्कार काम करणार्ञा म्हणून हिणववण्याची भर पडु नये असे वाटले म्हणून हा लेख..

अरेरे, असे कोण म्हणते?
बाकी असे लोक जगात असणारच. उत्तम गोष्ट म्हणजे जमले तर अश्या लोकांकडे दुर्लक्ष करावे. तेहि कठीणच.
फक्त मायबोलीवर लोक करतात तसे कुणि अरे म्हंटले की कारे म्हणून भांडायला उठू नये.

आधी घाईघाईने प्रतिसाद द्यायचा आणि मग खेद व्यक्त करायचा ही अनेकाना असलेली सवय चांगली नाही. पण खेद तरी व्यक्त करतात ही बाब मात्र चांगली आहे. त्यामुळे विसरून जाणे चांगले!
>>हेतू जामोप्या स्टाईल वाटला म्हणून मी तो प्रतिसाद काढला.
घरकाम एखाद्याला बेक्कार काम वाटू शकतं.. इतरांनी त्यांना "ज्याम्ना हे सगळे जमत नाही, हे गुण अंगात नसतात, फक्त कुचके बोलून फिदीफिदी हसता येते अशाच बायका यामागे असतात." असलं म्हणायची काही गरज नाही.. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. ज्याला मजा येते त्यानं ते करावं ज्याला आवडत नाही, त्याला कमी लेखायची गरज नाही - कारण मे बी दे हॅव फाऊंद समथिंग दॅट इज मोअर मिनिंगफुल दॅन हाऊसवर्क (आणि ह्याचा अर्थ एखाद्याला घरकाम मिनिंगफुल वाटणार नाहीच असंही नाही - त्यानं ते करावं - इतरांना कुचकं न बोलता करावं) अशा अर्थाचा प्रतिसाद होता.

ह्या व्यक्तीला मुळात हे वाक्य कळलं ह्याचच मला आश्चर्य वाटतय कारण ही व्यक्ती लेख लिहिला तेव्हा फक्त ३ तास माबोवर होती.. ते वाक्य लिहिल्याला एकापेक्षा जास्त महिना होऊन गेला असावा(मी लिहिलं नव्हतं :))
जिथे ते लिहिलं गेलं तिथे ह्या व्यक्तीचा वावर नव्हता, त्यामुळे लेखाचा हेतू काड्या टाकण्याचा वाटला (वावर असेल तर डुआयडीनं लेख लिहिण्यापेक्षा - तिथेच - स्वतःला जे पटलं नाही ते लिहायला हवं होतं) त्यातून 'अपेक्षित पेटणं' मला चुकीचं वाटल्यानं मी आधीचा रिप्लाय काढला..
पण माझ्या बदललेल्या रिप्लायाचा माझ्या वाटण्यापेक्षा वेगळा अर्थ निघत असल्यानं पुन्हा ही पोस्ट
(देवा रे!)

नानबा Lol