अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

Submitted by पाषाणभेद on 24 October, 2011 - 23:42

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे. आताच्या नित्याच्या बातम्यांमधे भ्रष्टाचार, खुन, दरोडे, पोलीसांची गुन्हेगारांशी हातमिळवणी, बॉलिवूडी अभिनेत्यांच्या बातम्या, त्यांनी ट्विटरवर काय लिहीले, राजकारणी, प्रिंस काय जेवला, कोणत्या झोपडीत काय खाल्ले आदींसारख्या, एक बिग अभिनेता व एखादा खेळाडू पैशासाठी व स्व:तासाठी सारी मेहनत करत असून सामाजिक योगदान शुन्य असतांनाही त्याला भारतरत्न आदींसारखे पुरस्कार देण्याची मागणी केली जाते अन त्या व्यक्तीही मुकसंमती देतात या असल्या काळ्या बातम्या असतात. अंधारातील रजतरेषा ठरावी अशी दैनिक दिव्य मराठीतील वरील तारखेची बातमी जशीच्या तशी देत आहे. आताच्या काळात डॉक्टरलोकंही व्यापारी झालेत. डॉक्टर सुनिल गाजरेंसारखे सन्माननिय अपवाद प्रत्येक क्षेत्रात आहेत म्हणूनच त्या बॉलबेअरींगरूपी माणसांमुळे देश चालतोय.

डॉक्टर सुनिल गाजरेंना मानाचा मुजरा!

पॅरालिसीसचा दोन लाखांचा उपचार 20 हजारात!

(सुनील बडगुजर । जळगाव)

डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

हातापायाचा पॅरालिसीस झाल्यानंतर ‘आयव्हीआयजी’ या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यासाठी सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. र्शीमंताना हा खर्च परवडणारा असला तरी गरिबांना मात्र ही उपचारपद्धती न परवडणारी आहे. परिणामी अनेक रुग्णांना उपाचाराअभावी अपंगत्व किंवा थेट मृत्यूला सामोरे जावे लागते. या दुर्दैवी प्रसंगावर मात करण्याच्या दृष्टीने न्युरोफिजिशिअन डॉ. सुनील गाजरे यांनी ‘लो डेअसर प्लाझ्मा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत शोधून काढली असून यामुळे अवघ्या 20 हजारांत रुग्ण बरा होत आहे. या पद्धतीने आतापर्यंत 110 रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

हवा आणि पाण्यातील विषाणूंमुळे इमिनो अँलर्जीचे इनफेक्शन शरीरात झाल्याने हाता-पायाचा पॅरालिसीस होतो. यामुळे रुग्ण आयुष्यभर लुळा होतो. त्यापुढेही अधिक लागण झाली तर यात मृत्यूही ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांवर विशेष पध्दतीने इलाज करावा लागतो.

अशी आहे नवीन आणि स्वस्त उपचार पद्धती

या रोगाच्या रुग्णांवर डॉ. गाजरे त्यांनी संशोधन केलेल्या नवीन उपचार पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीला त्यांनी ‘लो डेअसर प्ला ामा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत हे नाव दिले आहे. यात ते रुग्णांच्या शरीरातून दिवसाला दोन वेळा 350 एमएल रक्त काढतात. ते रक्तपेढीत पाठविल्यानंतर तेथे प्रक्रिया होऊन रक्तातील प्लाझ्मा व लाल-पांढर्‍या पेशी वेगळ्या काढल्या जातात. त्यामध्ये अँण्टी बॉडीज असल्याने त्या नष्ट करण्यात येतात. त्यानंतर शुद्ध झालेले रक्त पुन्हा रुग्णाला दिले जाते. असा उपचार पाच दिवस केला जातो. यासाठी दिवसाला तीन ते चार हजार रुपये असे पाच दिवसासाठी फक्त 20 हजार रुपये खर्च येतो.

(वरील बातमीवजा लेख कोठे टाकावा ते समजले नाही. बातमी जास्तीत जास्त संबंधीतांपर्यंत पोहोचावी हा उद्देश होता.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांगली बातमी आहे. गाजरे यांचे अभिनंदन.

हे संशोधन कुठले? वर्तमान पत्रात आले असेल तर कृपया लिंक देता येईल कां? म्हणजे त्यांच्या कार्यावर अजुन प्रकाश पडेल.

पाषाणभेद - खूप उपयुक्त माहिती, मनापासून धन्यवाद.
तुम्ही दिलेल्या लिन्क मधे सर्व मजकूर फार धूसर दिसतोय. कृपया त्या डॉ. चा पत्ता अथवा इ मेल , फोन नं काही देउ शकाल का ?
डॉ. गाजरे हे खरंच खूप उत्तम असे समाज उपयोगी काम करत आहेत - त्यांना सलाम.

धन्यवाद पाभे.

नेट वर शोधले असता खालील माहिती मिळाली.

Dr. Sunil Gajare (Doctors - Neuro Surgeons/Neurologists) is located at 26, Gandhinagar, Near S T Stand, Dist. Peth, Jalgaon, Jalgaon. Dr. Sunil Gajare phone number is 0257 - 2228139, 2223656. Their fax number is 0257 - 2228941. Doctors Neuro Surgeons/ Neurologist
Dr. Sunil Gajare
26, Gandhinagar, Near S T Stand, Dist. Peth, Jalgaon,
Jalgaon
Maharastra
India

Phone: 0257 - 2228139, 2223656

हा अर्धांगवायूवरचा उपचार नाहे. अर्धांगवायु म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव किंवा गुठळी होऊन पॅरालिसिस होणे.. याअला स्ट्रोक म्हणतात.

पण हा उपचार गुलेन बेरी सिन्ड्रोम ( जी बी सिंड्रोम) नावाच्या रोगावर असावा असे एकंदर माहितीवरुन वाटते. काही विषाणूंमुळे आधी ताप येतो.. मग त्या तापात विषाणूंच्या विरोधात रक्तात अँटीबॉडी तयार होतात.. पण या अँटी बॉडी शरीरातील पेरिफेरल नर्व- नसा यांच्या बरोबर क्रॉस रिअ‍ॅक्ट होतात.. ( कारण हे विषाणू आणि हे नर्व टिश्यु यांची रचना काही अंशी सारखी असते. ) त्यामुळे पॅरॅलिसि होतो.. शक्यतो हा पॅरॅलिसिस पायाना होतो.. अगदी क्वचित हात किंवा छाती याना झाल्यास मृयुत्यु येऊ शकतो... त्यावर उपचार म्हणून रक्तात निर्म्,आण झालेले अँटीबॉडी कमी करावे लागतात.. त्यासाठी आय व्ही आय जी वापरले जातात.. जे फार महाग आहेत. हे आय व्ही आय जी या अँटीबॉडीबरोबर रीअ‍ॅक्ट होऊन त्याना काढून टाकतात..

पण त्याला उपाय म्हणून डॉक्टरानीही ही वेगळी पद्धत शोधली आहे.. शरीरातील रक्त काढून ते फिल्टर करुन अँटीबॉडीज काढून टाकणे.. असे वारंवार केल्यास हे अँटीबॉडीज कमी होतात.

साधारण ४ ते ६ आठवडे हा पॅरालिसिस रहातो. त्यानंतर स्नायूना परत ताकद हळूहळू येत जाते.

अर्धांगवायू हा मध्यम वयीन, म्हातारे लोक यांचा आजार आहे.. पण जी बी सिंड्रोम प्रामुख्याने लहान मुले, तरुण लोक याना होतो. हा आणखे एक फरकाचा मुद्दा. अर्धांगवायुत मेंदू, स्पायनल कॉर्ड यात दोष असतो.. पण या आजारात पेरिफेरल नर्व अ‍ॅफेक्ट होतात, हा एक दुसरा फरकाचा मुद्दा.

जामोप्या,अगदी बरोबर.मी हेच लिहायला आले होते.
वरच्या लेखातील अर्धवट माहिती वाचून कुणाचाही पॅरॅलिसीस बरा होतो म्हणून गैरसमज होईल.
सदर बातमी शेंडा-बुडखा नसलेली वाटते.