मागणे

Submitted by आनंदयात्री on 22 October, 2011 - 05:39

अजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो

पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो

फकीर जाहलो तरी, सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो

- नचिकेत जोशी

(दीपज्योती दिवाळी अंक २०११ मध्ये पूर्वप्रकाशित)

गुलमोहर: 

फकीर जाहलो तरी, सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो...!!! ............../\........... !!!!

व्वा !!

छान

सर्व मित्रमैत्रिणींचे आभार! Happy

लोकहो, पहिल्या कडव्यातील दुसरी ओळ चुकून वेगळी लिहिली होती... ती आता बदलली आहे..
क्षमस्व!