टगे (गीरीचा) पराभव

Submitted by विजय आंग्रे on 18 October, 2011 - 01:16

खडकवासला पोटनिवडणुकीत पैसा, सत्ता आणि टगेगिरीचा पराभव झाला आहे. शिवसेना-भाजप व रिपाइं महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांना घरीच बसवले व स्वत: विधानसभेत पोहोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुरती लाज खडकवासला निकालाने गेली आहे. फक्त पैसा व टगेगिरीच्या जोरावर राजकारण करता येत नाही, निवडणुका जिंकता येत नाहीत हाच इशारा खडकवासल्यातील शहाण्या मतदारांनी अजित पवारांना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार हर्षदा वांजळे यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ३,६२५ मतांनी पराभव केला.

या निकालामुळे विरोधकांमधील आत्मविश्वास द्विगुणित झाला. भविष्यात शिवसेना, भाजप, मनसे हे आरपीआयसह एकत्रित आले तर काय होऊ शकते, याची रंगीत तालीम दिसली.

यावर आपले मत काय आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल याची थोडी चर्चा पुण्याच्या बाफवर झाली होती. त्यांचा पक्षबदल, मतदानाच्या दिवशी नसलेली सुट्टी (त्यामुळे फक्त ३२ टक्के मतदान), राष्ट्रवादीच्या विरोधातील मते न फुटणे (मनसे नसल्याने) ई. फॅक्टरबद्दल बोलत होतो.

हिस्सार बद्दल फारसे वाचले नाही अजून, पण कॉन्ग्रेस + राष्ट्रवादी च्या विरोधात सेना, मनसे, भाजप, रिपा वगैरे एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ताबदल होउ शकेल का? या उदाहरणावरून वाटते. तो बदल योग्य आहे की नाही हा वेगळा मुद्दा, पण होईल का याचे हे मॉडेल धरता येइल का? (सुट्टी दिली नाही तर कदाचित धरता येइल Happy )

२००९ चे निकाल पहाता राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त मत पडली आहेत.... तसाही खडकवासला मतदार संघ राष्ट्रवादीला अवघडच होता....

जिंकण्याची कारणे काहीही असोत..हर्षदा वांजळेंचा पराभव ही मतदाराना "गृहीत" धरणार्‍यांच्या कानाखाली आवाज आहे.

खडकवासला विधानसभा पोटनिवडणुकीत हर्षदा वांजळे या हरल्या. प्रत्यक्षात हा निकाल म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव आहे.
एका पोटनिवडणुकीसाठी अजितदादा यांना इतकी प्रतिष्ठा पणाला लावली होती की, त्यांचे जिल्ह्यातील खास नेते आणि कार्यकर्तेही चकीत झाले होते. जिल्ह्यावर आपले निर्वीवाद वर्चस्व आहे हे दाखवण्याच्या नादात दादा आता पुरते हरले आहेत.

सहानुभूतीची लाट कधीही गृहित धरू नये. त्या जोडीस किंवा काकण भर जास्तच आपले ग्रासरूट्स लेव्हल वर काम हवे. त्यात पक्ष बदलणे म्हणजे चूक झाली आणि योग्य धडा मिळाला.

पक्षबदल या विशयी : मला वाटत लोकांना या सन्दर्भ संपुर्ण माहिती नाहिये.

खरतर रमेश वांजळे हे मनसे मधे होते पण ते तसे असताना ही हर्षदा वांजळे या राष्ट्रवादी पक्षामधेच होत्या.

पक्ष बदल तो झाला असता जेव्हा, रमेश वांजळे यांच्या नावावर निवडुन येण्यासाठी हर्षदा वांजळे यांनी स्वताचा ( ज्यात त्या आधीपासुन होत्या) राष्ट्रवादी सोडुन मनसे मधुन निवडणुकीला उभ्या राहिल्या असत्या.

रमेश वांजळे हे राष्ट्रवादीत होते.. पक्षाने तिकीट नाकारल्या वर मनसे तर्फे निवडणुक लढले आणि विजयी झाले.. हर्षदा वांजळे या काँग्रेसच्या जि.प. सदस्या होत्या त्यांनी तो पक्ष सोडुन राष्ट्रवादी तर्फे निवडणुक लढली..:)
अर्थात खडकवासला विधानसभा मतदार संघात मनसेचे अस्तित्व नगण्यच होते / आहे.. निवदणुकीतील करीष्मा हा रमेश वांजळेंचा होता.. राज ठाकरेंनी ह्या वेळी उमेदवार न देऊन झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवली..:)

मी_चिऊ >> हर्षदा वांजळे काँग्रेस च्या झेडपी मेंबर होत्या आणि या निवड्णुकीत राष्ट्रवादीत गेल्या , म्हणुन पक्षबदल.
या निकालबद्दल म्हणायेचे तर अजीत पवराना हा चांगलाच धक्का आहे कारण त्यानी पुर्ण ताकत आणि प्रतिष्ठापणाला लावली होती, मात्र विरोधक येकत्र आल्याने लागणार्‍या रिझल्ट्सची रंगीत तालिम म्हणणे खुप घाईचे ठरेल. येका पोटनिवड्णुकी पेक्षा सार्वत्रीक निवडणुकात मुद्दे आणि परिस्थीती खुप वेगळी असेल.

खरतर रमेश वांजळे हे मनसे मधे होते पण ते तसे असताना ही हर्षदा वांजळे या राष्ट्रवादी पक्षामधेच होत्या.<<<

चिऊताई, त्या राष्ट्रवादी पक्षामधे नव्हत्या तर कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या.
नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आग्रहाखातर हर्षदा वांजळे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला.

पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबियांचे प्राबल्य आहे. रमेश वांजळे यांना हयात असताना आम्ही उमेदवारी देऊ शकलो नाही, अशा चुकीची कबुली देत राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षादा वांजळे यांना पक्षाकडे ओढले आणि त्यांना उमेदवारी दिली. खरेतर, एखाद्याच्या मृत्यूनंतर ते ज्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आले होते त्या पक्षातूनच त्यांचे कुटुंबिय अथवा वारस निवडणूक लढवतात. मनसेनेही तशी तयारी दाखविली होती.

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार राष्ट्रवादीचा पण बारामती मतदारसंघ सोडला तर भोर, इंदापूर,दौंड, पुरंदर या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार नाही. त्यामुळे दादांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वांजळेबद्दल सहानुभूती आणि राष्ट्रवादी पक्षाची त्या भागातील ताकद या निकषांवर निवडणूक जिंकणे सोपे वाटत होते, पण मतदारांना गृहीत धरू नका हाच इशारा या निमित्ताने मिळाला.

रच्याकने: रमेश वांजळे यांनी काँग्रेस पक्षाचे काम पहिल्यापासून पाहिले आहे. तसेच वांजळे हे पिंपरीतील काँग्रेसचे नेते व माजी शिक्षणमंत्री दिवंगत रामकृष्ण मोरे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्यामुळेच मी राजकारणात आलो व मोठा झालो, तेच आपले राजकीय गुरु आहेत, असे रमेश वांजळे सांगत.

हर्षदा वांजळेंनी राष्ट्रवादीचे तिकिट घेऊन आयुष्यातली मोठी चूक केली. रमेश वांजळेंच्या पक्षाशी गद्दारी त्यांना भोवली. त्यांना आणि अजितदादांना वाटले की पैशाच्या बळावर ही निवडणूक सहजी जिंकता येईल पण मतदारांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. अजितदादांची, राष्ट्रवादीची आणि शरदरावांची एवढी ताकद असूनदेखील त्यांचा पराभव झाला म्हणजे तो 'दारूणच' म्हणायला हवा. राष्ट्रवादीने दुसरा उमेदवार उभा केला असता तर तो अजून जास्त फरकाने हरला असता. हर्षदा वांजळे मनसेकडून उभ्या राहिल्या असत्या तर १००% निवडून आल्या असत्या. त्या निवडून आल्या नाहीत हे बरेच झाले. शून्य कर्तुत्व असतांना केवळ नवर्‍याच्या पुण्याईवर निवडून येणे ही जनतेसाठी चांगली गोष्ट नाही.

राष्ट्रवादीचा ढासळता बुरूज जेवढ्या लवकर जमीनदोस्त होईल तेवढे महाराष्ट्राला लवकर चांगले दिवस येतील. शरदरावांच्या घाणेरड्या, संधिसाधू, जातीपातीवर बेतलेल्या, गुंडगिरीवर आधारलेल्या, विश्वासघाताची बैठक असणार्‍या राजकारणाचा असाच शेवट व्हायला हवा. अमाप पैसा (गैरमार्गाने) गोळा करून, लोकांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि गुंडगिरी करून राजकारण करता येत नाही हा धडा शरदरावांना कळेल तो सुदिन म्हणावा लागेल. दोन-तीन वेळा मुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय राजकारणात दोन-तीन पदे याखेरीज शरदरावांच्या झंझावती राजकारणाचे फलित काय? आज किती लोकं त्यांच्याविषयी दोन चांगले शब्द बोलतात? खाजगीत राष्ट्रवादीमधलीच काही लोकं त्यांच्या हपापलेल्या आणि अवसानघातकी वृत्तीला नावे ठेवतात. शेवटी ज्याच्यासाठी आयुष्य पणाला लावले, आटापिटा केला, आकाशपाताळ एक केले, पैशांची कोठारे उभी केली, लोकांना फसवले, त्यांचा विश्वासघात केला, भ्रष्टाचाराची कुरणे फस्त केली ते पंतप्रधानपद पदरी पडले नाहीच आणि पडण्याची शक्यता अजिबात नाही. अजितराव त्याची पुरेपूर काळजी घेत आहेत. हेचि फळ काय मम तपाला...असे म्हणण्याखेरीज आता त्यांच्या हातात काय आहे?

हर्षदा वांजळेंनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी जॉईन केली. त्यासाठी त्यांनी मनसे ला दुर लोटले. आणि आता राष्ट्रवादीतर्फे लढून पराभूत झाल्याने आणि त्या पक्षात त्या नविन असल्याने तिथे त्यांना जास्त भवितव्य असेल असे वाटत नाही. अशाप्रकारे, या निवडणूकीत त्यांनी त्यांच्या राजकिय भवितव्याचेच नुकसान करुन घेतले असे वाटते.

बाकीच्या ६७% लोकांनी सगळ्यांनाच नाकारले आहे त्याचे काय?<<<

मतदान करायच नाही आणि राजकारण्यांच्या नावाने खडे फोडायचे मग
हेच ६७% लोक नंतर राजकारण्यांना शिव्या घालणार. "साले सब नेता चोर है" म्हणून.

व्यक्तीचे कार्य बघून मतदान होईल तो सुदिन. पक्षाच्या चिन्हावरच आपल्याला निवडणूक लढवावी लागते, हे आपला निरक्षरपणा मिरवण्यासारखे आहे.

यावर आपले मत काय आहे?>>>>>>>>>>>>> ये पब्लिक है बाबु........................ ये जो पब्लिक है ये सब जानती है पब्लिक है

शेवटी ज्याच्यासाठी आयुष्य पणाला लावले, आटापिटा केला, आकाशपाताळ एक केले, पैशांची कोठारे उभी केली, लोकांना फसवले, त्यांचा विश्वासघात केला, भ्रष्टाचाराची कुरणे फस्त केली ते पंतप्रधानपद पदरी पडले नाहीच आणि पडण्याची शक्यता अजिबात नाही>>>>>>
१००% अनुमोदन

६७% लोकांनी मतदान केले नाही त्यात काही विशेष नाही... त्यांनी आपल्या राष्ट्रीय धोरणाची तटस्थपणाचीच री ओढली...

आता फक्त न म्हटलं तरी चिडतात.
तरी बरं यांचेच आहेत सगळे _रामजादे, दस बच्चे, हिंदूंनो कामाला लागा वगैरे वगैरे आदेश सोडणारे. आता यांच्या बोटण्या शांतच

असच मग दिल्ली च्या निवडणुकिबद्दल देखील बोलता येईल ना Rofl
फक्त पैसा व टगेगिरीच्या जोरावर राजकारण करता येत नाही, निवडणुका जिंकता येत नाहीत हाच इशारा खडकवासल्यातील शहाण्या मतदारांनी अजित पवारांना दिला आहे.>>> इथे खडकवासला आणि अजित नाव काढुन दिल्ली आणि मोदी हे नाव टाकावे.

Pages