लोकल आणि ग्लोबल

Submitted by आदित्य डोंगरे on 16 October, 2011 - 02:11

सध्याच्या काळात लोकल आणि ग्लोबल हे परवली चे शब्द झालेले आहेत. internet क्रांती आल्यापासून 'think global-act local' हा आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे.साधारणपणे सामाजिक कामे किंवा क्वचित प्रसंगी व्यावसायिक निर्णय घेताना हे शब्द वापरले जातात. म्हणजे जगाला भेडसावणारया समस्यांवर आपापल्या स्थानिक पातळीवर उपाय शोधावे, किंवा जगातील trends पाहून आपल्या व्यवसायात बदल करावेत इत्यादी. पण परवा विचार करताना मला 'think global-act local' चा एक वेगळाच अर्थ उमगला. जो अगदी प्रत्येक माणसाच्या आयुष्याला लागू पडू शकतो. प्रत्येक जण आचरणात आणू शकतो.
यामध्ये लोकल आणि ग्लोबल या दोनही शब्दांचा अर्थ जरा वेगळा आहे. हे दोन्ही शब्द स्थळाच्या संदर्भात न वापरता काळाच्या संदर्भात वापरावे लागतील.
बरीच माणसे आपल्या संपूर्ण आयुष्याचा एकाच वेळी विचार करत नाहीत. म्हणजे होवून गेलेल्या नव्हे, तर होवू घातलेल्या आयुष्याचा. लोक अस म्हणतील की आपण कुठपर्यंत जगणार माहीतच नाही तर विचार करून काय उपयोग? पण खरं सांगायचं तर सध्याच्या काळात, सर्वसाधारणपणे काही अपघात किंवा गंभीर आजार झाला नाही तर माणसे ८० वर्षे तरी अगदी सहज जगतात.काही नकारात्मक माणसे असे विचारतील की त्या आधी मेलो तर काय? पण मेलो तर काय यापेक्षा जगलो तर काय? हा माझ्या मते अधिक भयंकर प्रश्न आहे. कारण जगलो तर नेमकं काय करायचं हे कधीच नं ठरवल्यामुळे, मरणापेक्षाही वाईट आयुष्य , कुढत कुंथत जगणारी अनेक म्हातारी माणसे आज आपल्या अजूबाजू ला दिसतात. म्हणून प्रत्येक माणसाने आपण निदान ८० वर्षे तरी जगणार आहोत असे समजून, चालू क्षणापासून ते ८० वर्षापर्यंत अयुष्य डोळ्यापुढे आणावे. यालाच मी आयुष्याचा global view असं म्हणेन. आणि त्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, कश्यामुळे आनंद मिळणार आहे ते ठरवावं. यालाच think global, असं म्हणता येईल.
मग आता, act local म्हणजे काय हे सहज समजण्यासारखे आहे. ग्लोबल कडून लोकल कडे हळू हळू येताना, अयुष्यात पूर्ण करण्याच्या इच्छा, प्रथम दशकांमध्ये विभागता येतील. म्हणजे तिशीत अमुक करायचे, चाळिशीत अमुक करायचे इत्यादी...शारिरिक शक्ती लागणारया इच्छा विशी, तिशीत पूर्ण करता येतील तर अनुभव आणि ज्ञान आवश्यक असणारया इच्छा, चाळिशी, पन्नाशी इत्यादी दशकांसाठी राखून ठेवता येतील.
त्यानंतर सध्याच्या चालू वर्षात करावयाच्या गोष्टी ठरवता येतील. असं हळू हळू एका दिवसापर्यंत येता येईल. विचार करा, रोज सकाळी उठल्यावर आजच्या दिवसात आपल्याला अमुक अमुक करायचं आहे, आपल्या अयुष्यातील महत्वाकांक्षेचा अमुक एवढा भाग पूर्ण होणार आहे. हे जर माहित असेल तर सकाळपासूनच किती प्रसन्न वाटेल! दडपण न येता आपण ते काम करू शकू. व मोठ्या प्रवासातील छोटासा टप्पा पूर्ण केल्याचं समाधान मिळेल रोजच्या रोज.
पण एका दिवसाचेही अजून छोटे छोटे भाग करून त्यात कामे बसवण्याचा प्रयत्न करू नका मित्रहो! नाहीतर आपण अक्षरशः Time Table चे गुलाम होऊन बसु आणि जगण्यातील आनंद हिरावून घेतला जाईल. आपल्याला शिखरावर पोचायचं आहेच पण वाटेतलं निसर्ग सौंदर्य पण निरखायचं आहे . हो ना!
मग लागा तर विचार करायला,निर्णय घ्यायला आणि finally कामाला!
THINK GLOBAL - ACT LOCAL!!!!

गुलमोहर: 

फारच छान विचार मांडलाय.

पण मेलो तर काय यापेक्षा जगलो तर काय? हा माझ्या मते अधिक भयंकर प्रश्न आहे. >>> खरं आहे.

पण मेलो तर काय यापेक्षा जगलो तर काय? दुनीयेत अनेक माणसे अशी आहेत की ज्यांना स्वत:चे विचार आहेत पण त्यावर कृती करण्याच स्वातंत्र्य नाही. कारणे अनेक असतील अश्या माणसांना हे वाक्य प्रकर्षाने म्हणावेसे वाटत असेल अश्यांना या लेखाने नक्कीच नवी दिशा मिळेल.

@आयडु, जाई,कल्पू, मामी,नितिनचंद्र,मित्रांनो तुम्हा सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाने मला खरच फ़ार फ़ार आनंद झाला!....खूप खूप आभार!!! @मामी आणि नितिनचंद्र, हे वाक्य सुचल्यावर मीच खूप खूष झालो होतो:)

@उमेशकदमसर, रुणुझुणु.......खूप खूप आभारी आहे Happy