पॉट ऑफ गोल्ड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काल संध्याकाळी जरा बरी हवा होती म्हणून जेवणं आवरल्यावर डेक वर बसून कलिंगड खात होतो सर्व जण. मावळतीच्या दिशेने डेक, त्यामागे अंगण अन अंगणाच्या मागे मोठाले वृक्ष आहेत. सिकॅमोर, ओक अश्या दिग्गजांबरोबर ट्युलिप पॉपलर, ब्लॅक वॉलनट असे आगंतुक पण आहेत. सगळे शेजार्‍यांच्या अंगणात अन मागच्या नो-मॅन्स लॅन्ड मधे आहेत. पण त्यांची सावली, त्यांच्या पानांमधून येणारं मावळतीचं उन हे सग़ळं आमच्या साठी, आमच्या अंगणासाठीच.

सूर्य अगदी मावळतीला टेकायला आला होता तेंव्हा माथ्यावर अन पूर्वेला ढग दाटून आले. जलद निळे गडद निळे भरुन आले एकदम. इतक्या पटकन सरी ओघळल्या की आत घरात जाई पर्यंत भिजलो सगळे जण.

मुलांची डोकी पुसून , कोरडे कपडे घाले पर्यंत सर ओसरली सुद्धा. सहज म्हणून पूर्वेकडच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर पुढच्या घरांच्या माथ्यावर दोन दोन इंद्रधनुष्य! मुळातच इंद्रधनुष्य क्वचित दिसतात. एकावर एक अशी दोन आज पर्यंत दोन तीनदाच पाहिली असतील. मग मुलांना त्याच्यातला फरक दाखवला - वरच्या धनू मधे अन खालच्या मधे रंगांचा क्रम उलटा असतो . ते परावर्तन वगैरे फारसं त्यांच्या डोक्यात शिरलं नसावं पण लेकीने विचारलं की दोन इंद्रधनूष्य आहेत तर त्यांच्या खाली दोन -दोन पॉट ऑफ गोल्ड असणार का?
मी काही म्हणायच्या आत नवरा मागे उभा होता तो म्हणाला 'आय हॅव थ्री पॉट्स ऑफ गोल्ड राइट हियर. आय डोन्ट नीड नो रेन्बो फॉर गोल्ड.' धाकट्याला काही कळलं नाही. पण मोठी मात्र बापाला 'ऑ! डॅ...ड!' करुन बिलगली एकदम.

मॅड सारखे डोळे भरून आले एकदम माझेच!

विषय: 
प्रकार: 

शोनु, तुझ्या पुस्तकांची यादी बघायला इथे आले नी पॉट्स ऑफ गोल्ड वाचुन माझ्याही डोळ्यात पाणी आले. हे असे असते हे जितके खरे तितकेच योग्य वेळी व्यक्त होणे पण महत्वाचे नाही का ? मानले तुझ्या नवर्‍याला Happy

हाऊ व्हेरी क्युट शोनू! सुरेख वाटलं वाचून.

खूप दिवसांनी लिहिलंस आणि मस्तच.

मान गये (तुझ्या नवर्‍याच्या समयसूचकतेला)! Happy
व्हेरी स्वीट! टचवूड!
-----------------------------------------------
शरीर बारीक अन् मन मोठं करायला कधी जमणार????
Happy

1st rainbow is due to single reflection within water droplets while 2nd rainbow appears because of 2 internal reflections within a droplet. The position of sun matters a lot in this.
I have a book where this phenomenon is explained. If possible, I shall take a photo of those pages & post.

>>>> 'आय हॅव थ्री पॉट्स ऑफ गोल्ड राइट हियर
थोडक्यात, पण अतिमहत्वाचे! Happy

छान लिहिलाय प्रसन्ग!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

झकास कॉमेंट (तुझ्या नवर्‍याची) !
पूनम, आधी मन मोठ करायला घे, शरिराच राहू दे ते जमण्यातले नाही Happy
बाकी अस काहीतरी उलट पालट असत इंद्रधनुष्यात हे मला आजच कळल Happy

शोनु.. Happy

हे मला पण आजच कळलं की हे असं कायतरी उलटपालट असतं.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

शोनु,

मस्तच! Happy

वा शोनू मस्तच लिहिलं आहेस.

शोनू, खुप छान वाटल वाचून.
बाकी दोन दोन इंद्रधनुष्य मी हल्लीच पाहिले. सेलफोनने चांगले दोन तीन फोटो पण काढले पण हे परावर्तना विषयी आत्ताच कळल. ताबडतोब फोन काढुन फोटो पाहिले. खरच की... काय ही माझी निरिक्षण शक्ती... तरीच माझी लेक 'बाबा रेन्बोमधे कलर प्रोब्लेम आहे' असं का म्हणाली ते आज कळल. Happy