शुद्ध 'रेड वाईन'

Submitted by कुमार१ on 9 October, 2011 - 13:07

शुद्ध रेड वाईन पुण्यात कुठे मिळेल? औषधी वापरासठी हवी आहे. वाईन दुकानांमधील योग्य असते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुद्ध म्हणजे? नीट नाही कळाले. जर अल्कोहोल कंटेंट स्पेसिफिक हवा असेल तर एकदा नासिकच्या सुला वाईनरीशी संपर्क करून पाहा. कॉन्टॅक्ट डिटेल्स साईटवरून मिळू शकतील.

लाल वारूणी बर्‍याच प्रकारची असते. त्यातले अल्कोहोल टक्केवारी वेगवेगळी असते.
शुध्द अशुध्द वगैरे म्हणजे काय अपेक्षित आहे ते स्पष्ट केल्यास अजून माहिती देता येईल.

मिसळपाववर सोकाजिराव त्रिलोकेकर म्हणुन एक आयडी आहे. त्याना विचारा.

इथेही बेफिकिरराव कदाचोत सांगु शकतील.

शुद्धचा क्रायटेरिआ काय आहे? वाइन बाटली घेउन त्याचे लॅब टेस्टिन्ग करून काय बॅक्टेरिया आहेत ते कळेल.
पण जनरली वाइन फॅक्टरीत क्युसी प्रोसीजर असतेच

कुमार ..तुमच्या अवलोकनावरून नजर टाकली अन इथे टाकलेला प्रतीसाद संपादित केला..(काढून टाकला)
...माझाही तोच प्रश्न.. शुद्ध म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे?

'शुद्ध' म्हणजे द्राक्षापासून फक्त नैसर्गिकरित्या तयार झालेले अल्कोहोल असलेली. त्यात वेगळे अल्कोहोल ओतलेले नको.

३ वर्षापासुन कुमार१ आपल्यासाठी थांबलेत वाटत शुद्ध रेड वाइन घेण्यासाठी Wink

>>'शुद्ध' म्हणजे द्राक्षापासून फक्त नैसर्गिकरित्या तयार झालेले अल्कोहोल असलेली. त्यात वेगळे अल्कोहोल ओतलेले नको<<
द्राक्षासव घ्या की राव मग !! Lol

हा थोडा वादग्रस्त विषय आहे. रेड वाइन मध्ये मद्या व्यतिरिक्त काही घटक अस्तात . जसे की antioxidants & Reservatrol.

पाश्चात्य मंडळींनी ही वाइन हृदय विकारासाठी प्रतिबंधात्मक आहे असा प्रचार अनेक दशके चालवला आहे. त्याने 'good cholesterol' चे प्रमाण वाढते, असा पूर्वी समज होता. आधुनिक संशोधनातून त्यात तथ्य नसल्याचे आढळले आहे.
Reservatrol हे काही श्वसन रोगांसाठी उपयुक्त आहे असाही प्रचार काही काळ होत होता. मला त्याबाबत उत्सुकता होती. म्हणून मी हा धागा २०११ मध्ये काढला होता.
परंतु, नंतरच्या संशोधनामध्ये त्यातही तथ्य आढळले नाही.
काही प्रगत देशांत 'मद्यविरहित वाइन' मिळते. त्याचा औषधी उपयोग असतो, असा प्रचार केला जातो.

एकूण गोंधळात टाकणारा विषय आहे खरा.

"ओके औषधी नसली तरी आवडत असेल तर बिनधास्त घ्यावी" - आवडीनं घेतल्यास, बाकीच्या औषधांची गरज ही लागत नाही Wink

>>"ओके औषधी नसली तरी आवडत असेल तर बिनधास्त घ्यावी" - आवडीनं घेतल्यास,<<

आणि त्यानंतर ब्रह्मानंदि टाळी लागल्यावर नफा-तोट्याचे प्रश्न पडत नाहित आणि गोंधळहि उडत नाहि... Proud

French Paradox