हैद्राबाद शहरात मोती खरेदी बद्द्ल माहिती हवी आहे.

Submitted by juyee on 8 October, 2011 - 07:43

दिवाळी सुट्टीमध्ये हैद्राबादला जाण्याचा योग आहे. ( नक्की भागाचे नाव माहित नाही )
हैद्राबादला मोती चांगले मिळतात असे खुप जणांकडून ऐकले आहे. कोणाला काही अनुभव आहे का?
साधारण मोतींची किंमत काय असेल , म्हणजे क्वालिटी आणि किंमत यातला फरक कसा ओळखावा ?
किंवा अजून काय चांगले खरेदी करण्यासारखे आहे तिकडे...
प्लिज सांगाल का ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनीमामीच सांगू शकेल.
मी तरी तिथे गेल्यावर चारमिनारच्या आजूबाजूच्या परिसरातून बांगड्या, तसेच बिद्रीवर्कच्या वस्तू घेतो.

हाय मला संपर्कातुन मेल टाक.. काहि ज्वेलर्स चे डिटेल्स सांगेन.. आणि इतरही काही माहिती हवी असेल तरी कळव.. मी तिथेच रहाते..

चारमिनार जवळ लाड बाजार आहे तिथे खड्यांच्या बांगड्या सेट वगैरेही छान मिळतात. पटेल मार्केटमध्ये कपडे खुप स्वस्त मिळ्तात.

हाय, मंगतराय पर्ल्स बशीर बाग किंवा पत्थर गट्टी( चारमिनार जवळ) सीरीअस पर्ल खरेदी साठी.
जगदंबा पर्ल्स सर्व टूरिस्ट जातात. त्यांची वेब्साइट पण आहे. सर्व पर्ल्स बाहेरून येतात व इथे विकले जातात. ते आर्टिफिशली ग्रोन असतात. नैसर्गिक मोती नसतात. पण परफेक्ट राउंड असतात. खूप प्रकारचे नेकलेस सेटस, बांगड्या इत्यादी मिळतात. राखी रंगाचे, गुलाबी व सफेद मिळतात. तीन पदरी माला चार पदरी माळा बनवून मिळतात. तुम्ही घरी जाऊन तुमच्या आवडीने सोन्याची किंवा इतर पदके मणी चक्री वगैरे बसवून माला बनवू शकता. कानातली २५० रु. पासून पुढे चांगली मिळतात.
सेट्स ३००० पासून पुढे. अन इव्हन शेपचे पण मोती मिळतात. मला स्वतःला तांदुळाच्या आकाराच्या मोत्यांचा घोस असलेले कानातले फार आवड्तात. हल्ली दिसत नाहीत ते. जगदंबा सिकंद्राबाद मध्ये आहे तिथे इतर रंगीत खडे असलेले दागिने पण मिळतात. ऑनलाइन पॅटर्न बघूनही सिलेक्षन करता येइल.
अ‍ॅड मिन. स्टाफ कॉलेज तर्फे गेल्यास मंगत राय मध्ये डिस्काउंट मिळतो. बाकी चारमिनार जवळ फार बार्गेनिन्ग करावे. खास हैद्राबादी दागिने म्हणजे केसात घालायचे मोत्यांचे व सतलहरा वगैरे ज्यात सात पदरी माळ व मध्ये खडे असतात.
बरोबरीने इकत साड्या, इकत व कलमकारी ड्रेस मटेरिअल बिद्री वर्क, जरूर घ्या. लेपाक्षी मध्ये व कलांजली मध्ये भरपूर साड्या मिळतात. गदवाल साड्यांचे पण खास दुकान आहे. कोटी मध्ये. Happy

मला मागच्याच आठवड्यात आमच्या एका नातेवाईकांनी मोती आणून दिलेत. मोती लहान आकाराचे आहेत. मला डिझाइन्स हव्या आहेत सेट बनवण्यासाठी.

हैद्राबादहून महागाचा सेट आणला होता तो तीन चार वापरातच काळा पडला होता. नंतर मी हैद्राबादला रहात असताना मी आणि जाऊबाईनी मंगतरायकडून घेतलेले मोती १० वर्षानंतरही तसेच आहेत. खराब झाले नाहीत.

धन्यवाद सगळ्यांना छान माहिती मिळाली.
मंगतराय हे दुकान हैद्राबाद खुद्द शहरातच आहे ना म्हणजे पत्ता सहज मिळण्यासारखा आहे ना सहज Happy

<<जगदंबा सिकंद्राबाद मध्ये आहे तिथे इतर रंगीत खडे असलेले दागिने पण मिळतात. ऑनलाइन पॅटर्न बघूनही सिलेक्षन करता येइल. >> वेबसाईटची लिंक द्याल का प्लिज Happy

मंगतराय बेस्ट आहे पण खूप महाग आहे. माझ्याकडला सेटही १४ वर्षं झाली तरी छान आहे.

चारमिनारला भरपूर व्हरायटी आहे पण मजबूत बार्गेनिंग कर.

आईशप्पथ बार्गेनिंग मला कधीच जमल नाही. सहसा दुकानातूनच खरेदी करायला आवडते , कारण तिथे बार्गेनिंग नसत आणि मालही चांगला असतो. Happy

मोती महाल म्हणून दुकान आहे.. चार मिनारच्या इथल्या एका गल्लीत.. दुकानाचा पत्ता देतो... तिथून ६ वर्षापूर्वी आणलेले मोती फारच उत्तम आहेत अजूनही... आम्ही माळा आणल्या होत्या वेगवेगळ्या आकाराच्या मोत्यांच्या आणि मग त्याचे दागिने बनवून घेतले..

जगदंबा सिकंद्राबाद मध्ये आहे तिथे इतर रंगीत खडे असलेले दागिने पण मिळतात >>>> हे सध्या रिनोवेशन साठी बंद आहे..कदाचित दिवाळीपर्यंत परत सुरु होईल... त्याच्या समोरच राज ज्वेलर्स म्हणुन आहे.. ते ही छान आहे..

फारच छान माहिती आहे हो अश्विनिमामी. १० वर्षं पूर्वीचे सगळे आठवले. माझे सासर हैदराबाद चे आहे. माझे पति काही काळ हैदराबाद ला कामा निम्मित्त होते. तेंव्हा तिथे खुप जाणे व्हायचे. चार मीनार जवळ खुपच छान मोती मिळतात. बर्गेन करायला लगते, पण चीज चांगली मिलते. योगायोग म्हणजे आजच मी तिकडून आणलेला मोत्याचा सेट घातला आहे. १० वर्षं पूर्वी जसा घेतला तसाच दिसतो. तेंव्हा मी एक सेट राईस पर्ल चा घेतला होता आणि एक ओवल शेप च्या मोत्यांचा घेतला होता. दोन्ही अजुनही जसे च्या तसे आहेत. मी ते बरेचदा वापरते. काहीही झालेले नाही. तेंव्हा मी एक सेट साधारण रु. ७०० ला घेतला असेल. म्हणजे आता किम्मत साधारण २००० दरम्यान असेल. मोठी दुकाने खुप आहेत अबिड्स ला आहेत, मंगत राय पण आहे, पण तिथे खुप महाग असते. मोत्याची ते एक ओळख दाखवतात , हारातला मोती ते जालून दाखवतात. प्लास्टिक चे आवरण असेल तर मोती काला पडतो. पण खरा मोती तसाच रहातो. तिकडे, अनेक रंगात मोती मिळतात गुलाबी, ग्रे, काले. फारच छान दिसतात. मी कधी वापरले नाही, पण माझ्या जावे कड़े आहेत. खड्याचे सेट्स फारच ख़ास असतात. ते टिकायला चांगले असतात. फ़क्त पाणी लावायचे नाही. माझ्या बांगड्या जसा च्या तशा आहेत.

मुसलमानी स्टाइल ड्रेस मिलायचे ठिकाण म्हणजे " मीना बझार" हे मुख्य दूकान अबिड्स ला आहे, पण त्याच्या अनेक शाखा पण आहेत. तिकडे पाकिस्तानी एम्ब्रोयदारी चे सुन्दर ड्रेस मिळतात. पण शोधून घ्यावे लगते. महाग असतात. पण फारच सुन्दर असतात. माझा एक होता. खुप टिकला. इतर सर्व ड्रेस फार भड़क असतात. त्यातही काही चांगले मिळून जातात. बाकी कराची ची बिस्किट फारच छान. ती बिस्किट परवा मी ठाण्याला पण पाहिली. जुन्या ठाण्यात ब्राम्हण सभे शेजारी कुटीर उद्योग मध्ये मिळतात. कलांजलि मध्ये फार छान सिल्क आणि कोटन मिलते. किंवा लकड़ी का पुल जवळ काही दुकाने आहेत तिथे टिशु सिल्क चे ड्रेस चांगले मिळाले होते.

शानभाग मध्ये जावून डोसा नक्की खा. अगरवालची ( जो राजभवन रोड च्या कॉर्नर ला आहे ) कचोरी खा. आणि नॉन वेज खात असाल तर बिरयानी नक्की खा. फिरनी खा. मला हैदराबाद खुपच आवडले. तिकडे सगळे लेफ्ट सिग्नल फ्री आहेत. गोवलकोंदा नक्की बघा. अमिताभ च्या आवाजात सुन्दर लाइट एंड म्यूजिक शो बघा. त्यात दिवंगत जगजीत सिंग ह्यांच्या आवाजात फार सुन्दर गजल पार्श्वभूमी ला वापरली आहे.

मोहन कि मिरा... मस्तच
मला एक सांगा, सुट्टे मोती घेतले आणि ईकडे डिझाईन बनवून घेतले तर किती फरक पडेल ?
मंगतराय दुकानातून नुसतेच मोती मिळतील ? कितीला पडतील ?

जूई, मी hyderbaad मधेच रहते...आणि बरेच वेळा मोत्याची खरेदी पण करून झाली...
मंगतराय मला प्रचंड महाग वाटते....पण मोत्याची quality चांगली असली तरी किम्मत खूपच जास्त घेतात.

चारमिनार च्या मार्केट मध्ये काही चांगली दुकाने आहेत जे बार्गेन न करताही चांगला माल विकतात...मोदी perals आणि अजून एक दुकान (visiting कार्ड शोधून नाव कळवेन) जिथून मी हल्लीच बरेच दागिने घेतले.
अगदी ५०० पासून बेसिक एकपदरी सेट पासून दागिने मिळतात, बांगड्या मोत्याच्या दुकानातून घेऊ नका, त्याची वेगळी दुकान आणि बाजार आहे.

जुई ..
तिकडे फार छान डिजाईन मिलतात. इकडे आणून डिजाईन करता येइल, पण आर्थातच मुंबई मध्ये मजूरी जास्त आहे. मोती साधारण कोणी गाठवत ( म्हणजे सोने किंवा चांदित) नाहित, ते बांदलेलेच असतात. आपल्याकडे पण फ़क्त पदक गाठवायाची पध्धत आहे, पण सर मात्र बांधलेला असतो. त्यामुले मुंबई मध्ये एखाद्या पातव्या कडून बांधून घेता येतील. मग पोवली पण डिजाईन मध्ये घालता येतील. आर्थात तिकडे खुप छान छान प्रकार बघायला मिळतात. साधारणतः १००० ते १५०० पर्यंत सुटे मोती मिलातिल. तसेही मोती आपण स्वांत सुखाय म्हणून घेतो, ती काही इन्वेस्टमेंट नाही, कारण मोत्यांना resale value नाही.

खरा मोती खुप कठिन असतो आणि त्याचे पानी लगेच कलते. बाकी नकली / चाइना माल हां प्लास्टिक चा असतो. जालून बघण्याची कसोटी एकदम छान. खरा मोती पाण्यात घातला तर तरंगत नाही. खोटा प्लास्टिक चा असल्याने त्याचा रंग ही जातो आणि तो तरंगतो. खरे मोती नेहेमी mat फिनिश असतात, ते एकदम चक चकित दिसत नाहित. थोड़े dull असतात. पण एक वेगलेच तेज असते. खरा मोती हा आकाराने एकदम गोलाकार किंवा सगालिकडून सामान नसतो. शेवटी ती एक नैसर्गिक चीज आहे. पूर्वी आजीच्या कुड्या असायच्या त्या कशा mat दिसायच्या, तरीही तेजस्वी असायच्या. कानातल्या चे मोती मात्र नीट तपासून पहावेत. जर ते एका बाजूने चपटे असतील तर नकली समजावे. कोंदणात नीट बसावे म्हणून त्याचा आकार असा असतो. पण खरा मोती असे घासताना फुटतो. एक लक्षात ठेवा मोती हा एका किटाका पासून बनला आहे. जसा रेशमाचा ककून असतो त्याला एक टोक असते आणि ते टोक जर बरोबर ओढले तर एक संघ धागा मिलतो. ते रेशीम अतिशय महाग असते. तसेच मोत्याचे आहे. शिपलित गेलेल्या एका पाण्याच्या थेम्बा पासून मोती बनतो तो एकसंघ असतो. त्याला एके ठिकाणी मधे थोड़े नरम असते. म्हणजेच त्याची तालु असते. जानकारनाच ती जागा कलते. तिकडेच ओवन्या साठी भोक पडल जात. जराही इकडे तिकडे जोरात घसले तर मोती तुटतो.

खरे आहे मी अजूनही एकही मोत्याचा सेट घेतलेला नाही कारण मला ती चांगली गुंतवणूक वाटत नाही. मी तरी वामन हरी पेठ्यांकडून सोनेच घेते. फक्त आलेल्या पाहुण्यांस दुकानात नेणे एवढेच करते. खरे तर इथे तेलुगु स्टाइलची नवरत्न अंगठी किंवा पदक मिळते ते घेण्यासारखे आहे. सोन्यातली व्ही आकाराची खास अंगठी पण इथे मिळते. खास इथला प्रकार म्हणून.

अश्विनी मामी

थोड़े विषयांतर : सोने प्रत्यक्ष घेण्या पेक्षा आज काल गोल्ड bond मध्ये गुन्तावनुक करणे चांगले आहे. अनेक चांगले गोल्ड bond आहेत. प्रत्यक्ष सोने ठेवणे जिकरिचे असते. आणि नाणी किंवा वले घेतले तरी त्यात थोड़ी तरी घट जातेच. परत ते locker मध्ये ठेवायचे. म्हणजे ते manage करणे आले.

आर्थात हे एक आर्थिक सल्लागार म्हणून सांगणे. प्रत्येकाची आवड वेग वेगली असते.

मस्तच ग... मोहन कि मिरा... खरच छान माहिती दिलीस.... Happy
माझ्याकडे एक मोत्यांची नथ सोडली तर ईतर मोत्यांचे दागिने नाहि आहेत, सगळे सोन्याचे. पण मला मोत्यांचा सेट , कानातले फार आवडतात. आता नवरात्रीत खुप जणींनी घातलेले, ते बघून मला पण खुपच ईच्छा झाली आहे, त्यात मैत्रीणीने सांगितले हैद्राबादला जातेस आहेस तर तिथूनच मोती , नाहितर छानसा सेट घेऊन ये.
फक्त एक आवड म्हणून घ्यायच आहे. मी कधी मोतींच्या दागिन्यांची खरेदी केली नाही, नाहि याच्यातल मला काहि कळत. नाहितर वस्तू असायची शंभराची आणि मी देऊन येईन दोनशे रुपये अस नको व्हायला म्हणून हा सगळा खटाटोप.

Pages