"हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...!
ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"
"गड कसा पाहावा याचं एक तंत्र आहे. तो धावता पळता पहाता उपयोगाचा नाही. त्याची भौगोलीक पार्श्वभूमी, त्याचं नकाशातील स्थान, संरक्षणदृष्ट्या त्याचं महत्वं, त्याच्या जवळ असलेले घाट, मैदान, खिंडी, पठार, नद्या, ओढे, रणक्षेत्र, त्यावर चढायचे मार्ग, त्यावरून दिसणारा प्रदेश, त्या प्रदेशातील किल्ले, शिखरं, त्यांची मजबूती, त्यावरील पाण्याची ठिकाणं-हौद, तलाव, त्याचे तट, त्याचे बुरूज, त्याची प्रवेशद्वारं.... हे सगळं कसं नीट तपासलं पाहिजे, तरचं त्याचं महत्व ध्यानी येतं. धावता पळता किल्ला बघायला तो काही भोज्जा नव्हे ! धावता पळता त्याला नुसतं शिउन जाणं म्हणजे त्याचाही अपमान, आपलाही"
... गो. नी. दांडेकर
गड, दुर्ग,किल्ले, शिवाजी महाराज हे तर रक्तातच आहे. माझ्या या बाबत काही वेगळ्या कल्पना ही आहेत. मी माझ्याहुन गडावरील दगडमातीलाच भाग्यवान मानतो..
गो. नी. दां.चे माझी दुर्गभ्रमण गाथा वाचुन या गड, दुर्गांविषयी काही करण्यासाठी रक्त उसळ्या घेऊ लागले आणी सुरु झाला ते काही शोधाण्याचा प्रवास......
या शिव पुण्यतीथीला रायगडावर दुर्गवीर च्या संतोष हासुरकरशी ओळख झाली होती, अनायसे त्याचा फोन आला, मानगडावर संवर्धनाचे काम सुरु आहे १ मे ला येनार का?
पटकन होकारा दिला.
शनिवारी सांयकाळी ४ वाजता,पनवेल स्टेशन गाठ्ले. दुर्गवीर चे वीर हजर होतेच मग मांडवी गाडी पकडुन सांयकाळी ७.३० ला मानगाव स्टेशनला पोहोचलो. बाहेर अंधारुन आले होते.( रात्र झाली होती ना)
प्रचि १
तेथुन सहाआसनी क्षमता असलेला आणि नऊ आसनांना त्यांच्या सामानासकट सामाऊन घेऊन आपले मन किती मोठे आहे हे फक्त १५० रु. घेउन रीक्शावाले काका निघाले. तसा हुशार आणि बाळसेदार असलेला मी
काकांच्या बाजुला बसलो आणी मागच्यांची आसन ग्रहण करण्यासाठी कवायत सुरु झाली 
अर्ध्यातासात निजामपुर नाक्यावर पोहोचलो,
( निजामपुर हे मानगड परिसरातील वाड्यांचे बाजाराचे गाव आहे)
गरमागरम चहा घेऊन, बोरवाडीकडे जाणारी दुसरी सहाआसनी रीक्शा पकडुन तीच कवायत पुन्हाकरुन निघालो ते सरळ बोरवाडीच्या दिशेने.
बोरवाडीतुन एक कि.मी. पायपीट करत मशीदवाडीच्या ( मानगडाचे पायथ्याचे गाव ) दिशेने. रस्ता डांबरी आसल्याने अजुन ट्रेकिंगचा फील आला नव्ह्ता. पण बाजुची घनदाट झाडी आणि मातीच्या सुगंध शहरीपणाचा मुखवटा ऊतरवण्यास सांगत होता. बोलता बोलता मशीदवाडी आली आणि तेथे मानकरांच्या घरात रहाण्याची सोय केली होती. गरमागरम पीटलं भात खाऊन सकाळ होण्याची वाट पहात डोळ्याची शटर बंद झाली 
पहाटे ५.३० लाच संतोष ने गजर केला आणी चहा पाणी घेउन बाहेर आलो.
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४. हा प्रकार मी पहील्यांदा पाहीला . काठीला झेंडे आणि मोरपीसे लावली होती
बाहेर आलो ते उजव्या बाजुला हा उभा,
आपली राकट पण ऊदासवाणी नजर माझ्याकडे रोखत म्हणतो कसा आज वेळ मिळाला तुला.
साडेतीनशे वरुस झाल,मांग माझी सेवा करुत होतास,
माझी रखवाली करुत होतास तवा माझ्या तटा बुरुजांवर ऊभा राहुन ह्या सह्याद्रीच्या कड्याकपार्यातुन झेपावणार्या,वार्या पावसाला पीत होतास. माझ्या अंगाखांद्यावर पड्लेल्या महाराजांच्या पावलांखालची धुळ भाळी जोतीबाचा भंडारा म्हणुन लाऊन घेत होतास...... जसे महाराज्यांच्या भोवती तानाजी, बाजी, जीवा तसा मी , सोनगड , लिंगाना, कुर्डुगड रायगडा भोवती त्याच रक्षण करित होतो, गनिमाची काय बिशाद आमाला ओलांडुन रायगडाकडे जायची.
शिमग्या, दसर्याला आमीबी सजत होतो, तोरण पताका अंगावर मिरवत होतो.
महाराज छत्रपती झाले तवा माझ्या वरुन तोफांची सरबत्ती केली गेली.
महाराज आजोबा झाले,संभाजी महाराजांना पुत्र झाला त्या शाहु महाराजांचे जन्मस्थान माझ्याच पंचक्रोशीत.
या सोनेरी दिवसांचा साक्षिदार मी......... बघ माझे हाल काय झालेत.........
सन १८१८च्या जुन महीन्यात. अंग्रेजांचा मेजर प्रोफेट तोफा घेउन आला आणि महाराजांची ही निशाणी मिटवायला निघाला अख्खा दिवस माझ्यावर तोफगोळे डागत राहीला तरीपण मला नाही संपवु शकला.....
सर्व पडझड झाली, उजाड झालं, तट्बुरुज ढासळले, महाव्दार कोसळले, सर्व वैराण झालं तरीबी मी वाकलो नाही आणि वाकणार नाही, कधीच वाकणार नाही !!!
आमी बी महाराजांच्या तालमीत तयार झालोत वाकायला शिकलो नाहीत........ मी असाच उभा राहीन्,उना पावसाला ललकारत पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत महाराजांच्या कार्याची जाणिव करुन देत.
पण येक सांगतो पोरा मला विसरु नका. तुमचं तुमच्या बापजाद्याचं रगत ईथे सांड्ल आहे, त्याला कवडीमोल होऊ देऊ नका..............!!!
आता कधी गडावर पोहोचतोय अस झालं.
प्रचि ६
आता पायवाट सुरु झाली ,पायवाट कसली कातळ कडाच तो थोडी चढण सुरु झाली मोठे दगड पायाखाली लागुलागले, ते कधी काळी पायर्यांचे चिरे असल्याच्या खुणातर दिसत होत्याच.
चालता,चालता थोडा ईतिहास आठ्वु लागलो. या सर्वाचा थोडा ईतिहास म्हणजे २५०० वर्ष सातवाहनां पासुन सुरु होतो.
कोकणातील दुर्गांनी सातवाहन, राष्टकूट, शिलाहार, बहमनी, आदीलशाही , मोगल आणि मराठयांची राजवट पाहीली.
कोकणातील बंदरावरुन आलेला माल वरघाटी सुरक्षित पोहोचवण्यासाठी सातवाहन काळी ज्या दुर्गांची र्निमीती झाली. त्या पैकी एक मानगड.
काळगतीने मानगडाचे महात्म्य नंतरच्या काळात कमी झाले पण महाराजांनी त्याचे महत्व ओळखुण् त्याची पुनर्बांधणी केली.
रायगड जिल्हातील माणगावच्या ईशान्येस १३ कि.मी. वर मशीदवाडीच्या सीमेवर ४४ मी. लांब व १० मी. रुंदीचा हा लहान कोट आहे त्याची तटबंदी त्रिकोणी असून गडमाथ्यावर एक दर्गा, व पाण्याच्या ९ टाकया व धान्यकोठाराची कोरीव गुहा आहेत.
आता पायर्या कम दगड संपले.
प्रचि ७
आता समोर दिसु लागला मानगडाच्या तट्बंदीचा बुरुज.
प्रचि ८ बुरुज
प्रचि ९
प्रचि १०
आणि पोहोचलो मानगडनिवासिनी विंजाई मंदिरासमोर
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
या मंदिराच्या समोरुन गडावर वाट जाते ही वाट आम्हा पामरांना थोडी कठीण वाटते 
थोडा तोल सांभाळत पंचवीस एक फुट वरती गेलो की मग लागतो महादरवाजा
प्रचि १४
महादरवाजा पुर्णपणे ऊध्वस्त झाला आहे.
प्रचि १५ ऊध्वस्त महादरवाजा मीन ( मत्स/मासा)
आता ओळख परेड करुन महाराष्ट्र दिना निम्मीत्त गड साफसफाई व सजावट आदी कामांची विभागणी केली गेली आणि माझ्याकडे आल टाकं साफ करण्याच काम. अर्थात पुर्ण गड पाहुन कामाला मग कामाला सुरवात करायची होती पहायला गेलंतर गड तसा लहानच २० मिनीटे बास होतील पण जर प्रत्येक दगडाशी बोलुन त्याच्या दु:खावर फुंकर घालायला त्याचा ईतिहास विचारायला गेलंतर २० जन्मपण कमीच पडतील.
टाक्याकडे जाता जाता गड बघणही सुरुच होत म्हणा.
प्रचि १७ धान्यकोठाराची कोरीव गुहा.
प्रचि १८ गुहेतील टाकं
प्रचि १९ गुहेबाहेरील टाकं सातवाहन काळाच्या खुणा दाखवते आहे. हे सामान्य विहीरी सारखे खाली खोलवर न खोदता आडव आत पर्यंत खोदले आहे व आधारांसाठी आत खांब सुद्दा आहेत.
प्रचि २०
प्रचि २१ कामाला सुरवात . अरे बोल बजरंग बली की जय......................
प्रचि २२
प्रचि २३ या टाक्यातल पाणी काढता काढता अंगातुन पण पाणी निघु लागलं
नंतर दुसर टाक पण यात पाणी नव्हतं फक्त सुका गाळ माती हे तर पहील्या पैक्शा लय भारी, धुळ माती
नाका तोंडात जात होती वर त्या माती मुळे अंगाची खाज सुरु झाली 
बर्यापैकी ( म्हणजे शहारात रहाणार्या अंगमेहनत न करण्यार्या किंबहुणा जेवल्यावर स्व:ताचे ताट ही न ऊचलनार्या शहरी बाळांच्या मानाने बर्यापैकी) काम झाले होते. मी पाणी घेण्यासाठी बाहेर आलो आणि,
टाक्यात आरडाओरडा सुरु झाला जाऊन बघतो तो काय हे साहेब एकाच्या फावड्या खाली आले होते.
प्रचि.२४
साहेब तर छोटेच होते आणि मार लागल्यामुळे काही वेळातच गतप्राण झाले
या मुळे काम थांबवुन
त्याचे यथोचित अंतिमसंस्कार करण्यात आले.
आता कामाची वेळही संपत आली होती. त्यामुळे परत मंदिराजवळ जाण्याचा र्निणय घेण्यात आला.
खालीही बर्यापैकी काम चालले होते.
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३२
महाद्वाराजवळ शिवप्रतीमेचे पुजन व आरती करण्यात आली.
पुन्हा गडाच्या माथ्यावर जाऊन ढोलकाठी वर भगवा चढविण्यात आला.
प्रचि ३३
सर्व पुजन आटोपुन परतीची सुरवात झाली खाली मानकरांच्या घरी अजुन काहीतरी आमची वाट पहात होते.
जेवनाचा कार्यक्रम झाल्यावर शेजारचे आजोबा त्यांच्या बापजाद्यांची भवानी घेऊन आले होते फक्त आम्हा मुलांना दाखवण्यासाठी.
प्रचि ३५ .
यात मानगड बघा कसा दिसतोय, बघा त्याची ती काळी कभ्भींन्न छाती अभिमानाने फुगली आहे.
का नाही आज जवळ जवळ १९३ वर्षानी त्याच्यावर गुडी तोरणे ऊभारली गेलीत, भगवा जरीपटका फडकला होता.
मला तर त्याचा प्रत्येक दगडांदगड रोमांचीत झालेला दिसत होता, तुम्हाला नाही दिसणार ते पहायला तुम्हाला माझ्या बरोबर मानगडावर श्रमदानासाठी यावे लागेल.............
प्रचि ३६
हो ही तर सुरवार आहे.......................



अनोखा गड, खरंच.
अनोखा गड, खरंच.
मस्त वर्णन व प्रकाशचित्रे
मस्त वर्णन व प्रकाशचित्रे
चांगला उपक्रम करत आहात
ईनमीन तीन
धागा सार्वजनिक केलात तर इतर लोकही वाचू शकतील.
मस्त वर्णन, फोटोज आणि चांगला
मस्त वर्णन, फोटोज आणि चांगला उपक्रम

धन्स ईनमीनतीन
धागा सार्वजनिक केलात तर इतर लोकही वाचू शकतील.>>>>अनुमोदन
सुंदर वर्णन्,प्रची अन तुमचा
सुंदर वर्णन्,प्रची अन तुमचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे.
धागा सार्वजनिक केलात तर इतर
धागा सार्वजनिक केलात तर इतर लोकही वाचू शकतील.>>>>अनुमोदन
>>>>>krupaya kas te sanga
व्वा खूपच छान रे... नि शेवटचा
व्वा खूपच छान रे...
नि शेवटचा फोटो तर.. मस्तच..
बाकी संपादन मध्ये जाऊन सर्वात खाली सार्वजनिक वरती टिकमार्क कर...
मानगड बरोबर पन्हाळेदुर्ग आणि
मानगड बरोबर पन्हाळेदुर्ग आणि कुर्डूगड हि करता येतो
रायगड दिसला का ?
धागा सार्वजनिक केलात तर इतर लोकही वाचू शकतील.>>>> आमचंही अनुमोदन
लिखाण आणि प्रची आवडल्या
सर्वांना धन्स रे धागा
सर्वांना धन्स रे धागा सार्वजनिक केला आहे झाला का बघा

सारन्ग - कुर्डूगड पायथा बघुन आलो गड बाकी आहे आता एकत्र जावुच.
रायगड दिसला का ? >> होना ट्कमक टोक
"हे दुर्ग म्हणजे काही
"हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला,' सहि आहे.' सुदर फोटो आणि वणन'
"हे दुर्ग म्हणजे काही
"हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवण आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला,' सहि आहे.' सुदर फोटो आणि वणन'
मस्त. छान लिखाण रे! फक्त
मस्त. छान लिखाण रे!
फक्त ...प्रचि १५ ऊध्वस्त महादरवाजा मीन ( मत्स/मासा)... हे समजले नाही.
प्रचि १५ ऊध्वस्त महादरवाजा
प्रचि १५ ऊध्वस्त महादरवाजा मीन ( मत्स/मासा)... हे समजले नाही.>>>>>> हेम ध्न्स
महादरवाजावर कमळाला लागुनच मासा कोरलेला आहे त्यामळे हा महादरवाजा सातवाहन काळा नंतर माझ्या अनुमाना प्रमाणे चोल किंवा शिलाहार कालीन असावा.

सही रे...
सही रे...
वर्णन व प्रकाशचित्रे सुंदर .
वर्णन व प्रकाशचित्रे सुंदर . गड स्वछता मोहीम स्फुर्तीदायी
धन्यवाद !
सुंदर उपक्रम... माझा हा
सुंदर उपक्रम...
माझा हा किल्ला झाला नाहीये... एकदा उपक्रमात भाग घ्यायला हवा..
मला अजून एक माहीती हवी होती.. मानगडावरूनच एक वाट कुंभ्या घाटाने वरती घाटमाथ्यावर चढते आणी पुढे नक्की माहीत नाही पण घोळ गावात किंवा गारजाईवाडीत जाते..असल्यास ह्या वाटेची माहीती हवी होती...म्हणजेकी घाटवाट चढायला किती वेळ लागेल, वाटेत पाणी आहे का, घाट चढून गेल्यावर घोळ गावात पोचायला किती वेळ लागेल इ.इ... जर तुला माहीती असेल तर देणार का? जर नसेल तर पुढच्या अभियानाच्या वेळेला गावातून माहीती मिळवणार का?
कुंभ्या घाटाने वरती चढून पुढे बोचेघोळ घाटाने परत खाली ऊतरायचा प्लॅन आहे आणी त्याचे सध्या लॉजिस्टीक्स चालू आहेत. तुझ्या कडील माहीतीचा खूप ऊपयोग होईल....
इनमिनतीन, संतोष ला मी देखील
इनमिनतीन, संतोष ला मी देखील ओळखतो, गेल्याच दिवाळीत आम्ही सांताक्रुझ येथे शिवकालीन शस्त्रांत्रांचे प्रदर्शन भरविले होते, तेव्हा ओळख झाली होती
आणि तुम्ही केलेले कार्य तर स्तुत्यच आहे
ईनमीनतीन, दुर्गवीरांच्या
ईनमीनतीन,
दुर्गवीरांच्या उपक्रमावरून दिसतंय की महाराष्ट्र जागा होतोय! त्रिवार अभिनंदन!
आ.न.,
-गा.पै.
ईनमीन मस्तच... तुझे आमंत्रण
ईनमीन मस्तच... तुझे आमंत्रण मिळुनही नाही येऊ शकलो, याचे शल्य सदैव मनात राहिल.
आनंद,दादाश्री,पैलवान
आनंद,दादाश्री,पैलवान



@स्वच्छंदी - मानगडावरूनच एक वाट कुंभ्या घाटाने वरती घाटमाथ्यावर चढते >> अगदी बरोबर बाकीची माहीती लवकरच देतो.
@ vaibhav - मग आता भेट होईलच.
@ इंद्रा चिंता नको आता लवकरच नवीन आमंत्रण देतो. या वेळेला नक्की यायचं