Submitted by रैना on 5 October, 2011 - 19:35
गेली चार तरी वर्षे मी नित्यनेमाने घाटीच्या ट्रेक्सच्या जाहिराती चवीने पाहते. या(ही)वर्षी न जमण्याची काही ना काही तजवीज लहान मूल, पावसाळी आजारपण, नोकरी, तब्येत, सुट्ट्या, खर्च, कंटाळा, भीती, inertia यातील एक किंवा सर्व घटक आपसूक करतात. यावर्षी कसे कोण जाणे, बर्याच प्रापंचिक अडचणी येऊनही, जमलेच. हाच एक मोठ्ठा धक्का. तो पचवून तयारीला लागले.