तुम्हे याद हो के न याद हो - अंतिम भाग

Submitted by बेफ़िकीर on 4 October, 2011 - 10:30

'तुम्हे याद हो... के न याद हो' ही कादंबरी आज संपली. या कादंबरीला प्रोत्साहन देणारे, स्पष्ट प्रतिसाद देणारे व वाचक या सर्वांचा मी आभारी आहे. अर्थातच, मायबोली प्रशासनाचा ऋणी आहेच, की माझी आणखीन एक कादंबरी समाविष्ट होण्यास परवानगी दिली.

-'बेफिकीर'!

+++++++++++++++++

हॉटेल सन्मानमध्ये सलग तीन दिवस तीन रात्री काढून, किमान पाच वेळा शिर्केंना भेटून आणि प्रत्येक संध्याकाळ जुनैदमियाँच्या खर्चाने घालवून आज चवथ्या सकाळी सर्वांचे योजनेवर एकमत झालेले होते आणि पहिले पाऊल उचलायला सगळे तयारही झालेले होते.

साहसी योजना होती, पण त्याशिवाय काही पर्यायही नव्हता.

उमेशला जीवाला जीव देणारे मित्र मिळाले होते हेच खूप होते. नाहीतर असली कोणतीही योजना मनातही आली नसती त्याच्या!

मात्र.... योजना मित्रांनी केलेली नव्हती. शिर्क्यांनीही केलेली नव्हती! योजना होती जुनैद मियाँनी केलेली!

ती योजना पचनी पडायलाच हे तीन दिवस आणि तीन रात्री गेलेल्या होत्या. हीच योजना सफल व्हावी यासाठी राजे शिर्क्यांकडे हे तिघे अनेकदा जाऊन आले होते. आणि राजे शिर्के दरवेळेस दणदणाटी हसून पोरांचे कौतुक करत होते. दुपारचे जेवण राज्यांकडे आणि रात्रीचे जुनैदमियाँतर्फे असा प्रकार चाललेला होता. खिशात असलेला पैसा वापरण्याचीही वेळ येत नव्हती. रोज दुपारी दोन ते संध्याकाळी सहा अशी किरकोळ वामकुक्षी घेत होते चौघे! रात्री मात्र तीन तीन वाजेपर्यंत जागून चर्चा आणि टवाळी करत होते. आणि तिकडे नितुच्या घरी एकालाही कल्पना नव्हती की उमेश पुन्हा पुण्याला गेलेला नसून इथेच आहे. त्यात त्याचे ते नेहमीचे यशस्वी मित्रही आलेले आहेत आणि जुनैद मियाँही त्यांना सामील झालेले आहेत.

जी शक्ती पुण्यात एकवटता आलेली नव्हती ती अचानकच औरंगाबादमध्ये एकवटता आली.

हा सगळा 'दिल का मामला' होता. यात व्यवहाराला शून्य किंमत होती.

आणि आत्ता सकाळी अकरा वाजता सगळे काय करत होते तर ......

... निवेदिताच्या घराच्या दाराची बेल वाजवत होते...

+++++++++

दार उघडून दारात उभी राहून नितुची आई भयानक धक्का बसून या चौघांकडे पाहात होती.

"तुम्ही?????? इथे???? ... "

"निवेदिता कुठे आहे??"

हा प्रश्न कोणी विचारावा? तर राहुलने!

त्याच्याकडे जळजळीतपणे पाहात आई म्हणाली.

"गजाआड जायचंय बहुतेक परत? आं?? मी फोनच करते"

अपेक्षेप्रमाणेच आपटेंना कळवायला आई आत वळली मात्र वळताना तिने यांच्या तोंडावर सरळ दार लावूनच घेतले.

अपमानीत होण्याचा प्रश्नच नव्हता कारण हे अपेक्षितच होते आणि इथे काही मानसन्मान मिळणार नव्हता अपमानीत वाटायला!

शांतपणे चौघे तिथेच ओसरीवर बसले. दार आतून बंदच होते. आई कोणाशीतरी फोनवर बोलत असल्याचे स्पष्ट समजत होते, फक्त काय बोलत आहेत ते कळत नव्हते. त्यांच्या स्वरात घाई आणि संताप असावा!

काय होणार ते माहीतच होते. केवळ दहा मिनिटांत आपटे येतील आणि त्यांच्याबरोबर स्टाफही असेल! प्रत्येकाला जबरी फटके टाकत चौकीवर नेतील. त्या आधीच .... ते व्हायला पाहिजे...

.... आणि.... झालेही... चक्क झालेही..

घराच्या मागे असलेल्या गल्लीतून पंधरा एक मुसलमान बाहेर आले आणि सरळ या चौघांबरोबर ओसरीपाशीच थांबले. मग हळूहळु आणखीन काही मुस्लिम लोक आले. त्यानंतर आणखीन काही... आणि मग... आणखीन थोडेसे...

आता खिडकीतून आईही घाबरून बाहेर बघायला लागल्या... कारण बाहेर जवळजवळ बावीस पंचवीस मुसलमान आणि हे चौघे होते.

आपले घर अती संवेदनशील भागात असून मागची संपूर्ण मोठीच्या मोठी गल्ली ह्याच लोकांची आहे हे त्यातही आईंना जाणवले. नेमकी आत्ता निवेदिता यायला नको होती. नाहीतर काय झाले असते कोणास ठाऊक?

त्यातच एका बाजूने आणखीन सहा जण आले. हे मात्र हिंदू होते आणि पहिलवानासारखेच वाटत होते. हे राजे शिर्क्यांच्या तालमीतले मल्ल होते. तेही येऊन गेटपाशीच थांबले.

आणि तेवढ्यातच.... विड्याने ओठ रंगलेले आणि अतिशय मिश्कील डोळे असलेले जुनैद मियाँ सगळ्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले.

पायाखालची वाळूच सरकली आईंच्या!

हा प्रकार काय आहे ते आता सहज लक्षात यायला लागले होते. किडनॅपिंग! किंवा दहशत पसरवून मुलीला उचलणार!

देवापुढे लोटांगण घालत आईने पुन्हा फोन फिरवला तेव्हा उत्तर मिळाले की साहेब केव्हाच निघालेले आहेत आणि इतक्यात पोचतीलच ! तिकडचा पोलिस पुढची चौकशी करू लागला तेव्हा आईंनी फोन ठेवलेलाही होता.

कुठून औरंगाबादला बदली करून घेतली आणि त्या अख्तरमियाँच्याच समाजापाशी नेमके येऊन राहिलो आणि कुठून ते राजे शिर्के मधे पडले असे आईंना होऊ लागले.

हे चौघे मात्र आत्ताही घाबरलेलेच होते.

त्यातच आईंनी बाहेर पाहिले तर एक काळा कोट घातलेला मुस्लिम माणूस उपटला!

लॉ!

सरळ होते, नितुच्या बाबांना विरोध करण्यासाठीच हा वकील आलेला असणार होता. आणि त्याच क्षणी....

.... रस्त्याच्या वळणावर एक मोटरसायकल आणि एक आपट्यांची स्कूटर वळताना दिसल्या. एकंदर चार स्टाफ आलेला होता. आणि तो इतक्या लहान जमावासाठी सहज पुरेसा होता. त्यात स्वतः सब इन्स्पेक्टर असलेले आपटेही होते.
++++++++++

"बात इस नाचीजसे कीजिये साहब, मामला कानूनका नही, मुहोब्बतका है"

संतापातिरेकाने ओसरीवर बसलेल्या उमेशकडे धावत असलेल्या आपटेंच्या मधे आलेल्या जमावाला शांत करून मियाँनी मधाळ हासत वाक्य टाकले. आणि त्याच क्षणी आपटेंचा हात हवेत गेला. एक जबरदस्त तडाखा मियाँना बसणार हे जाणवताच जमावाने तो हात हवेतच धरला. अर्थातच बाकीचा स्टाफही आक्रमक झाला आणि जमावही.

औरंगाबाद जिल्ह्यातच काय, महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही असे एक दृष्य बघायला मिळाले.

घराचे दार अजूनही आतून बंदच, चारही पोरे हादरून ओसरीच्या भिंतीला चिकटून उभी राहिलेली आणि मुस्लिम जमाव स्टाफ आणि त्यांच्या मध्ये, मियाँ अजूनही मिश्कीलच हासत आहेत आणि शिर्क्यांच्या मल्लांनी स्टाफला धरून ठेवलेले आहे.

प्रत्येकजण 'आत' जाणार होता प्रत्येकजण !

जबरी आरोप होणार होते एकेकावर!

हड्डीपसली एक होणार होती एकेकाची!

कुठून ही नको ती अक्कल सुचली असे वाटू लागणार होते.

आयुष्यात पुन्हा डिपार्टमेंटबाबत मनात असा विचारही येऊ शकणार नव्हता.

चवताळलेले आपटे समोर उभ्या असलेल्यांना लाथा घालू लागले तरी मल्लांनी त्यांना धरूनच ठेवले.

काही झाले तरी आपटे हे अधिकारी होते आणि खात्याचा 'त्यातला' चांगलाच अनुभव पाठीशी होता. दोन मल्लांनी धरलेले असूनही आपट्यांनी स्वतःचेच डोके मागे आपटून एका मल्लाचे नाक फोडले तसा तो हेलपाटून मागे झाला आणि त्याची ग्रीप सुटली.

ते पाहून मात्र बाकीचे चवताळू लागले. मात्र सुटलेल्या आपट्यांनी एक हात होल्स्टरवर ठेवताच .... वकील पुढे झाला..

"बिटियाकी उम्र क्या है ऑफीसर? कुछ उसे भी सोचने दो"

खाड!

वकील हेलपाटून खालीच पडला त्या थपडीने!

"आरामसे बात करने आये है हम लोग... पीछेका मुहल्ला हमाराही है... पडोसियोंसे इस तरह पेश आते हो आप? या फिर हम इस्लाम मानते है इसलिये हमारी नस्ल मिटादेना चाहते हो?"

आवाज खर्जातला, डोळे भेदक आणि रोखलेले, शरीर अवाढव्य, स्वरात नम्रता असली तरी ती खोटीच आहे हे स्पष्ट करणारी हुकुमत आणि .......... समोरच्या तुच्छ लेखणारा चेहरा!

या मुस्लिम माणसाने काढलेला मुद्दा फारच भिन्न होता. औरंगाबादला आल्याच्या चवथ्याच दिवशी मानहानीकारक पद्धतीने बदली करून घेण्याच्या पोटेन्शिअलचा मुद्दा होता हा!

पोलिसांच्या कामगिरीला हिंदू मुस्लिम रंग उगाचच लागायला नको होता, पण हा माणूस नेमका तोच रंग लावत होता.

आपटे काही बोलायच्या आतच इतर स्टाफपैकी एकाने त्या माणसाला शिव्या दिल्या आणि म्हणाला...

"************ मुलगी आणि मुलगा हिंदू आहेत ... तू कशाला ** **********"

पडलेला वकील उठून उभा राहिला होता. आता त्याचा संताप झाल्याने त्याने पटकन लहान डायरीच काढली कोटाच्या खिशातून, आणि त्यावर मोठ्याने बोलत लिहू लागला...

'हवालदार कामटेने अस्लमसाहबको सूव्वर की औलाद गाली देदी'

आत्तापर्यंत मल्लांपासून सुटलेले आणि चवताळलेले हवालदार वकीलाला तुडवायला पुढे होणार त्यातच आपटेंनी पहिले जुनैद मियाँना धरून ओढले. मगाशीच घराचे दार उघडून बाहेर आलेली नितुची आई हवालदिलपणे आपटेंना आवरत वगैरे होती.

मात्र खेचले जात असलेल्या मियाँनी त्याही परिस्थितीत मिश्कीलपणा कायम ठेवत तोल सावरता सावरता वाक्य टाकले.

"कौनसे कानूनके तहत हमपर जुल्म ढा रहे हो सरजी... इस शहरमे पचास फीसदीसे उपर आबादी हमारी है"

शेवटी मियाँनीही त्याच मुद्याचा आधार घेतला.

पण हे सगळे वेडेपण होते. केवळ राजे शिर्के आणि मुस्लिम धर्मीय यांच्या जीवावर पोलिसांशी पंगा घेणे अक्कलशून्यपणाचे लक्षण होते. शेवटी पोलिस एखाददोन असले तरी त्यांच्यामागे सरकार असणार होते.

ही जाणीव सर्व स्टाफला तर होतीच! त्याचमुळे त्यांचा आत्मविश्वास दसपट जास्त होता आणि तोच आत्मविश्वास पाहून जमाव आता गळाठलेला होता. आपटेंनी फोन करून व्हॅन मागवेपर्यंत बाहेर तीन स्टाफने अनेकांना फटके टाकले. हे पाहून त्यातील बहुतेकजण पळत सुटले आणि या चार पोरांच्या डोळ्यासमोर आता अंधारी यायची वेळ झाली.

बघता बघता बाजीच पालटली. सगळे कुठल्याकुठे पोचले होते प्रकरण! तारुण्याच्या जोषात शिर्केंना ऐकवून घेतला गेलेला निर्णय चुकीचा ठरत होता. घरच्या कोणाशीही कन्सल्ट न करता जुनैद मियाँचे ऐकल्याचा आता पश्चात्ताप होण्याची वेळ आली होती. आप्पा, विन्या आणि राहुल तर स्वतःची कामे सोडून इथे उगाचच येऊन पडीक राहिलेले होते आणि आता ह्यात ओढले गेलेले होते. सगळ्यांनाच जन्माची अद्दल घडणार होती.

त्यातच नितुच्या आईने पुढे येऊन खाडकन उमेशच्या तोंडात वाजवली. आता तेथे फक्त शिर्केंचे मल्ल आणि स्वतः मियाँ राहिलेले होते. ते मल्लही मारच खात होते पण पळून जात नव्हते. उमेशला नितुच्या आईने मारलेले पाहून एक पोलिस पुढे झाला आणि त्या चौघांनाही बडवू लागला. विन्या किंचाळत होता कारण त्याच्या पोटरीत सट्टकन एक लाठी बसलेली होती.

हादरून खलास झालेले होते चौघे! त्यातच फोन आटोपून बाहेर आलेल्या आपटेंना ही बदललेली परिस्थिती पाहून स्फुरण चढले. त्यांनी स्वतंत्रपणे ह्या चौघांना आणि मियाँला बडवायला सुरुवात केली.

शिव्यांचा भडिमार करत आपटे कर्दनकाळासारखे चौघांना फटके टाकत होते.

आता व्हॅन येईपर्यंततरी असाच मार खावा लागणार अशी दुर्दैवी खात्री सगळ्यांनाच झालेली होती.

आणि..... आली...

.... व्हॅन नाही...

... निवेदिता!

रस्त्यावरून येथले दृष्य पाहून धावतच सुटली ती घराकडे!

या भानगडीत एक प्रकार झाला. खुद्द साह्बांची मुलगी, जिच्यावरून हे रामायण चालू होते, तीच आलेली दिसल्यावर मागच्या गल्लीतल्या बायकासुद्धा हळूहळू तेथे जमू लागल्या. ते पाहून पळून गेलेले मुस्लिम लोकही पुन्हा हळूहळु येऊ लागले.

किंचाळत आणि रडत निवेदिताने बाबांना धरले. उमेशला आणि कोणालाच मार बसू नये म्हणुन ती त्यांना आवरायचा प्रयत्न करत होती. पण आपटेंच्या शक्तीपुढे तिचे काय चालणार! त्यातच तिच्या आईनेही तिला मागे ओढले. रडत रडत आईला प्रश्नांची सरबत्ती करू लागली निवेदिता!

मात्र बाहेर जमलेल्या जमावला एक गोष्ट लक्षात आली.

पोरीचे त्याच्यावर प्रेम आहे खरे!

आता सगळेच जुनैद मियाँकदे बाहेरून पाहू लागले. जुनैद मियाँ प्रभावशाली व्यक्ती होती.

मियाँनाही ते लक्षात आले तसे ते ओरडले...

"अरे रोको इनको... अंदर आओ सब.... ये दोनो एक दुसरेसे दिलोजानसे प्यार करते है... और इस लडकीका ये रिश्वतखोर बाप हम जैसे गरीबोंको गलत इल्जामोमे फसाकर अंदर करवाता है और पैसे लेकर छोडता है... लडकी और लडका दोनो ब्डे और सयाने है... इनको अलग करना कानूनके हाथमे नही... आजाओ अंदर..."

आता आपटे मियाँला मारायला धावले खरे पण एक जमाव पुन्हा आत येऊ लागला. त्या जमावाला रोखण्यात बाकीचा स्टाफ गुंगला तोवर उमेशने प्राणपणाने ओरडून नितुला सांगितले..

"मी तुझ्याशी लग्न करायला आलो आहे... आपलं प्रेम आहे आणि असेल... मान्य असलं तर आत्ता सगळ्यांच्या समोर सांग की तयार आहेस... "

हादरलेली नितु थिजल्यासारखी उमेशकडे पाहात राहिली. विनीत खाली बसून ओरडतच होता कारण नडगी सॉलीड दुखावलेली होती.

तिकडे शिर्क्यांच्या मल्लांनी आता वेगळा स्टॅन्ड घेतला. जमाव परत येत आहे पाहिल्यावर त्यांना वाटले की आता काहीही केले तरी शिर्के वाचवतीलच!

दोन हवालदारांनाच धुतले त्यांनी!

व्हॅन येईपर्यंत काय काय होते हे केवळ बघावे लागणार हे आपटेंना जाणवले. दहशतीसाठी शस्त्र वापरणे शक्य असले तरी त्याचा जबरदस्त जाब द्यावा लागणार होता. मुळात इतक्या संवेदनशील भागात असे काही करणे हेच जिकीरीचे होते.

हा सगळा जमाव जुनैद मियाँच्या शब्दाला इतका भाव का देतो हेच नितुच्या आईला लक्षात येत नव्हते.

पण जुनैद मियाँ त्या लोकांसाठी मोठा समाजसेवक व महत्वाचा माणूस होता. आता अशा माणसाला मारल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अनेक जण आपतेंसमोर उभे राहिले आणि आता निराळाच प्रकार घडू लागला.

आपटेंची बोबडी वळेल असे आविर्भाव करत ते लोक धमक्या देऊ लागले की या देशात आम्हाला त्रास दिलास तर देश पेटेल! कुठे औरंगाबाद आणि कुठे देश! पण त्या परिस्थितीत इतक्या कमी स्टाफसह काहीच करणे शक्य नव्हते.

इकडे निवेदिता भडकली.

"चालता हो तू... माझे प्रेम तुझ्यावर??? लाज वाटत नाही का चांगल्या घरच्या मुलील असे बोलायला... सरळ घरात येता चौघे?? कंप्लेन्टच करणार आहे मी... "

ही वाक्ये ऐकून उमेशने सरळ खिशात ठेवलेला फोटो बाहेर काढला आणि जमावाला दाखवत म्हणाला...

"बघा... आम्ही फिरलो त्याचे हे फोटो... आणि आता म्हणते प्रेम नाही... "

नितुचा पोपट झाला.

मात्र परिणाम वाईट झाला. एका हवालदाराने उमेशच्या पोटरीवर सट्टकन लाठी ओढली तसा तो कळवळत खाली पडला.

आणि ह्या गोष्टीचा परिणाम मात्र अतिशय चांगला झाला. कारण नेमकी त्याच क्षणी दारात व्हॅन उभी राहून त्यातून सहा स्टाफ बाहेर पडत होता ज्यात एक इन्स्पेक्टरही होता आणि....... त्या सर्वांसमोर....

... उमेशला मार बसला हे सहन न झाल्यामुळे स्वतःच्या आईचा हात सोडून तीरासारखी धावत नितु उमेशच्या डोक्याशी बसून सरळ त्याच्या कपाळाची चुंबने घेऊन ओक्साबोक्शी रडत म्हणत होती....

"कशाला माझ्यासाठी मार खातोयस??? कशाला मार खातोयस??? मी कधीतरी तुला विसरेन का?? प्रेम व्यक्त केलंच पाहिजे असं असतं का उमेश??????"

आपटे जमीनीत पाय रुतल्यासारखे थिजून पाहातच राहिले.

नितुच्या आईलाही जागचे हालावेसे वाटत नव्हते.

जमाव आणि सगळेच क्षणभर स्तब्ध झाले होते. पण साहेब आलेले होते आता! दानिश! इन्स्पेक्टर दानिश!

"क्या है???"

"सर घरमे घुसकर लडकीको भगारहे है... "

"तुम्हारी लडकीको???"

"जी सर...."

दानिशसाहेबांनी एक हिंस्त्र कटाक्ष उमेशकडे टाकला. तोवर आपटेंनी पुढचे रामायण ऐकवले.

"ये तीन हरामीभी पूनासे आये हुवे है... इसके दोस्त है... और ये बूढा इनको मिला हु...."

'मिला हुवा है' हे शब्द पूर्ण झालेच नाहीत... कारण दानिशसाहेबांनी मियाँना पाहून एकदम विचारले...

"आप इधर???"

"हां... मार खानेके वास्ते आया था..."

"आपटे... इनको मारा तुमने??"

"ये... ये इनको मिला हुवा है सर.... और ये टेररिस्ट अ‍ॅक्टिव्हि..."

" बाईज्जत बरी हुवे थे ये तो??"

आपटेंचा चेहराच पडला. मियाँना निर्दोष सोडण्यासाठी मिळालेल्या रकमेत आपटेंनीही वाटा घेतलेला होताच!

दानिशला मुद्दाम इन्स्पेक्टर करण्यात आलेले होते. मुस्लिम समाजाला आपल्यातला एक जण अधिकारी झाला आहे असे वाटावे म्हणून!

"आप यहाँ कैसे क्या आये लेकिन??"

"मेरा छोटासा दोस्त है ये लडका... शायरीमे दिलचस्पी रखता है.. "

"आपटे... मुलीचं वय काय आहे??? "

"अं?? स.. साडे एकोणीस... "

"मालखेडे... या पब्लिकला व्हॅनमध्ये घाल एकेकाला.. "

पुन्हा पळापळ! पण दहा पाच जण सापडले तेवढे कोंबलेच व्हॅनमध्ये कसेबसे!

"मियाँ.... ये लोग आप लाये थे यहाँ??"

दानिशने मियाँना प्रश्न केला.

"भाई ऐसा है... के ये मामला कोर्टकचहरीका तो है नही... ये है प्यारमुहोब्बतका मामला.. अब इन्हे कौन समझाये के प्यार होता क्या है?? तो कौमके कुछ लोगोंसे मैने कहा... भाई आपलोगोंके पडोसी है नये आये हुवे... बात करनी है उनसे.. तो चलो आपभी हमारे साथ... तो आगये.. "

"बात करनेके लिये बीस लोग??"

"भाई मैने तो एक दो से कहां था... अब इकठ्ठा होजाते है तो क्या करे.. "

"और किसीके घरमे घुसते है... "

"इनमेसे एक भी आदमी घरमे नही आया था.. सब बाहर थे... ये साहबके मिजाज और है... इन्होने अंदर लाकर पीटा है.. "

"हरामखोर... " - आपटेंनी संताप व्यक्त करताच दानिशसाहेबांनी त्यांना शांत राहायला सांगितले..

"एक काम करते है... मालखेडे... ये लोगोंको लेकर ठाने जाओ... मै बादमे आता हूं... आपटे... तुम्हारे घरमे बैठके बात करते है... चीजे बातोंसे सुलझनेलायक लगरही है... "

शेवटचे वाक्य अर्थातच मगाशी उमेशचा चेहरा कुरवाळणार्‍या आणि आता थरथर कापत एका ठिकाणी उभ्या असलेल्या नितुला पाहून होते...

आणि दानिश, आपटे, सौ. आपटे, मियाँ, आप्पा, उमेश, राहुल, विनीत आणि प्रकरनाचे मूळ ठरलेली निवेदिता...

... आता हॉलमध्ये बसून बोलायला सुरुवात करणार होते...

+++++++++++++++++++++++

"क्या प्रॉब्लेम क्या है आपटे?? तुम्हे आकर चार दिन नही हुवे है और ये लफडा खडा हो गया?? उसपर तुमने पीछेके मुहल्लेवालोंपर हाथ उठाया... मामला क्या है??"

"सर... आम्ही पुण्यात असताना या दोघांची मैत्री होती... आता त्याचं माझ्या मुलीवर एकतर्फी प्रेम आहे आणि तो तिच्या मागे लागत आहे... आज मी त्याची रीतसर कंप्लेन्ट करणार आहे... "

"अरे इस लडकीने तो प्यारमे जहरभी खालिया था... कहांका एकतर्फी???" मियाँनी बॉम्ब फोडला..

"आपटे... तुम्हारी लडकी भी इसे चाहती है क्या??"

"नही नही सर... ए... सांग काकांना स्पष्टपणे... त्याशिवाय हा प्रश्न संपणार नाही..."

मुळातच चार पोरे आणि मियाँ घरात आल्यामुळे आपटे भडकलेले होते पण साहेबांसमोर काही बोलता येत नव्हते..

नितु आणि तिची आई रडून हवालदिल झालेल्या होत्या.

"आप रोईये मत भाभीजी... आप क्यूं रो रही है??? गलती तो इस लडकेकी है ना?? इसे हम सबक सिखादेंगे.."

उमेशला शिक्षा देणार असे दानिशचे वाक्य ऐकल्यावर नितुला पुन्हा हुंदका फुटला.

"तुम क्यूं रो रही हो बेटे??? ये तो तुम्हे छेडरहा था... पूनासे यहाँ आकर... "

नितु आणखीनच रडू लागली.

मार खावा लागल्यामुळे अपमानीत झालेले मियाँ मात्र भयानक खवळलेले होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे मिश्कील हसू तर मगाशीच मावळलेले होते, पण आता चेहरा खुनशी झालेला होता. त्यांनी पुन्हा तेल ओतले.

"वो इसलिये रो रही है के इस लडकेको कुछभी हुवा तो उसकी जान निकल आती है.. "

"क्यूं आपटे??.. ये सही है??? क्या बिटियाने जहर खा लिया था???"

"ते... ते एकदा चुकून ... तसं झालं होतं खरं... "

"गलतीसे जहर खाया जाता है???"

"सर.. मी काय म्हणतो?? .. समजा माझ्या मुलीचेही त्याच्यावर प्रेम आहे... पण आम्हाला नको आहे ना हा मुलगा?? "

"अरे ये होता कौन है इन्हे रोकनेवाला??? " - मियाँ चवताळले.

"मियाँ... आप चूप रहिये... " दानिशने मियाँना गप्प केले.

उमेश आणि विनीत अजूनही कळवळत होते. चौघेही प्रचंड घाबरलेले होते. विनीतने पाणि मागीतले तर सौ आपटे रागाने नाही म्हणाल्या...

मग चौघेही निराश होऊन गप्प झाले.

"बिटिया... एक बात बताओ... क्या अगर पापा मम्मी कुछ नही कहेंगे तो इस लडकेसे आप शादी करोगी?? "

दानिशसाहेबांच्या या प्रश्नामागे एक पार्श्वभूमी होती. राजे शिर्केंचा आपटेंना जो फोन आलेला होता तो निरोप त्या माणसाने दानिशसाहेबांनाही सांगितला होता. या प्रकरणात शिर्के असतील तर जपून वागलेले बरे हाच दानिशचा उद्देश होता.

मात्र दानिशच्या त्या प्रश्नावर सगळ्या माना नितुकडे वळल्या आणि.... सर्वांना तीव्र धक्का बसला...

कारण... निवेदिता आपटे... नकारार्थी मान हालवत होती...

"काका... माझं आणि उमेशचं एकमेकांवर प्रेम आहे हे खरं आहे.. खूप प्रेम आहे... पण आम्हाला जबाबदारीची जाणीवही आहे... त्याच्या घरच्यांना मी पसंत नाही.... कारण माझ्या वडिलांनी उमेशच्या बहिणीबाबत जो प्रकार करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांना खूप राग आलेला आहे... माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही.. कारण त्यांना असे वाटते की हे प्रेमच नाही... हे केवळ आकर्षण आहे... माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण त्याच्यावर केस झाली... पण तीही खोटीच... मला आत्ताच समजले की अख्तरमियाँही निर्दोष सुटले.. माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण तो आमच्याच जातीतला आहे... याहीमुळे पसंत नाही की त्याची आणि आमची आर्थिक परिस्थिती समान आहे.. खरे तर त्याचीच आमच्यापेक्षा अधिक चांगली आहे... माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण तो मला घेऊन कुणालाही न सांगता सिंहगडला गेला होता.. याहीमुळे पसंत नाही की तो मला घेऊन पिकॉकबेला गेला होता... यासाठी पसंत नाही की तो मला पसंत आहे.. यासाठीही पसंत नाही की त्याला अजून नोकरी नाही आणि जी नोकरी मिळाली होती ती या अशा कारणामुळे सोडावी लागली... माझ्या घरच्यांना उमेश पसंत नाही कारण तो दारू प्यायचा जी त्याने माझ्यासाठी सोडली... पसंत नाही कारण माझ्याशिवाय इतर कोणत्याही मुलीकडे पाहिलेले नाही... तो यासाठी पसंत नाही की तो माझ्याइतकाच शिकलेला आहे... उमेश माझ्या घरच्यांना यासाठी पसंत नाही की आमची बदली झाली तरी तो तिथे येऊन असे प्रकार करतो आणि त्याला ते प्रेम वाटते.. हे आप्पा आले आहेत यांच्या बायकोचे आधी दुसर्‍याशीच लग्न ठरले होते... त्यात माझी छेडछाड करणार्‍याला उमेशने फटका लावला होता म्हणून तो माझ्या घरच्यांना पसंत नाही... इतकी सगळी वाईट वाईट कारणे असल्यामुळे उमेश आमच्या घरच्यांना पसंत नाही... आणि.. माझ्यामधे निर्णय घ्यायची क्षमता नाही.. मला चांगले वाईट कळत नाही... मी अजून अल्लड आहे.. काही वेळा आई वडिलांप्रमाणेच आपणही आपले भले बघू शकतो असे मला वाटते जे चूक आहे... मला अक्कल नाही... त्यामुळे मी असे ठरवले आहे की आई बाबा जसे सांगतील तसेच करायचे.. मी उमेशशी लग्न करू शकणार नाही.... कारण आमचे प्रेम हे प्रेम नाही... माझ्यासारख्या एका चांगल्या घरच्या मुलीबाबत उमेशसारख्याने अशा अपेक्षा ठेवणे हेच मुळात चूक आहे... माझी विनंती फक्त इतकीच आहे... की यापुढे तो असे काहीही करणार नाही हे नक्की... पण ह्यावेळेस त्याला कोणतीही शिक्षा देऊ नका.. प्लीज.. त्याला सोडून द्या.. आणि त्याचे हे सगळे मित्रही वेडे आहेत... ते केवळ त्याच्या म्हणण्याखातर हे सगळे करत आहेत... पण ते सगळे मनाने आणि संस्कारांनी चांगले आहेत... त्यांनाही काहीही करू नका अशी रिक्वेस्ट करते.... "

निवेदिता बोलायला थांबली तेव्हा सगलेच अवाक झालेले होते. उमेश यासाठी की परिस्थिती ताब्यात येण्याची शक्यता असतानाही ती नाही म्हणाली होती. तिचे आई वडील यासाठी की तिने बोलता बोलता उमेशचे जे गुणगान केलेले होते ते माहीत असलेल्या आई बापांनी मुलीला सरळ अशा घरी देऊन टाकली असती हे उघड होते.

पण तरीही कोठेतरी तिचे आईवडील सुखावलेही होते की मुलगी कशी का होईना आपले ऐकत आहे. काहीसा अभिमानही वाटत होता त्यांना!

दानिशसाहेबांना उमेशचे मत ऐकायची जरूरच नव्हती. मात्र उपदेश देता येत होताच.

"देखो उमेश... मामला तो सीधा है... बिटिया तुमको चाहती जरूर हो.... लेकिन जिंदगी तुम्हारे साथ गुजारना नही चाहती... अपने मां बाप का सुनकर तुमसे सब नाते तोडना चाहती है... मै भी कहता हूं की इसीमे भलाईभी है... वैसे तुम्हे आपटेसाहबके घरमे घुसनेके कंप्लेन्टमे सजा दिलवासकता हूं... लेकिन उसमे काफी सारे इश्यूज हो सकते है... क्यूं घुसे थे.. और कौन कौन थे??? जुनैद अख्तरमियाँ क्यूं आये थे?? मुहल्लेवाले क्युं आये थे! इसलिये मै सब रफादफा कर रहा हूं! लेकिन एक चीज समझलो... आगेसे बिटियाकी याद भी नही आनी चाहिये दिलमे... सुना?? यादभी नही आनी चाहिये... अब चूपचाप पूना चले जाओ सबलोग... ये तीनोंकोभी मै अंदर करवासकता था... लेकिन सबको छोडरहा हूं.. इसके बाद कभीभी अगर इसकी तरफ देखनेकी कोशिष की तो मुझसे बुरा कोई नही होगा... चलो निकलो... अच्छे घरके लगते हो... अपने मां बापके कहे रास्तेपर चला चलो.. जिंदगी बहुत बाकी है... इश्क लडानेकी उमर है नही तुम लोगोंकी अभी.. चलो चलो..."

अनेक अनेक अनेक गोष्टी झाल्या त्या खोलीत ते ऐकून!

नितुच्या आई बाबांना दानिशसाहेबांच्या रुपाने मोठाच आधार मिळाला. उमेश आणि बाकी तिघेही पूर्ण निराश झाले. शारिरीक वेदना आता अधिकच जाणवू लागल्या. निवेदिता भकास चेहर्‍याने जमीनीकडे पाहू लागली.

मात्र... मियाँ... मियाँ तीक्ष्ण नजरेने सगळ्यांकडे पाहात होते.

आणि तेवढ्यात फोन वाजला तो आपटेंनी उचलला.

"हॅलो???"

"अरे काय रे त्या पोराला मारताय बिरताय तुम्ही लोक??? बिचार्‍यांचं वय काय, तुला काय सांगितलं होतं मी???... कायद्यापेक्षा प्रेम मोठं असतं... है की नै?? आं??? आणि ऐकलं नाहीस तर मी प्रेमाच्या बाजूने राहीन हेही म्हणालो होतो ना??? दे की मुलीचा हात त्याच्या हातात???? राजे शिर्के बोलतोय मी..."

"..........."

"हलो.........."

"येस... येस स्सर... सर... मला तु... तुमच्याबद्दल पूर्ण आदर आहे... पण एक .. एक रिक्वेस्ट आहे सर... की.. मुलीला मुलगा पसंत नाही असे तिने आत्ताच इथे सांगितले आहे सर्वांसमक्ष आणि मुलासमक्षही... आणि.. हा... हा सगळा प्रश्न.. माझ्या घरचा आहे सर... व्यक्तीगत बाब आहे ही... माझी रिक्वेस्ट आहे की आपण कृपया माझ्या.........."

"व्यक्तीगत बाब??? तुझ्या मुलीचं लग्न ही तुझी व्यक्तीगत बाब आहे?? की तिची???"

"सर तिला तो पसंत नाही असे म्हणालेली आहे ती आत्ता इथे... "

दाणकन फोन आपटल्याचा आवाज झाला तसे आपटे आनंदले. शिर्केंचे नाक खुपसणे बंद झालेले होते. शिर्केंचे तोंडही बंद झाले होते.

"कौन था???"

दानिश साहेबांनी आपटेंना विचारले.

"सर राजे शिर्के बोलत होते.... "

"त्यांची कोणाशी ओळख आहे???"

वैतागून दानिशसाहेबांनी विचारले तसा अत्यंत दु:खी स्वरात उमेश खाली मान घालून म्हणाला...

"माझ्या आजोबांशी.. "

क्षणातच दानिशसाहेबांना उमेशचेही महत्व जाणवले. पण आता लगेच त्याच्याशी खोट्या रिस्पेक्टने बोलणे शक्य नव्हते. त्यातच आपटेंनी सांगितले की शिर्के आता काहीच म्हणत नाही आहेत. ह्यात ते पडणार नाहीत हे नक्की! तसा मात्र दानिश साहेबांचा आत्मविश्वास पुन्हा गोळा झाला आणि ते या चौघांना उद्देशून म्हणाले..

"चलो निकलो... तुम लोग बैठे क्या हो अभीभी??? चलो??"

"एक मिनिट एक मिनिट.... मै कुछ कहूं??"

मियाँच्या या प्रश्नावर आपटेंनी सरळ वाक्य टाकले.

"तुला आत घेऊन टायरमध्ये घालेन.. मग काय म्हणायचं ते म्हण.. "

"आपटे... इनसे तमीजसे बात किया करो... हस्ती बडी है ये... "

"हो पण हा माझ्या घरचा प्रश्न आहे.. "

"एक मिनिट आपटेसाहब... मै आपके घरके बारेमे तो कुछ कहही नही रहा हूं... मै तो कुछ औरही कह रहा हूं"

"एक शब्द काढायचा नाही थोबाडातून.. चाबकाने बडवेन"

आपटे अजूनही त्याच मूडमध्ये होते.

"साहबजी मै ये कहरहा था... आपके ठानेपर मै आपके खिलाफ कंप्लेन्ट करना चाह रहा हूं.. तो हम चले ठानेपर??"

"मियाँ... आपको क्या होगया???"

दानिशसाहेबांनी मधे पडून मियाँना विचारले. मियाँच्या या विधानाने निराळाच गोंधळ निर्माण केला होता.

"क्या होगया मतलब??? हम रास्तेपरसे गुजररहे थे... पीछे के मुहल्लेमे जा रहे थे... ये साहबने पकडके घरके आंगनमे पीटा है हमे... कंप्लेन्ट नही होगी क्या??? "

"क्या मियाँ... आप भी... "

"क्या मियाँ आप भी मतलब??? मै मार खाऊं??? और ये साहब गुंडागर्दी करते रहेंगे??"

"ए मिया... चलता बन... काठी घालेन.. "

"मिजाज देखिये दानिशसाहब इनके?? अभीभि किस तरहा बात कर रहे है.. "

"आपटे एक मिनिट... मियाँ... जो हुवा उसे भूलजाईये.. मै कह रहा हुं..."

"अरे??? आप होते कौन है कहनेवाले??? मार मैने खाया है?? कंप्लेन्ट मेरी है... लिखवालीजिये??"

मियाँनी मस्त प्रकरण पेटवलं! आता हे मियाँ म्हणजे काही सहज नजरअंदाज करण्यासारखं प्रकरण नाही हे मगाशी त्यांनी जमवलेल्या जमावावरून समजतच होतं!

आपटेंना आता काहीसा मलूल स्टॅन्ड घ्यावा लागला.

"मी... मी तुमची आत्ता इथे सगळ्यांसमोर जाहीर माफी मागतो.. "

"आपसे माफीनामा तो मांगाही नही मैने... "

"हे बघा मियाँ... तुमच्या तक्रारीत दम नाही... रस्त्यावरून तुम्ही जात असताना मी तुम्हाला अंगणात खेचून तुडवलं हे खरं वाटायला जनतेला पिसाळलेलं कुत्रं चावलेलं नाही... आणि इथे साक्षीदार मिळतील तुम्ही खोटं बोलताय हे सांगायला.. "

"एक भी गवाह मिला तो बताईये साहब.. वैसे... कंप्लेन करने तो जाही रहां हुं... आप यही बैठेंगे या चलेंगे??"

"मियाँ... झूठ तो आपभी बोलरहे है... आपटेने ऐसा कुछ किया नही है.. ऐ... तुम लोग क्यूं बैठे हो??? चलो???"

"अरे आपटेसाहबने क्या किया है ये तो हमारा मुहल्ला बतायेगा पुरा??"

"मियाँ.. इस चीजको आप कौमका रंग खामख्वा दे रहे है... "

"कौम का रंग?? यहां कौम का रंग कहांसे आगया?? भाई हम रास्तेसे गुजरते हुवे बेवकूफ पुलीसवालोंका मार खाये... ये कहांकी डेमोक्रसी है जनाब??"

"एक मिनिट मियाँ ... आपको अगर कंप्लेन करनीही है तो कीजिये... लेकिन एक चीज जानिये.. ऐसे हजारो कंपेन्स वहा कचरेमे फेके जाते है... क्युं की... "

"ये आप खुदही कह रहे है?? मतलब आप खुदही मान रहे है के कंप्लेन्टकी कोई अहमियतही नही है?? "

"ऐसे फालतू कंप्लेन्स की बात कर रहा हूं... आप अल्फाजोंके साथ ना खेले तो बेहतर... "

"भाई अजीब बाते सुनारहे हो आप जनाब??? अल्फाजोंके साथ न खेले तो बेहतर??? आप गरीबोंके साथ इस तरहा ना खेले तो बेहतर नही होगा??"

"एक मिनिट मियां.. मला सांगा.. तुम्ही काय कंप्लेन्ट करणार?? आणि काय नुकसान भरपाई पाहिजे तुम्हाला?? "

आपटेंनी तोंड उघडले.

"अरे आपसे बात कौन कर रहा है??"

"ए थेरड्या.. हे घर माझं आहे.. "

"देखा दानिशसाहब.. मै जानेके लिये तैय्यार हूं तो आप रोक रहे हो... और बैठ जाऊ तो ये कहते है घर इनका है??"

हे चालू असताना पोरे उठली. एकेक करून दाराकडे सरकायला लागली.

"अरे उमेश??? तुम खुदही जा रहे हो??? भाई लडकीसे आखरी बात तो करते जाओ यार????"

मियाँनी कारण नसताना उपदेश केला आणि आपटे भडकले आणि त्यांनी उठून सरळ मियाँचा गळाच धरला.

"भोसडीच्या.. साहेबांसमोर नाटक नको म्हणुन काही बोलत नव्हतो... फूट घरातून... "

एवढे होईतोवर दानिशसाहेबांनी आणि नितुच्या आईने आपटेंना आवरले.

"अभी लाता हुं.... अभी लाता हुं पुरा मुहल्ला.. "

ताड ताड चालत मियाँ बाहेर गेले आणि उमेश आणि निवेदिताची नजरानजर झाली.

जिसे आप गिनते थे आशना जिसे आप कहते थे बावफा
मै वही हुं मोमीने- मुब्तिला तुम्हे याद हो के न याद हो

सगळेच संपलेले होते.

पहिल्या दिवशी हासून झालेली नजरानजर! चार मित्रांमध्ये चढाओढीचा प्रयत्न! मग प्रत्येकाने मान्य करणे की निवेदिता उमेशवरच भाळली आहे. मग क्षमाने सिंहगड सहल ठरवून ऐनवेळी स्वतःच न जाणे! मग ती धुंद सहल! तो स्पर्श, ती जवळीक! आवेग! फोटो! चप्पल तुटली तरी वेदना सहन करून चालणे! कसबा गणपतीपाशी मित्रांनी आणि क्षमा आणि वर्षाने केलेली चेष्टा! मग प्यासामधील पार्ट्या!

आणि मग जुनैद मियाँ भेटणे! त्यातच सिंहगडचा प्रताप सगळ्यांना समजणे! आपटेंची दादागिरी! आजोबांची आजोबागिरी! जुनैदमियाँची शायरी! मग रुसवा, फुगवा! अबोले! मागच्या मंदिरावर चढून खिडकीतून संवाद! गुरखा मागे लागणे! पिकॉकबे! शपथा, वचने, एक होणे! आणि मग... मग अटक! मग पळुन जाणे, पणदर्‍यापासून परत येणे! निर्दोष सुटणे! मियाँचे वास्तव समजणे! तिकडे नितुने विष घेणे! मग जागा बदलणे! त्यावेळेसची ती चिठ्ठी! 'तुझी... फक्त तुझीच'! आणि मग... मग मित्रांनीही सोडून देणे.. मग नितुची बदली... आणि गेल्या तीन चार दिवसांत झालेल्या भयंकर घटना... मियों चांगले असल्याचे समजणे! राजे शिर्के मदतीस उभे राहणे! मित्र औरंगाबादला येणे! आजची योजना आणि ती धुळीस मिळणे!

या सगळ्यात निर्माण झालेले एक मुके, अबोल नाते! ज्याला नाही नाव ना कसले वर्णन! ज्याला फक्त अस्तित्व आणि तेही दोन मनामध्येच!

सगळे संपलेले होते. ती ओढ, विवशता, तडफड, सुखद क्षण... सगळे संपलेले होते.

तेही अतिशय वेदनादायक पद्धतीने! मार खावा लागला होता. आजोबांना तोंड दाखवण्याची जागा राहिली नव्हती. याही वेळेस पुन्हा मित्रांनीही मार खाल्ला होता. निवेदिता स्वतःच लग्नाला तयार नसल्याचे म्हणाली होती. आणि दानिशसाहेब पुण्याला निघून जायला सांगताना केस केली नाही हे उपकार समजा म्हणत होते.

परत कधी दिसेल नितु?? की नाहीच दिसणार?? कोणाची होईल?? तिला आपण आठवू का?? आपण काय करणार आयुष्यात? का असे होते हे सगळे??

निवेदिताच्याही मनात तेच विचार होते!

संपला सगळाच प्रकार! चालला आपला उमेश परत पुण्याला! कायमचा! आता तो कधीच आपला नाही होणार! कधीच त्याला आपले म्हणता येणार नाही. आता तो कधीच दिसणारही नाही. दिसला तरी परक्यासारखे वागावे लागेल. मन त्याच्यातच गुंतून राहील. पण ही जखम ह्ळूहळू वालेल, कोर्डी होईल अशा आशेवर दिवस घालवावे लागतील.

दोघेही एकमेकांकडे काही क्षण बघतच राहिले. सर्वांसमोर कदकडून भेटने तर दूरच, साधा हात मिळवणेही शक्य नव्हते.

अतिशय दु:खद आणि वेदनादायक पद्धतीने निरोप घ्यावा लागत होता. पुन्हा कधी कधीही न दिसण्यासाठी, भेटण्यासाठी!

डोळे एकमेकांच्या डोळ्यांमधून काढवतच नव्हते. तेवढ्यात दानिशसाहेबांचा आवाज आला...

"अरे चलो यार... सब खतम हो चुक है अब"

सब खतम हो चुका है अब!

जळत्या निखार्‍यासारखे ते वाक्य दोघांच्या कानात शिरले. पण शेवटी हिय्या करून उमेशने शब्द उच्चारलेच!

"जा..जाऊ का?? "

टच्चकन पाणी आले नितुच्या डोळ्यात! ओढणी चेहर्‍यावर दाबून मान खाली घालून पोटभर रडली बिचारी! मुलांनी काय करायचे अशा वेळेस??? आप्पाचा हात उम्याच्या खांद्यावर विसावला. उम्याला थोपटत राहिला.

उमेशच्या डोळ्यातून पाणी गळत होते. आणि मुलासारखा मुलगा असून रडतो असे वाटू नये म्हणुन तो तोंड लपवत होता, पण शेवटी ते सहन न होऊन त्याने तोंड आप्पाच्या खांद्यावर टेकवलेच!

आणि तो प्रसंग सहन न होऊन नेहमीप्रमाणे राहुलने बालिश वाक्य टाकले.

तेही थेट नितुलाच उद्देशून!

"ह्याच्यासाठी तू विष खाल्लस?? ह्याला सोडण्यासाठी?? आणि आम्ही सगळ्यांनी ह्याच्यासाठी मार खाल्ला?? आज शेवटची संधी होती निवेदिता... होकार देण्याची... जी तू घालवलीस.. आता आयुष्यात कधीही सुखी होणार नाहीस.. "

आपटे दांपत्य आत्ता चक्क शांत बसलेले होते... निवेदिता राहुलचे वाक्य ऐकून अधिकच रडू लागली...

... कोणाचातरी हात!

कोणाचातरी हात खांद्यावर आला तसे तिने मान उचलून पाहिले............. उमेश!

"रडू नकोस... निघतो... "

आणि सगळ्यांच्या नाकावर टिच्चून निवेदिताने तो मार लागलेला हात हातात घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. पण तिचे अश्रूच जास्त सांडले उमेशच्या हातावर!

चार पावलांवर दार... दाराबाहेर सात आठ पावलांचं अंगण... अंगणाला गेट.. गेटमध्ये एकदाच वळुन उमेशने मागे पाहिले... दारात कोणीही उभे नव्हते... नितु त्याच क्षणाला जणू त्याला कायमची विसरून गेलेली होती...

आणि चौघे आणि मियाँ... पाचही जण गेटमधून बाहेर पाय टाकतायत तर समोर काळी कुळकुळीत गाडी येऊन थांबली...

आपला महाकाय देह तोलत राजे शिर्के बाहेर आले... त्यांना पाहून अर्थातच आपटे दांपत्य आणि दानिशसाहेब बाहेर आले. युनिफॉर्ममध्ये असलेल्या दानिशसाहेबांनी सलाम केला.. मान तुकवून राजे शिर्के आपटेंकडे बघत म्हणाले..

"आपटे कोण??? ... तूच का???"

यंत्रवत होकारार्थी मान हालली आपटेंची!

"मी माजी आमदार... अंबादास शिर्के... राजे शिर्के... ओळख करून देतो... हा माझा नातू... उमेश राईलकर.. ह्याच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला आलो आहे... मुलगी औरंगाबादचीच आहे.. निवेदिता नांव आहे तिचं... आणि आडनांव आपटे.. दोघे एकाच जातीचे आहेत.. उद्या सकाळी दहा वाजता पुण्यातल्या कोर्टात लग्न आहे... 'साक्षीदार' म्हणुन तुम्ही दोघांनीही यावंत असं निमंत्रण करायला आलो आहे... येणार ना???"

थक्क! हबकून थक्क झालेला होता जो कोण तिथे होता तो! तोंडातून शब्दच फुटत नव्हता, कारण त्या स्वरातील अधिकारवाणी होतीच तशी!

आपटे तोंडातून आवाजच काढू शकत नव्हते. सौ आपटे नवर्‍याकडे एकदा आणि राज्यांकडे एकदा बघत बसल्या होत्या.

बर्‍याचे वेळाने भानावर आलेल्या सौ आपटे पुढे झाल्या. हात जोडून त्या राज्यांना म्हणाल्या..

"माझ्या वडिलांसारखे आहात... थोडे बोलते... रागावू नका.. माझ्या मुलीने ह्या मुलाला आत्ताच नकार दिलेला आहे... इतका वेळ तेच चाललं होतं... आम्हाला आमच्या मुलीचं लग्न आमच्या मनासारखं करू देत... माझी तुम्हाला इतकीच विनं......"

"जयश्री...... "

सौ आपटेंच वाक्य मधेच तोडत आपटेंनी खर्जातल्या आवाजात हाक मारलेली सौ आपटेंना वेगळेपणामुळे लगेच जाणवली. त्या मागे वळून आपटेंकडे बघतात तर धक्काच बसला. आपटेंचा चेहरा फार फार वेगळा भासत होता.

"जयश्री थांब जरा... काका... तुम्ही स्वतः आलात?? आत या... चहा घ्या... मियाँ.. माझी चूक झाली... आत या तुम्ही सगळेच... आणि नितु.... चहा वगैरे घेऊन जायची तयारी कर.... उद्या सकाळी उमेशच्या आजोबांना आणि आई वडिलांना नमस्कार कर आणि पुन्हा औरंगाबादला ये... सगळेच प्रतिष्ठेचे प्रश्न करत बसलो मी.... त्यामुळे इतके घोळ झाले... खरे तर... उमेश हे स्थळ मला........ म्हणजे मलाही.. तसे.. "

प्रत्येक मान आपटेंकडे वळलेली, प्रत्येक कान आतुर!

"मलाही पसंत..... आहे"

धक्का बसलेला उमेश एका खुर्चीला अडखळला...

मियाँ अती अती उत्साही स्वरात म्हणाले...

"संभलके चल..... "

उमेश हासत हासत म्हणाला...

"के अभी वक्त है संभलनेका... "

निवेदिता वरच्या खोलीत पळून गेलेली होती....

... आणि उमेश राजे शिर्के आणि मियाँना वाकून नमस्कार करत होता...

नेह्मीसारखेच दणदणाटी हासून राजे शिर्के 'मला चहा नको, चांगले ग्लासभर दूध द्या' म्हणत होते...

विन्या, आप्पा आणि राहुल आपल्या शारिरीक आणि मानसिक वेदना विसरलेले होते केव्हाच...

...... आणि... आपटे आपल्या घरातून पुण्यातल्या कसबा पेठेतील मारवाड्याकडे फोन करून राईलकर आजोबांना फोनवर बोलवायला सांगत होते...

.... गॅसवर आधण चढले तेव्हा मित्र एकमेकांशी हासून गप्पा मारायलाही लागलेले होते... आणि मियाँ राज्यांना आपली ओळख सांगत होते... दानिशसाहेब थक्क होऊन झालेला प्रकार अजून पचवतच होते..

तेवढ्यात आपटेंचा फोनवर आवाज ऐकू आला...

"हां राईलकर आजोबा का??? "

ते ऐकून निवेदिता घाईघाईने जिन्याच्या तीन चार पायर्‍या उतरून पुन्हा वर जायच्या घाईत असल्यासारखी उभी राहिली..

आणि तिची आईही बाहेर येऊन आपला नवरा काय बोलतो ते ऐकू लागली... आणि... सगळेच... सगळेच आपटेंकडे लक्ष देऊ लागले...

"हां आजोबा... आपटे बोलतोय आपटे... सब इन्स्पेक्टर आपटे... आवाज येतोय ना?? औरंगाबादहून बोलतोय मी... हां हां... तर हे सांगायला फोन केला होता मी.... की आमची एकुलती एक मुलगी तुमच्या घरात देणार आहे... तिला आपल्या मुलीसारखी मानून प्रेम द्या फक्त... बाकी पुढच्या आठवड्यात आम्ही येतोच बोलणी करायला.. नितु उद्या पोचतीय तिथे... कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला... मी हे विचारायला फोन केला होता आजोबा... की तुम्हाला... तुम्हाला आमची मुलगी... "

बोलतानाच आपटेंच्या डोळ्यात पाणी आलं होतं! एका सब इन्स्पेक्टरच्या!

"तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे ना हो आजोबा???? "

'तुमची कुठे मुलगी आहे ती आता' असे आजोबांचे उत्तर ऐकून आपटेंनी अत्यानंदाने फोन ठेवला आणि सौ कडे पाहिले...

"काय... काय म्हणाले ते??"

होकारार्थी मान डोलावत अर्धवट गहिवरलेले, अर्धवट आनंदलेले आपटे म्हणाले....

"ते म्हणतायत... तु... तुमची कुठे मुलगीय ती??? ती तर म्हणे... आमची मुलगीय..."

हे वाक्य ऐकून निवेदिता आणि उमेशची झालेली नजरानजर वर्णायला शब्द उरलेले नाहीत.

एक प्रेमकहाणी यशस्वी ठरलेली होती.

तुम्हे याद हो... के न याद हो

++++++++++++++++++++++++++++++++++++

-'बेफिकीर'!

.

गुलमोहर: 

हं!!! शेवट अजिबातच पटला नाही. गुंडाळल्यासारखा वाटतोय. ते जुनैद मियाचं पात्र- सज्जन मुस्लीम , जसं हिंदी पिच्चर मधे दाखवतात तसं वाटतंय.

आधीचे भाग छान. शेवट गंडलाय.

थोडीशी निराशा झाली..
हिंदी सिनेमासारख शेवटचा मारामारीला.. सगळी पात्र सीन मध्ये असतात तसं वाटलं.
असो.. एकूण कादंबरी आवडली.

हम्म...खुप लवकर अन झटपट शेवट केलात राव!
अगदी हिंदी शिणमा श्टाईल! आधी मारामारी, मग आईवडिलांसाठी मुलीचा त्याग, जुदाईचा सीन अन अत्यंत शेवटच्या क्षणाला श्रीमंत आजोबांनी येऊन सगळे प्रकरणच खिशात घातले.
इट सीम्स नो माईंड स्ट्रेस हॅज बीन टेकन टू फिनीश दि स्टोरी!

एकुणच नाही आवडली.
काम धंदे करायचे सोडुन तरुणाई उगाच स्वप्नविलास करत , दारू ढोसत प्रेम करत बसलिये. या असल्या नायकापेक्षा एखादा ढोर मेहनत करणारा रांगडा मजूरही कथानायक म्हणुन शोभेल, अगदी तुमचा चितळ्यांकडे काम करणारा नायकही बरा. पुलेशु Happy

अंत भला तो सब भला...:डोमा:

आवडली.....अनेक वळणानंतर अखेर दोघे एक झाले.

काम धंदे करायचे सोडुन तरुणाई उगाच स्वप्नविलास करत , दारू ढोसत प्रेम करत बसलिये. या असल्या नायकापेक्षा एखादा ढोर मेहनत करणारा रांगडा मजूरही कथानायक म्हणुन शोभेल, अगदी तुमचा चितळ्यांकडे काम करणारा नायकही बरा.

+१

हं!!! शेवट अजिबातच पटला नाही. गुंडाळल्यासारखा वाटतोय. ते जुनैद मियाचं पात्र- सज्जन मुस्लीम , जसं हिंदी पिच्चर मधे दाखवतात तसं वाटतंय.>>>
अनुमोदन
शेवट गुंडाळा राव Sad
बिलकुल पटला नाही शेवट......
कमीत कमी पळवुन तरी न्यायला पाहीजे होती.....

शेवट आवडला नाही Sad बेफिकीर टच नाही. आपटे कसे बदलले कळलेच नाही....>>>अनुमोदन
Dilwale Dulhaniya le jayenge सारखा शेवट वाटला. त्यापेक्शा हाफ राईस दाल मारके मधील दिपू काजल ची प्रेमकथा जास्त भावली आणि शेवटही...

शेवट आवडला नाही Sad बेफिकीर टच नाही. आपटे कसे बदलले कळलेच नाही....>>>अनुमोदन
Dilwale Dulhaniya le jayenge सारखा शेवट वाटला. त्यापेक्शा हाफ राईस दाल मारके मधील दिपू काजल ची प्रेमकथा जास्त भावली आणि शेवटही...

बेफिकिर्जि .....

शेवटच आनि संपूर्ण कादंबरी आवडली... पन शेवट खुप लवकर अन झटपट शेवट केलात ...
मात्र गुंडाळल्यासारखा वाटतोय ...

पन खरे सान्गु ... हाफ राईस दाल मारके मधील दिपू काजल ची प्रेमकथा जास्त भावली आणि शेवटही...

धन्यवाद ... आवडला शेवट... सावट सारखा वाईट शेवट होतो की काय अशी भिती वाटत होती... Happy

"आपटे कोण??? ... तूच का???"

यंत्रवत होकारार्थी मान हालली आपटेंची!

"मी माजी आमदार... अंबादास शिर्के... राजे शिर्के... ओळख करून देतो... हा माझा नातू... उमेश राईलकर.. ह्याच्या लग्नाचे निमंत्रण द्यायला आलो आहे... मुलगी औरंगाबादचीच आहे.. निवेदिता नांव आहे तिचं... आणि आडनांव आपटे.. दोघे एकाच जातीचे आहेत.. उद्या सकाळी दहा वाजता पुण्यातल्या कोर्टात लग्न आहे... 'साक्षीदार' म्हणुन तुम्ही दोघांनीही यावंत असं निमंत्रण करायला आलो आहे... येणार ना???"

थक्क! हबकून थक्क झालेला होता जो कोण तिथे होता तो! तोंडातून शब्दच फुटत नव्हता, कारण त्या स्वरातील अधिकारवाणी होतीच तशी!

आपटे तोंडातून आवाजच काढू शकत नव्हते. सौ आपटे नवर्‍याकडे एकदा आणि राज्यांकडे एकदा बघत बसल्या होत्या.

बर्‍याचे वेळाने भानावर आलेल्या सौ आपटे पुढे झाल्या. हात जोडून त्या राज्यांना म्हणाल्या..

"माझ्या वडिलांसारखे आहात... थोडे बोलते... रागावू नका.. माझ्या मुलीने ह्या मुलाला आत्ताच नकार दिलेला आहे... इतका वेळ तेच चाललं होतं... आम्हाला आमच्या मुलीचं लग्न आमच्या मनासारखं करू देत... माझी तुम्हाला इतकीच विनं......"

"जयश्री...... "

सौ आपटेंच वाक्य मधेच तोडत आपटेंनी खर्जातल्या आवाजात हाक मारलेली सौ आपटेंना वेगळेपणामुळे लगेच जाणवली. त्या मागे वळून आपटेंकडे बघतात तर धक्काच बसला. आपटेंचा चेहरा फार फार वेगळा भासत होता.

"जयश्री थांब जरा... काका... तुम्ही स्वतः आलात??
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>या प्रसंगात हवा तसा इफेक्ट साधला गेला नाहीय....

आणखी एक कादंबरी यशस्वीरित्या पुर्ण झाल्या बद्दल 'अभिनंदन' भूषणराव... Happy

<<<<काम धंदे करायचे सोडुन तरुणाई उगाच स्वप्नविलास करत , दारू ढोसत प्रेम करत बसलिये. या असल्या नायकापेक्षा एखादा ढोर मेहनत करणारा रांगडा मजूरही कथानायक म्हणुन शोभेल, अगदी तुमचा चितळ्यांकडे काम करणारा नायकही बरा.>>>> अनुमोदन.
उगाचच जुनैद मियाँना समील केलात, त्यांच्याऐवजी शिर्के राजेंची entry चांगली झाली असती.
शेवटी शिर्के राजे आल्यावरच आपटेंनी होकार दिला ना !!!!!!!
एकंदरीत कादंबरी छान लिहीलीत.

बेफिकीर,

शेवट कुच जम्या नही. कारण बाविसाव्या भागात आजोबा म्हणालेले की त्या आपटेच्या नाकावर टिच्चून उभा राहा त्यांच्या घरासमोर... इतके हताश व्हायला पाहिजेत की स्वतःहून मुलगी द्यायला आले पाहिजेत.

यामुळे वाचकाची अपेक्षा पूर्ण झाली नाहीसं वाटतं. कदाचित आपण शेवट बदललात तर...? अर्थात आपल्या तत्त्वांत बसत असेल तरंच.

आ.न.,
-गा.पै.

Pages