''अनावरण''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 October, 2011 - 01:26

आज जाहले तुझे मनात नूतनीकरण
तीच ती जखम जुनीच्,तेच ते अनावरण

लाख फाडशील पत्र्,खोडशील ओळही
आठवेल तोच शब्द्,आठवेल ''अवतरण''

वाचलेस पत्र वापरुन चाळिशी जरी
मी कसा दिसेन जर तपासशील व्याकरण?

वीज्,नोकरी,निवास्,रोजगार्,भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण

व्यक्तिमत्व अन स्वभाव ,जाणण्या चुकू नका
रावणाकडून जाहलेच जानकीहरण

दाद वाहवा मिळे सुमार शायरीसही
आपलेच लोक आपलेच सादरीकरण.

--डॉ.कैलास गायकवाड्

गुलमोहर: 

आज जाहले तुझे मनात नूतनीकरण
तीच ती जखम जुनीच्,तेच ते अनावरण

वीज्,नोकरी,निवास्,रोजगार्,भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण

व्वा व्वा!!

व्याकरणातला दुसरा मिसरा आवडला, सादरीकरण - गंमतीदार Lol

झक्कास गझल

वाचलेस पत्र वापरुन चाळिशी जरी
मी कसा दिसेन जर तपासशील व्याकरण?

आहाहा...मस्त

वीज्,नोकरी,निवास्,रोजगार्,भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण

क्या बात है..... Happy

अतीशय आवडली

वाचलेस पत्र वापरुन चाळिशी जरी
मी कसा दिसेन जर तपासशील व्याकरण?.......सुपर्ब!

शेवटाचीही अफलातून...

छान.

व्यक्तिमत्व अन स्वभाव ,जाणण्या चुकू नका
रावणाकडून जाहलेच जानकीहरण >>> मस्त!!

दाद वाहवा मिळे सुमार शायरीसही
आपलेच लोक आपलेच सादरीकरण... :हहह:

मस्त गझल.
आवडली.
निराकरण,व्याकरण खासच....

मस्त Happy

डॉ. मला खरं तर गझल प्रकारातलं काहीच कळत नाही पण रसप यांच्या धाग्याच्या अनुषंगाने ईथे आलो
"वीज्,नोकरी,निवास्,रोजगार्,भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण"

प्रचंड आवड्ल्या या ओळी!!