मज्जाखेळ [3-5]/[5-7]: ताल/ ठेक्यांचा खेळ

Submitted by सावली on 3 October, 2011 - 23:13

हा खेळ मी इथल्या लेकीच्या डे केअर मधे पाहिला. तिथे दर आठवड्याला एकदा अर्धा पाऊण तास यासाठी ठरलेला असतो. आम्ही घरी अजुन तरी कधी खेळलेलो नाही पण एकुणात मलाच खुप मजा येते पहायला. खरतर मी तीला घ्यायला जाते तेव्हा नुकतीच याची सुरुवात झालेली असते. मग मी पुर्णवेळ थांबुन बघते. शक्य होईल तेव्हा असे घरी खेळायचे आहे. इथे माझ्या नोट्स साठी टाकतेय. पण इथेही कुणाला करुन बघता येईल. साधारण संगित खुर्ची सारखेच पण अजुन जास्त प्रकार आहेत.
कुणाला अजुन काही प्रयोग करायचे असतील, गंमती इथे देण्यासारख्या असतील तर इथे नक्की द्या.

साहित्य- ऑप्शनलच आहे - ताल ठेक्याची वाद्य ( castanets, tambourine, wrist bell, triangle and striker, डफली, बेल, टाळ, ड्रम, खुळखुळा असे लहान मुलांचे काहीही, अगदीच नसेल तर वाटी चमचा, देवाची घंटा सुद्धा चालेल) मोठ्यांसाठी शक्य असेल तर कुठलेही एक वाद्य जसे पियानो, किबोर्ड, गिटार, तबला इ.

खेळ #१ -

खेळासाठी काही नियम ठरवलेले आहेत ( हे आपण आपल्या सोयीने ठरवु शकतो)
( एकाच गाण्याचा ठेका वाढवुन, कमी करुन इत्यादी)
१- धावण्यासाठी एका ठराविक प्रकारचा ताल ( जसे जोरात वाजवणे)
२- साधे चालण्यासाठी नेहेमीच्या तालातले संगित
३- अगदी हळुहळु चालण्यासाठी खुप हळु वाजणारे संगित
४- दिशा बदलण्यासाठी एक ठराविक संगित
५- स्किपिंग करत चालण्यासाठी एखादा उडता ठेका
(अजुन असे नियम करता येतील)

मग शिक्षकांनी / मोठ्या कुणी एकापाठोपाठ एक असे संगित वाजवायचे. आणि मुलं गोलाकार धावणार/ चालणार/स्किपिंग करणार. प्रत्येक बदलाबरोबर मुलांची अ‍ॅक्शनही बदलली पाहिजे. दिशा बदलण्याचे संगित वाजल्यावर गोल चालतानाची दिशा बदलली पाहिजे.

खेळ #२ -
मुलांना वेगवेगळी ताल वाद्ये देऊन एका गाण्यावर ठराविक शब्दांवर ताल देण्यास सांगावे. मुलांचे दोन ग्रुप करुन एका ग्रुप ला एका शब्दावर आणि दुसर्‍या ग्रुपला दुसर्‍या शब्दावर असेही सांगता येईल.

खेळ #३ -
प्रत्येकी सात सुरांसाठी वेगवेगळी अ‍ॅक्शन ठरवावी. जसे सा साठी उभे , रे साठी टाळी इ.
आणि तो तो सुर वाजवल्यावर / गायल्यावर मुलांनी ती अ‍ॅक्शन करायची

खेळ #४ -
संगित खुर्ची सारखेच- गाणे थांबले कि जोडी जोडी करुन उभे राहायचे.

अधिक खेळ इथे बघा
मज्जाखेळ: खेळता खेळता गंमत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच!

माझ्या लेकीच्या डेकेअर मधे पण असे संगीत-ताल यावर आधारित खेळ असायचे. मुलांना खुप आवडतात असे खेळ आणि मोठ्यांना पण Happy

हम्म छान आहे हा खेळ

प्रत्येकी सात सुरांसाठी वेगवेगळी अ‍ॅक्शन ठरवावी. जसे सा साठी उभे , रे साठी टाळी इ.
आणि तो तो सुर वाजवल्यावर / गायल्यावर मुलांनी ती अ‍ॅक्शन करायची>>> ह्यासाठी आधी मला सुर कळायला हवेत ना पण Proud बाबाला सांगते ताल द्यायला मग तिचं बघत बघत मी पण सुर ओळखायला शिकते Happy

यात डोळे बंद करून कोणते वाद्य वाजते आहे ते ओळखायचा खेळही करता येईल.

प्रत्येक वाद्याचा जो नाद आहे त्याच्याशी साधर्म्य असणारे नादवाचक शब्द शोधता / म्हणता येतील.

त्या वाद्याची स्टोरी सांगता येईल. किंवा एखाद्या गोष्टीत त्या वाद्यालाही एका पात्रासमान गुंफून त्यात आणखी रंजकता आणता येईल.

तसेच वरच्या मज्जा खेळात दोन-तीन वाद्ये एका वेळी वाजवली की त्यासाठी वेगळी अ‍ॅक्शन.

सावली,
गेले काही दिवस मी गरबा बघायला जातोय. ४+४ असा ८ मात्रांचा ताल पण त्यात टाळ्यांचे अनेक प्रकार करतात. (१ म्हणजे टाळी, ० म्हणजे टाळी नाही)

१ १ १ ० १ १ १ ० (हु सुरवातीची संथ लय)
१ ० ० ० १ ० ० ० ( हि दुप्पट लय)
१ १ १ १ १ ० ० ० (दुप्पट लयीय ५ टाळ्यांचा एक अनोखा प्रकार बघायला मिळाला )

अनेक हिंदी गाणी या तालात बसवता येतात.
सुहाना सफर, मेरे देश कि धरती, ताल से ताल मिला, किस्ना रे, नन्हा मुन्हा राही हू... अशी अनेक.

लाजो हो ना . मजा येते बघायला खेळायला.
निर्मयी हो ताईसो मधे असतात. पण ते मुख्यत्वे फिजिकल अ‍ॅक्टीव्हीटी रिलेटेड असतात. हे खेळ नुसतेच गंमत म्हणुन ( खरतर, ठेका, ताल आपोआप भिनत जाईल मुलांत असे वाटते)
कविता Happy अगं मला तरी कुठे येतात सुर ओळखता. किबोर्डच्या सात बटणांची नावे माहिती करुन ती वाजवायची Wink नाहीच तर टाळ्या वगैरे सुद्धा आहेच.
अरुंधती चांगली कल्पना. धन्यवाद Happy
रैना नक्की लिहि इथे.
दिनेशदा, टाळ्यांचा पण चांगला खेळ होईल अशाच प्रकारे. धन्यवाद Happy
हे ८ मात्रा वगैरे फारसे कळत नाही पण खेळताना इथे मात्रा(?) असली तर टाळी वाजवायची नसेल तीथे शांत रहायचे असा खेळ आहे. .