Closet

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

गेले दोन महीन्यांपासुन रुम आवरेल आवरेल म्हणत होतो, आज योग आला. मला माहीत होते माझ्याकडे जरुरीपेक्षा जास्त कपडे आहेत. पण किती जास्त आहेत हे आज कळाले.

काही महीन्यांपुर्वी टुलीप ने तीच्या closet मधल्या pink साम्राज्या बद्दल ब्लॉग लिहीला होता. तसे माझ्याकडे stripes आणि black चे साम्राज्य दिसतेय. Happy
I seriously have to stop purchasing cloths.

विषय: 
प्रकार: 

माणसाच्या क्लोजेटमध्य केवढा इंटरेस्ट लोकांना.... मी ही आलेच त्यात. Proud
बी, बयेचं माहित नाही पण माझ्याकडे आहेत भरपूर चपला, सँडल्स आणि शूज. त्यातले किती कौतुकाने, आठवणीने घातले जातात ते विचारायचं नाही.

लाँड्रीवाला कपडे घरी आणून देतो? >>> मग एखादा शर्ट सहज उडवत असेल.
(एकदम मला पु. लं. चा नामू परीट आठवला. अर्थात अमेरिकेतले धोबी प्रोफेशनल आहेत असं धरून चालूया..)
माझा ही परीट घरीच आणून देतो, पण मुलीचे कपडे घेऊन काय करील बिचारा? Proud

हे खरे आहे, कपड्यांची गीनती ती नसतेच. कधी ना कधी mall मध्ये गेलो नी काहीतरी नवीन आवडले तर घेणे होतेच.

पण सागर, एवढी कपड्याची attachement बरी नाही. सुत ते त्याचे काय कधीहे फाटेल्.(इती आजी). जुने कपडे salvation army द्यावे. ( राग नसावा, ए. फु. स.):)
मी जेव्हा जेव्हा नवीन नवीन ठीकाणी मूव करते आणि जर bags ज्यास्त होतात सरळ salavation army ला देते. तिथे जाई जाई पर्यन्त वाईट वाटते पण नाहीतरी ते extra bags ना $100 नी $200 देण्यात काय point आहे?
आणखी एक idea देवू?

सरळ थंडी संपली की sweaters वगैरे थंडीचे कपडे मस्त india bags मध्ये perfumed मारून ठेवायचे. जर closet खूप मोठे नसेल तर जागा वाचते नी सुट्सुटीत होते. नी सर्व उन्हाळ्याचे कपडे casula, office, gym असे arrange करून ठेवावे. मस्त handy लागतात. Happy

अगं इंडिया बॅग्जपेक्षा पण त्या स्पेस सेवर बॅग्ज जास्त चांगल्या पडतात. खरंच जागा वाचते त्याने.

हरे राम! काय पण भारी क्लोजेट आहे! नि कपडे इतके नीटनेटके ठेवलेत...
माझेपण नाहीत इतके कपडे... आता भारतात गेलं की मीही सगळी कसर भरून काढणार आहे असं आधीच जाहीर करोन टाकलंय. इथे जीन्स एके जीन्स....वैताग!

(त्यामुळे पंजाबी ड्रेस, साड्या..सगळी खरेदी ड्यू आहे माझी. लग्नाच्या वेळी मुख्य खरेदीनंतर २-३ दिवसांनी पुन्हा २ साड्या घेतल्या होत्या, फोर्मल वेअर. तर लगेच "आता ५ वर्षं साड्या घेऊ नकोस नवीन...दुकानातून भाजी आणावी तशी तू साड्या आणल्यायस..." इति "अहो"!)

माणसाचे दोनाचे चार होउन दोन वर्ष झाली. तेव्हा आता ह्या क्लोझेटमध्ये त्याला एका बारक्या कोपर्‍यात जागा मिळाली असेल तरी खूप Proud

Happy मस्तय वॉर्डरोब..
आणी किती छान आवरलेला.
आता समर वेअर वेगळे करून विन्टर वेअर पॅक करून नजरेआड करून टाक म्हंजे विकांताला परत शॉपिंग ला जाऊ शकतोस .. Happy (ही माझ्या नवर्‍याची आयडिया Wink )

@ बी- आता 'बया' म्हटल्यावर कुणी इकडे येऊन सांगू धजावेल काय कि तिच्याकडे किती सँडल्स,चपला हायेत त्या?????????? Lol

हे नक्की घरातल्या क्लोझेटचे फोटो आहेत की एखाद्या दुकानातले ???)
इतके व्यवस्थित लावलेले पाहुन मला संशय येतोय...

बारक्या कोपर्‍यात जागा मिळाली असेल तरी खूप >>>> हो ना... बघु बामा म्हणतोय की नविन फोटो टाकू का, म्हणजे लोकांना कळेल खरे काय नी खोटे काय Happy

बघु बामा म्हणतोय की नविन फोटो टाकू का, म्हणजे लोकांना कळेल खरे काय नी खोटे काय >> हो हो, टाकच नविन फोटो. बामाच म्हणणं आहे कि तिच्या कपड्यांचा काउंट तुझ्या कपड्यांपेक्षा कमी आहे. Wink

हे हे हे ..
हे बा.मा. बराच वेळ कळलं नाही.
मग एकदम कळ्ळं.

बाई माणुस..
तुम्ही लोक अशक्य आहात..
हसतेय केव्हाची...

Pages