ती

Submitted by amol_koli on 30 September, 2011 - 06:50

ती सुंदर ना गोंडस
पण शांत ती....
ती आहे कशी जवळ
पण दूर ती....

ती असते कशी सोबत
जशी अबोल न निरागस
माझ्या प्रेमाची ती हुर
मृगजाळा पर ती दूर ...

ती चंचल ती कोमल
जसे काव्य कविचे
करी बेहोश मन माझे
अन कधी स्व:ताचे

कधी जाते ती रुसून
आंधारात पुसून...
का आठवतेय ती माजला
माझ्या ह्रदया पासून...

ती नयनी आहे माझ्या
अन अश्रू त ती....
ती स्पर्शात माझ्या
अन शब्दात ती ....

दुखात ती सुखात ती
आई च्या प्रेमळ स्पर्शात ती
राहील ती जवळ माझ्या
बनून माझी सावली ती

नाही दूर ती जाणार
नाही जवळ ती येणार
अनंत अशीच राहील माझी
तीच ती सावली माझी

तीच ती सावली माझी

गुलमोहर: 
शब्दखुणा: