Submitted by बागेश्री on 28 September, 2011 - 08:43
आज दान मागायला
तू दारी आलास....प्रेमाचं!
अगदी काल- परवा,
जी असहाय्यता मी चेहर्यावरून
उपटून टाकून दिली,
तीच पांघरून...
खाड्कन दार आपटून
उभी होते पाठमोरी,
दार बंद झाल्याचा आवाज
आतूनही आला... मनाच्या गर्भातून
घुमत....
तू बाहेर असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....
मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
कडी उघडण्याची,
बेदरकारपणे चेचलं 'तिला'.....
आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्या आसवांचं कारण मात्र
अनाकलनीयच!
गुलमोहर:
शेअर करा
आवडली.
आवडली.
भावगर्भ कविता ! आवडली.
भावगर्भ कविता ! आवडली.
बागुमाई __/\__ काय सुर्रेख
बागुमाई __/\__ काय सुर्रेख लिहिलियंस...
खूप आवडली!!!
कविता- एक्सप्रेशन... सगळच
कविता- एक्सप्रेशन... सगळच छान... अभिनंदन !!!
ये हुई बात. कविता माझ्या
ये हुई बात.
कविता माझ्या आवडत्या लेखनात मड्डम. गम्मत वाटली मला- ही प्रासंगिक नाहीच कविता.
निर्णय घेणारा कुणीही असू शकतो/ते, आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर घ्यावा लागलेला कठोर निर्णय,
हैराण होउन घेतलेला निर्णय एका प्रसंगात मांडून दाखवलास.
सलाम कल्पकतेला तुझ्या.
काही दिवसांपूर्वी तुझ्या कथेला वोट पण दिले होते... आता कविता पण आवडली.
विडम्बने वाचत इथे पोहोचलो, ते चांगले केले.
सलाम कल्पकतेला तुझ्या.>>>>>
सलाम कल्पकतेला तुझ्या.>>>>> आमचाही
वॉव गिरिशजी, तुमचा अभिप्राय,
वॉव गिरिशजी, तुमचा अभिप्राय, आणि तो ही 'एक्सप्रेशन' ला धरून... फार फार आभार, आनंद झाला खूप
किरण, वनराई, चिंगी आणि वर्षू ताई
@ नितीन- हिअर यु आर!! परफेक्ट अनॅलिसिस... कविता पोहोचल्याचं समाधान मिळालंय!!
आभार तुमचे!
आवडली
आवडली
गिरीश, मी मांडलेलं मत
गिरीश, मी मांडलेलं मत थोडक्यात विशद केलंत
तुमचाही प्रतिसाद आवडला.
आवडली. खुप भावुक आणि खरी.
आवडली. खुप भावुक आणि खरी.
(No subject)
Pages