उड उड के देख जरा उड उड के....

Submitted by रोहित ..एक मावळा on 28 September, 2011 - 06:40

मामा उर्फ मायबोलीकर मावळे आपल्यासमोर घेऊन येत आहेत .... उड उड के देख जरा उड उड के..
निर्माता :- स्वखर्चाने...
दिग्दर्शक :- आपल्या कर्माने .....
छायाचित्रण :- आलटुन पालटुन ...
कलाकार :- उड्या मार तान कर उर्फ यो रॉक्स , न्यु वन उर्फ नविन आणि रो वन ... उर्फ रोहित.

तर कहानी अशी आहे की बर्‍याच दिवसापासुन एक प्रख्यात उड्यामार'खोर' डोंगरात धुमाकळ घालतोय.त्याच्या उड्यांनी दर्‍याखोर्‍यात दहशत पसरलेय.म्हणुन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी दोन कॅमेराशुटर नेमलेत.नुकतीच खबर्‍याकडुन आलेल्या माहितीनुसार तो उड्यामारखोर शहरातुन उड्या मारण्यासाठी माळशेज प्रांतातल्या सिंडोळाच्या डोंगरात गेलाय.त्याला कॅमेरात कैद करण्यासाठी न्यु रो रवाना झालेत.
उड्या मारखोर सारख्या उड्या मारता याव्यात म्हणुन न्यु अन रो ची ट्रेंनिग झाली आहे.

न्यु

रो

अरे वा जमतायत उड्या ... पण तो उड्या मार तान कर कुठे हाय ...

सापडला .... बघा कसा झाडाला लटकलाय तो उड्यामार खोर ...

पळायचा प्रयत्न करु नकोस ....

या उडी पाँईट वरुन सटकला पण पुढे भेटेलेच तो....
थोडा आराम करुन न्यु रो पुढे रवाना झाले...
अन एका बेसावध क्षणी न्यु वर त्या उड्यामार खोराने हल्ला चढविला.

चवताळलेला न्यु ....

मग काय .. न्यु अन उड्या मार तानकर यांच्यात तुंबळ युध्द जुंपले.

ए ढिश्शुम ...

ढिश्शुम.....

कधी उड्यामार खोर भारी ....

तर कधी न्यु ...

एका टप्प्यावर न्यु ला वर्मी घाव लागला.

मग रो वन त्याच्या मागे लागला...
हवेतली पळापळ सुरु झाली.

उड्या खोराच्या उड्याचे उत्तर रो ने उड्यांनी दिले.

पण उड्यामार खोर तो उड्यामार खोर ...

अरे पण हे काय कहाणीला नव वळण ....

न्यु वन अन रो वन सुद्धा उड्या मार तानकर ला सामिल झाले. आता ते एकत्र मिळुन डोंगरात जाऊन उड्या मारतात.

आता तर प्रत्येक उडीमारखोराने आपआपली स्वाक्षरी अदा निर्माण केली आहे.

न्यु वन उर्फ नविनची हनुमान उडी ...

उड्या मार तान कर उर्फ यो रॉक्स ची यो स्पेशल ...

रो वन उर्फ रोहित ची गरुड झेप ....

टिप :
१) कहानीतील पात्र काल्पनिक नसुन जिवंत आहेत अन त्याचा वास्तविक जीवनाशी संबध आहे.
२) कृपया उड्या अन फायटींग स्टंट घरी करण्याचा प्रयत्न करु नये.
उड्या मारायच्याच असतील तर आमच्याबरोबर ट्रेकला या. Happy

घाबरु नका .. पिक्चर संपला नाही अजुन मित्रांनो ... बाकीचा वृतांत यो लिव्हलच... (सिंदोळा)
आणि हो अजुन एक आपला उड्या मारतान कर उर्फ यो लवकरच उड्यांच्या दुनियेतुन वेगळ्याच दुनियेत कैद होणार आहे त्यासाठी सर्वांनी दोन मिनिटे जागेवर उड्या माराव्यात.

उड उड के देख जरा उड उड के.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आणि हो अजुन एक आपला उड्या मारतान कर उर्फ यो लवकरच उड्यांच्या दुनियेतुन वेगळ्याच दुनियेत कैद होणार आहे >>> जल्ला आता जोड्याने उड्या मारणार की काय?

हाहाहाहाहा...काय जबरदस्त जमून आलय...
उड्याखोर आणि त्यांचे कॅप्शन्स.....
रोमा तुझ्या प्रतिभाशक्तीला सलाम....

लोक्स - योच्या लग्नात त्याला एकाच जागी धरून ठेवा...नायतर तिथे पण उडी मार संचारला तर भटजींची पंचाईत व्हईल....:)

लोक्स - योच्या लग्नात त्याला एकाच जागी धरून ठेवा...नायतर तिथे पण उडी मार संचारला तर भटजींची पंचाईत व्हईल.... Rofl

योच लग्न एखाद्या गडावर करा रे आणी वराती मंडळीना पण उड्या मारायला लावा.
शुभ मंगल सावधान - मारा उडी , शुभ मंगल सावधान - मारा उडी Biggrin

रोहित - उडी उडी गोपाळा.... Happy

बापरे काय खतरनाक उड्या आहेत. सांभाळून उड्या मारा रे बाबांनो.>> अनुमोदन.
शेवटची उडी तर भयान.
ह्या असल्या भन्नाट उड्या कैद करण्यासाठी लागणार्‍या सेटींगचे पण डिटेल्स सांगा बरं.

77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif77.gif

चँप, ईनमीनतीन.. Biggrin Lol

@ नलिनी.. सेटींग्ज वगैरे काही नसते.. आजकाल सगळ्या डिजीकॅममध्ये ऑटो सेट असते तेव्हा असे फोटो अचूक टायमिंगला फक्त क्लिक करायचे असते.. उडी जर उंच मारली तर टायमिंग चुकले तरी फोटो हवेतलाच येतो.. Happy

जबर्दस्त वेगवान उडीपट पाहाण्याच भाग्य तुम्हा मित्रांमुळे लाभलं.
आयला नुस्ता कल्ला करतावसा Happy

रोमा,

सगळी प्रचि भन्नाट आलीयेत. शेवटली उडी तर उंचावरून खाली मारल्यासारखी वाटते. पाहून उरात धडकी (की उडकी?) भरते. शेपटी नसतांना असल्या उड्या मारणं म्हंजे ज्यामच कौतुकास्पद! Wink आणि धावते (की उडते) समालोचन एकदम लाजबाब! प्रस्तुत लेख म्हणजे मानवी आणि जनावरी कार्यकौशल्यांचं एकसमयावच्छेदेकरून प्रकटनच जणू! Biggrin

पुढील उडीमंथनाच्या प्रतीक्षेत....

-गा.पै.

भारी!:)

......

......रोमा...तुझ्या उड्या मस्तच आल्या आहेत रे......२ री, १४ वी आणि १८ वी उडी .....लय भारी मित्रा.........

Pages