अंतिम युद्ध

Submitted by चिंतातुरपंत धडपडे on 27 September, 2011 - 03:28

अचानक कोणत्यातरी धक्यामुळे नम्रताला जाग आली.जाग आली म्हणजे तिला तसा वाटले पण डोळे उघडायला तयारच नव्हते. मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले . तिला वाटले आपण आताच तर झोपलो होतो इतक्या लवकर सकाळ कशी झाली . तिने डोळे चोळत इकडे तिकडे बघितले . तिला एकदम थंड स्पर्श जाणवला . तिने बघितले तर ती एका फारशी वर झोपली होती . तिला थोडे आश्चर्य वाटले . झोपताना तर ती तिच्या रूम मध्ये पलंगावर झोपली होती . त्या खोलीचा काहीच पत्ता नव्हता . ती ज्या जमिनीवर झोपली होती ती जमीन जुन्या काळ्या दगडांची होती . ते दगड एकमेकांत बसवले होते . जमिनीतील दगड वापरून अगदी गुळगुळीत झाले होते . बघून कोणालाही समजले असते कि एकेकाळी इथे माणसाचा बराच वावर असला पाहिजे . तिला समोरच काही अंतरावर एक वस्तू दिसली . ते एक जुने पडके मन्दिर होते .म्हणजे उरलेले भग्नावशेष तिथे होते . त्यावरून ती जी वस्तू दिसत होती तिला मंदिर असे म्हणू शकतो. ती वस्तू बरीच शतके जुनी असल्यासारखी दिसत होती . जमिनी प्रमाणेच पूर्ण काळ्या दगडात बांधलेली. प्रवेशदारा समोरच दोन सिंहाचे पुतळे होते . पण पण त्यांच्या डोक्यावर हे काय आहे ? त्यांची डोकी सिंहा सारखी नक्कीच
नव्हती . नीट बघीतल्यावर तिला दिसले कि मानवी पशु सारखी होती . अक्राळ-विक्राळ चेहरा होता तो . ताचे दात हिंस्त्र जनावरासारखे दिसत होते . दोन मोठे सुळे बाहेर आले होते .ते भागून नम्रता नखशिखांत शहारली . नम्रताला असे वाटू लागले कि हे वस्तू आपण कुठे तरी बघितली आहे . पण कुठे ते तिला आठवेना .पण ती वस्तू म्हणजे मंदिर नक्कीच नव्हते . मंदिरात कसे एक प्रसन्न भाव भरून राहिलेला असतो . मंदिरात पाऊल ठवले के एकदम प्रसन्न वाटते . पण इथे तसे काही वाटत नव्हते .इथे एक भायाणपणा भरून राहिला होता. मनावर एक प्रचंड ताण जाणवत होता . सर्वत्र काळोख भरून राहिला होता . एक विचित्र शांती होती . एक वादळापुर्वीची शांती असते तशी भयाण शांती. मनाला अगदी नकोशी वाटणारी शांती .वारयाचे तर कुठे नाव पण नव्हते .पण तरीही तिला थंडी वाजत होती . इतक्यात तिला तो आवाज ऐकू आला . तो भयाण हसण्याचा आवाज .तो आवाज इतका भेसूर होता कि तिच्या अंगावर काटा आला .मानेवरचे केस ताठ उभे राहिले . विविध भावनाचे मिश्रण त्या आवाजात होते .तरी पण तो आवाज मानवी वाटत नव्हता .एक पाशवी अमानवी झाक त्या आवजात होती . ऐकणाऱ्याला जागेवरच खीळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्या आवाजात होते .त्या हसण्यात एक क्रूरता होती , एक गर्व होता . त्या आवाजाचे प्रतीध्वनी सर्वत्र उमटून तिला तो आवाज परत परत ऐकू आला . तो एक हसण्याचा आवाज होता . त्या आवाजाने तिने अशा आवाज आज पर्यंत तिने कधी ऐकला नव्हता . पण कुठेतरी तो आवाज ओळखीचा वाटत होता . आधी हि हा आवाज आपण कुठेतरी ऐकला आहे . पण कुठे ? तिला काही आठवेच ना . आवाज मंदिरातून येत होता . अचानक मनातले विचार शांत झाले . एखादा हुकुम यावा त्या प्रमाणे ती प्रवेश दरवाजाकडे ओढली जावू लागली .पण आत जायची इच्छा नव्हती . कोणीतरी तिला तिच्या मनाविरुद्ध ओढत आहे आणि ती ओढले जात आहे असे तिला वाटू लागले . तिच्या मनाचा प्रतिकार वाढला . तिला दरदरून घाम फुटला . तसा तिच्या मनावर भार वाढू लागला . अचानक तिला गुंगी आल्या सारखे झाले . तिचे शुद्ध हरपली आणि ती खाली कोसळली . खाडकन तिचे डोळे उघडले आणि ती उठून बसली . तिने बघीतले तर ती आपल्या खोलीमध्ये पलंगावर होती . घामाने निथळत होती . मग मगाशी दिसले ते काय होते ? तो सर्व देखावा खरा असल्या सारखाच भासत होता . मगासचे स्वप्न होते कि आताचे स्वप्न आहे ? काय होते आहे मला ? डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले . अचानक डोक्यात एक सणक उठली . तिने डोके गच्च धरून ठवले . थोड्या वेळाने ती डोकेदुखी थांबली . परत विचारांची शृंखला सुरु झाली . ती मगासचे स्वप्न आठवू लागली .
स्वप्न माणसाच्या अंतरंगाचे स्वरूप असते . घटना माणूस विसरतो पण मनाच्या अंतर्गत ती जाणीव शाबूत असते . काही घटना खूप भानायक असतात .त्या विसरणेच सोयीस्कर असते . अचानक कोणत्या तरी घटनेने ती विस्मरणीय घटना जागृत होते .स्वप्न हे माणसाच्या भाव भावनाचे प्रतिबिंब असते .
कदाचित मानसिक ताणामुळे आपल्याला अशी भयानक स्वप्ने पडत असतील .नम्रताने आपल्या मनाची समजूत घातली .आणि ते परत झोपायचा प्रयत्न करू लागली .पण तिची झोप गायब झाली होती .तिला परत झोपच येईना .मग तिचे त्या स्वप्नाबद्दल विचार पुन्हा सुरु झाले .पण तिला कल्पना नव्हती कि हि तर एका घटनेची सुरवात होती . एक भयानक धोका जो हजारो वर्षा पासून मानवजाती वर येवू पाहत होता आणि सर्व घटनांचा केंद्रबिंदू ती ठरणार होती . प्रत्त्यक माणसाचे भविष्य ठरलेले असते .तिचेही भविष्य लिहिले गेले होते. हजारो वर्षापूर्वीच .पण योग्य वेळ आली नव्हती .

क्रमश :

- - - - चिंतातुरपंत धडपडे

गुलमोहर: 

चिंतातुर धडपडे, आपण एक महान, पोहचलेले 'साहित्य चोर' आहात....हे मायबोलीवर जाहीर झाले आहे.....तेव्हा 'प्रमाणित' आणि 'प्रामाणिक' प्रतिसादांची अपेक्षा करु नये!!!!

चिंतातूरपंत धडपडे, तुम्ही माझी इथे मायबोलीवर प्रकाशित झालेली कथा 'Miss you.' तुमच्या वेबसाईटवर माझी परवानगी न घेता छापली आहे. ती ताबडतोब तेथून काढा.