क्रोशाचे रुमाल

Submitted by अनया on 26 September, 2011 - 05:45

मला पहिल्यापासून विणकाम, भरतकाम करायला खूप आवडत. लहान असताना मण्याची तोरणे नाहीतर लहान लहान भरतकाम करत राहायचे. आता काम आणि संसार सांभाळताना वेळ कमी मिळतो. पण ‘आवड असली की सवड मिळते’ म्हणतात, तशी सवड काढून काहीतरी उद्योग चालू ठेवते. लेकाचा अभ्यास घेताना नाहीतर टी.व्ही. बघताना हात चालू असतो. नवऱ्यानेही आता निषेध नोंदवणे सोडून दिलय!!

तर, माझी ही आवड माहिती झाल्यामुळे, ज्यांचा विणायचा उत्साह बाजारातून लोकर आणेपर्यंतच टिकतो अश्या मैतीणी, नातेवाईक, शेजारी-पाजारी ह्यांची मोठी सोय झाली आहे. उरलेली लोकर संपवण्याची उत्तम कल्पना म्हणजे ती मला देउन टाकायची!! काही वेळा ती लोकर बाळाचा स्वेटर होईल, इतकीही नसते. मग मी त्या सगळ्याचे छोटे-मोठे रुमाल क्रोशाच्या सुईने विणले. ते देवाला आसन म्हणून, टेबलवर असे कुठेही वापरता येतात, त्यामुळे कोणाला भेट द्यालाही उत्तम!!

DSC01950.JPGDSC01953.JPGDSC01954.JPGDSC01955.JPGDSC01956.JPGDSC01957.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम !!! अनया एक विनंति आहे,हे सगळे प्रकार एकत्र फोटोत टाकण्या पेक्षा एक नविन धागा सुरु कर आणि प्रत्येक रुमाल्,टि कोस्टर्,आसन हे स्टेप बाय स्टेप टाक,म्हणजे माझ्या सारख्या हे सर्व शिकून विसरलेल्या लोकांना पुन्हा नवि सुरुवात करता येईल. प्लिज वेळ काढुन हा प्रयत्न करच!!!

अनया, खूपच छान आहे. मी सुद्धा पुर्वी खूप विणकाम करायचे (दोर्‍याचे) नंतर वेळच मिळेनासा झाला आणि ते काम मागे पडले. पण सुखदाचि सुचना खरंच खूप चांगली आहे.

अनया, खूप छान विणलय. असे रुमाल जोडून शाल, बेडकव्हर किंवा जॅकेट, कार्डीगन,स्कार्फ पण बनवता येतो.

छान आहेत सगळॅच रुमाल.

मी पण बरेच विणले आहेत रुमाल, पण आता एकही विण लक्षात नाही. शेवटच्या फोटोतला अबोली रंगाच्या रुमालाची विण दे नक्की.

अनया,खूप सुंदर केलं आहेस.मला तिसर्‍या फोटोतला ऑफ व्हाईट आणि पाचव्या फोटोतला जांभळा खूप आवडला.
मलापण खरं शिकायचंय.एखादं पुस्तक/साईट सजेस्ट कर ना.

सहीच आहे. मी मागच्या वर्षी क्रोशाची फुलं करायचा कीट आणला होता तो अजून पडलाय कपाटात. ह्या निमित्ताने आठवण झाली. ह्या विकांताला काढून झटापट करून पहाते. पण एकंदरीत मला ह्या विषयात गती नाही Sad तुमच्या हातात मात्र कला आहे.

सर्वांना उत्साह वाढवणाऱ्या प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद. मायबोलीवर लिहायला आणि फोटो डकवायला शिकले आहे. आता धागे उघडायला शिकले की नक्की उघडते!!

हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या 'दोरयाचे क्रोशे विणकाम' ह्या पुस्तकातील नमुने वापरले आहेत. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा. छोटे रुमाल करायला १५-२० मिनिटेच लागतात. केल्यावर फोटो टाकायला विसरू नका!

अनया, हे पुस्तक ज्यांनी असं विणकाम कधीच केलेलं नाहिये त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे का फक्त अनुभवी लोकांसाठीच आहे?

Pages