भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?

Submitted by पाषाणभेद on 25 September, 2011 - 19:16

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?

भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसृत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. परंतु या सर्व कारणांमध्ये भारतीय अन्नाची चव व ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी किती कारणीभुत आहेत?

या गृहीतकामागे बर्‍याच घरांमध्ये भारतीय अन्नपुर्णा घरी अन्न बनवतात असे गृहीत धरलेले आहे. भारतीय पदार्थ चविष्ट असण्यामागे या अन्नपुर्णांचा हात स्पष्टपणे असतो. सढळ हाताने चमचमीत अन्नपदार्थ, मिठाया बनवण्यात सर्व जगात पहिल्या क्रमांकासाठी भारतीय उपखंडातल्या स्त्रीयांचा समावेश करावा लागेल. आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबाबतीत त्याकाळी शास्त्रशुद्ध अभ्यास नसल्यामुळे ती आकडेवारी मिळणार नाही.

भारतीय नारी ही घरातल्या व्यक्तीच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत फारच जागरूक असते. पतीला ही भाजी आवडत नाही - नको डब्यात द्यायला, मुलाला डब्यात निरनिराळे पदार्थ देणे जेणेकरून तो शाळेत डबा संपवेल, असे तीचे चालू असते. अर्थात या सर्वांत त्या स्त्रीचे कुटूंबाप्रती असलेले प्रेमच निर्देशीत होत असते. असल्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला आदर आहेच, त्यात वाद नाही. एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच.

आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. यांचेही प्रमाण इतर समाजात व भारतीय समाजात व्यस्त आहे. महिन्याकाठी एकतरी सण समारंभ आपल्या संस्कृतीत करण्याचे प्रमाण आहे. त्यावेळी काहीतरी गोडधोड, चमचमीत पदार्थ घरी केले जातात.

भारतीय समाजात वाढणारे आजारपणाची सामाजीक व्याप्तीला नवीन दिशा मिळण्याच्या हेतूने वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून चर्चा अपेक्षीत आहे. (या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत, पिझ्झा बर्गर यांची भारतातही चंगळ होते आहे हे टाळावे. संशोधन करणार्‍या बर्‍याचशा संस्था ह्या अमेरीकन (अभारतीय) असल्याने बहूतेक शारीरीक स्केल्स ह्या अमेरीकन/ ब्रिटीश लोकांनाच गृहीत धरून असतात. उदा. BMI, उंची/ वजन/ रक्तदाब यांचा रेशो आदी.

अवांतरः (पाभेचा फुटकळ धागा म्हणून दुर्लक्ष अपेक्षीत नाही.)

गुलमोहर: 

>>> भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय? <<<
नाहि, तसे म्हणणे देखील मी पापकारक मानतो.
जबाबदार असतीलच तर ते गिळणारे जबाबदार असतात.
कसलाही विधीनिषेध न बाळगता, शिस्त न बाळगता मनात येईल तेव्हा व तितक्या वेळा, मनात येईल तशा पद्धतीने बसुन, मनात येईल ते टीव्ही/रेडिओवरील कार्यक्रम बघत, मनात येईल तितके खात सुटणे वर जोडीला कसलाही शारिरिक कष्टाचा व्यायाम वा कष्ट न करण्याची ऐदी वृत्ती, इकडची काडी देखिल तिकडे न करण्याची "शहरी पुरषी" जीवनपद्धती, यामुळे गिळलेले पचण्यात जे काही दोष-विकार-व्याधी तयार होतात, त्यास अन्न तयार करणार्‍या अन्नपूर्णेला जबाबदार कसे काय धरता येईल? हे म्हणजे चोर सोडुन सन्याशाला बळी देण्यासारखे आहे. यामुळे वरील विषयच अमान्य!

आपण खात असलेल्या १० % अन्नावर आपण जगतो, उरलेल्या ९० % अन्नावर आपले डोक्टर जगत असतात... हे वैश्विक सत्य आहे. यात स्त्रीयांचा दोष नाही.

कुठल्याही आजार पणास अन्नपुर्णा संपुर्ण जबाबदार नक्कीच नाही आहे. घरातील सर्व प्रौढ मंडळी तेव्हढीच जबाबदार आहे.

आपल्याला किती कॅलरिज आवश्यक आहेत, किती खर्च होतात, किती मागे शिल्लक पडतात ? याचा प्रत्येकाने विचार करावा. खाण्याच्या, पिण्याच्या, कामाच्या रिती पद्धती बदलत आहेत. जंक फुड, शितपेये (कोक, पेप्सी), पिझ्झा यांचे दैनंदिनात प्रमाण वाढत आहे. अत्यंत चुरशीच्या जिवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यास, शिकवण्या, शाळेचे तसेच पालकांच्या अपेक्षांचे ओझे वहातांना मुले मैदानावर कमी खेळत आहेत. ज्या प्रमाणात बाहेर, मौदानात खेळायला हवे तेव्हढे होत नाही.

आपल्या सरासरी आहारातील कॅलरिजचे (सकसता) प्रमाण वाढले आहे का? आपण साधारणत: पदार्थांचा आकार (volume or quantity) बघतो, त्यात किती कॅलरीज असतील ते विचारात घेत नाही. दातांची एक ठरावित काळ (e.g. 20 minutes) हालचाल झाली कि मेंदूला पोट भरले आहे असा संदेश जातो. आता कमी आकार व जास्त कॅलरिज असलेला आहार घेतला तर दाताला कमी काम करावे लागते, त्याला पोट उपाशी आहे असे वाटते व तसा संदेश मेंदूला पोहोचवतो... परिणामी थोड्या जास्त कॅलरिज (पण तोच आकार वा वजन) आपण घेतो.

असा आहार विकसीत करता येईल का ज्यात गरजेपुर्त्या कॅलरीज असतील पण ते संपवायला २५ मिनीटे लागतील?

आजारपणाचा मुद्दा समजला पण अन्नपूर्णेला दोष देणे योग्य वाटले नाही. लिंबुदांच्या वाक्यांशी काही प्रमाणात सहमत..

आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. <<<
मसाल्याच्या पदार्थांमधे बरेच काही औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेकदा रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. हे माहित नाहीये का?

मधुमेह इ. साठी जेनेटिक्सचेही कारण असते.
आपली जीवनशैली बदलली हे या प्रकारच्या बिघाडाचे मोठे कारण आहे. कमी झालेली हालचाल, वाढते ताणतणाव या गोष्टी जास्त जबाबदार आहेत.
खाणार्‍याचे तोंडावर नियंत्रण नसेल तर त्यासाठी करणार्‍या/वाढणार्‍याला जबाबदार धरायचा प्रकार अजब आहे. घरात कशा प्रकारचे अन्न बनविले जावे याच्या निर्णयात आणि अंमलबजावणीत घरातल्या सगळ्यांचाच सहभाग असायला हवा.

बाकी आजच्या काळात भरपूर तेल , तूप, साखर, इ. वापरून पदार्थ करणार्‍या गृहिणी तुम्हाला कुठे दिसल्या?

माझ्या मते आजारांच्या वाढत्या प्रमाणाला जबाबदार आहे आजची जीवन शैली,प्रदुषण.

पुवीही चांगले चमचमीत, भरपुर तेल घालुन केलेले पदार्थ सेवनात असायचे. पण त्या काळी यंत्र कमी होती. घरातील सगळ्याच व्यक्ती अंगमेहनत करत होती. गाड्या आजच्यासारख्या नव्हत्या. काही मैल चालत जावे लागायचे. त्यामुळे शारीरीक व्यायाम होउन तेलकट, चमचमीत, शर्करायुक्त पदार्थ पचले जायचे. पण आता यंत्रयुगात अंगमेहनत कमी झाली, ऑफिसमध्ये बैठे काम वाढलेले आहे त्यामुळे अन्नपदार्थ पचले जात नाहित. पण योग्य व्यायाम केल्यास ह्या तक्रारी उद्भवत नाहीत.

अजुन एक कारण आहे ते म्हणजे आजची शेतीच रासायनीक झाली आहे. पुर्वीसारखी नॅचरल खते जाऊन आता हानीकारक किटकनाशके, खते शेती, फळझाडांना वापरली जातात त्याचाही परीणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो. तसेच वेगवेगळ्या फॅक्टरीज, कंपन्यांमुळे, वाढत्या वाहनांमुळे प्रदुषण वाढले आहे. परदेशी पदार्थ आपल्या देशात ठाण मांडून आवडीचे झाले आहेत. हे पदार्थ आपल्या हवामानानुसार आपल्याला सुट होत नाहीत. पण हल्ली तरूण पिढी जिभेला जास्त आणि स्वास्थ्याला कमी महत्व देताना दिसते.

आपल्या देशातील पदार्थ हे आपल्या हवामानानुसार पचण्यास योग्य असतात. फक्त त्याच्या प्रमाणात अतिरेक होऊ नये. जरी आपले मसाले तिखट असले तरी त्या मसाल्याचा दाह कमी करण्यासाठी मसाल्यांमध्ये जिर, धणे सारखे शित घटकही घातले जातात ज्यामुळे मसाल्याचा दाह शरीराला कमी होण्यास मदत करतो.

ह्यात अन्नपुर्णेचा काय दोष ? माझ्यामते वरील कारणांचा दोष आहे. अन्नपुर्णा ही घरातील व्यक्तिंची गरज भागवत असते. लहान थोरांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांचे स्वास्थ्यही व्यवस्थित राहील ह्याकडे लक्ष ठेउन आपली कसब पणाला लाऊन त्यांच्या गरजा भागवत असते. जर अन्नपुर्णेने आळसपणा करुन घरातील माणसांचे कुपोषण केले तर घरातल्यांचे स्वास्थ्य चांगले राहील का ?

>>>> आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. <<<
शक्यता वगैरे नको, पुरावा काये?
मसाल्याचे पदार्थान्ची निर्यात तेव्हाही होत होती, आत्ताही होते.

>>>> बाकी आजच्या काळात भरपूर तेल , तूप, साखर, इ. वापरून पदार्थ करणार्‍या गृहिणी तुम्हाला कुठे दिसल्या? <<<
केकताच्या सेरियल्स मधे किन्वा खानाखजाना मधे बघितले असेल टीव्हीवर! Wink
नै त कै? परवडतय का तेल्तुप हल्ली? साखर देखिल मरणाचि महाग झालीये! Sad

(च्यामारी इकडे तिकडे आमच्या धर्मावर रुढीपरम्परान्वर धार धरणारे तेवढ्याने समाधान होत नाही म्हणून आमच्या गिळण्यावर देखिल उतरताहेत की काय? Proud )

limbutimbu | 26 September, 2011 - 08:59 नवीन

>>> भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय? <<<
नाहि, तसे म्हणणे देखील मी पापकारक मानतो.
जबाबदार असतीलच तर ते गिळणारे जबाबदार असतात.
कसलाही विधीनिषेध न बाळगता, शिस्त न बाळगता मनात येईल तेव्हा व तितक्या वेळा, मनात येईल तशा पद्धतीने बसुन, मनात येईल ते टीव्ही/रेडिओवरील कार्यक्रम बघत, मनात येईल तितके खात सुटणे वर जोडीला कसलाही शारिरिक कष्टाचा व्यायाम वा कष्ट न करण्याची ऐदी वृत्ती, इकडची काडी देखिल तिकडे न करण्याची "शहरी पुरषी" जीवनपद्धती, यामुळे गिळलेले पचण्यात जे काही दोष-विकार-व्याधी तयार होतात, त्यास अन्न तयार करणार्‍या अन्नपूर्णेला जबाबदार कसे काय धरता येईल? हे म्हणजे चोर सोडुन सन्याशाला बळी देण्यासारखे आहे. यामुळे वरील विषयच अमान्य!

<<<<
टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन
(सन्याशाला सुळी अशी म्हण आहे असं वाचलं होतं. टायपो असावी.)

>>>>>>भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय? >>>>

ह्या महागाईच्या जमान्यात तुम्हाला दोन्ही वेळेला पोटभर गिळायला मिळाव ह्या साठी स्वता:ची हाडं
झिजवणार्या अन्नपुर्णेला कोणी कस काय जवाबदार धरणार?

वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा व पदार्थ दोन्हीही जवाबदार नाहीत. मग ह्याला जवाबदार तर कोण?

अर्थातच ह्याला जवाबदार आपलीच व्रुत्ती, कसेही, कोठेही व काहीही खाणे आणी वर शरीरा ला ना व्यायाम ना
कसलेही परीश्रम.

जर प्रदेशनिहाय पारंपारीक पाक्रुजर बघितल्या तर त्यातला वेगळेपणा तुम्हाला जाणवेल. हे प्रदेश म्हणजे
स्वातंत्र्यानंतर देशाचे पाडलेले तुकडे (राज्य) नव्हे.

१. भारतात सर्वाधीक तिखट जेवण हे आन्ध्र प्रदेशात व राजस्थानात बनवले जाते. ज्या प्रदेशात जास्त गरमी
त्या ठिकाणचा आहारहा spicy असावा जेणे करून घाम येण्यास मदत होते व शरीर थंडं रहाते.
२. ह्या शेजार च्या राज्या (Tamilnadu) मध्ये चिंचेका अतिरेक. सर्व पदार्थात ! येथे उकडा तांदुळ
बनतो पण खाल्ला जात नाही.
३. केरळ येथे उकडा तांदुळ बनत नाही पण खाल्ला मात्र जातो. दोन्ही वेळच्या जेवणा सोबत कोमट पाणी.
सर्व मुख्य पदार्थ तांदळाचे.
४ उत्तर व दक्षिण कोकण, केरळ सारखेच येथे उकडा तांदुळ खाल्ला जातो. दोन्ही वेळच्या जेवणा सोबत
कोमट पाणी. सर्व मुख्य पदार्थ तांदळाचे.
५. पंजाब तुम्हाला ( म्हणजे पाव्हण्याला) दूध पाहीजे का अस विचारणार नाही ! पण न विचारता
लस्सी मात्र घेण्याची गळ घालतील ! ईथेच तुम्हाला दुधाचे पनीर करून त्याचे पदार्थ करून मिळतील.
६. महाराष्ट्र तुम्हाला ( म्हणजे पाव्हण्याला) दूध पाहीजे का अस विचारणार नाही पण दूधाचे बासूंदी करून
खाउ घालतील.

आता सांगा जर तुम्ही पंजा बात जाऊन बासूंदी मागीतली तर मिळणार नाही, का? कारण येथे दुध च
ईतके घट्ट व मलईदार की त्याचे दही / पनीर करूनच लोक पचवू शकतात. पण महाराष्ट्रतल दुध हे
पाणचट, म्ह्णून बासूंदी.

जर तुम्ही आन्ध्र प्रदेशात आहात आणी रोज पनीरचे पदार्थ खाउ लागलात तर ते कसे पचणार ?

>>>> (सन्याशाला सुळी अशी म्हण आहे असं वाचलं होतं. टायपो असावी.)
नै टायपो नैये! मुद्दामहून बळीच लिहिलय! अहो हल्लीच्या पिढीला सूळ किन्वा सूळी देण म्हणजे कुठ काय ठाऊक असणार? त्यातुन आईबाबान्नी बालपणी बालमनावर परिणाम होऊ नयेत म्हणून काही सान्गितलच नसेल तर काहीच कळणार नाही अन सुळी की झाडाची मुळी अशी गल्लत करुन बसतील.
बळी हा शब्द कसा? भारदस्त वाटतो! Proud स्वातन्त्र्यानन्तर याचा सार्वत्रिक प्रसार झाला अन देवादिकान्ना वाहिल्या जाणार्‍या नरबळी/पशूबळी/भाताच्यामुदीचाबळी व्यतिरिक्त.... भूकबळी, खड्डेबळी, भ्रष्टाचारबळी, लाचदेऊबळी, हप्ताबळी, परिक्षाकॉपीबळी, रिझर्वेशनबळी, इलेक्शनचेबळी, बॉम्बस्फोटातील बळी, हुन्डाबळी, एकतर्फीप्रेमबळी असे असन्ख्य प्रकार निर्माण झाले. त्यातुन त्या विद्रोही वाल्यान्चा ब्रिगेडी धोषा सारखा अस्तोच चालू. त्यामुळे काये ना की "बळी" हा शब्द जास्त "पॉप्युलर" आहे. सबब तो वापरला! सूळी म्हणजे कस, अगदीच खेडवळ, मागास, पौराणीक वाटत, हल्ली चालत नाहीत पौराणीक शब्द!,नै का? Wink

खरे तर टिंबक्टू मधे पाऊस पडला म्हणून असे होते. Proud
माणूस काय करणार हो? माणसाला अक्कल कुठे आहे?
शिवाय काय वाट्टेल ते झाले तरी माझे काही चुकले नाही. काँग्रेस, भाजप, ब्राह्मण, हिंदू, यापैकी कुणाचा तरी दोष. नाहीतर शेवटी देव आहेच. तेव्हढ्यासाठी देवावर विश्वास आहे असे म्हणावे, म्हणजे काही झाले तरी त्याचाच दोष म्हणावे!

आता कुणि तरी उपोषण करा, दहा हजार 'साईन्स' असलेला अर्ज करा. आम्हाला पार्टीला जायचे आहे, मस्त दारू, नि चिकन, मटण, भजी, असे बरेच काही काही आहे तिथे, अगदी अमेरिकन ईश्टाईल, नो मसाले, नि नो लिमिट, आग्रहाची वाट बघायची नाही!!!!
Proud

लिंबूकाका,
आजकाल ते 'बाहूबळी' 'बळी तो कान पिळी' याच गोष्टी जास्त फेमस आहेत. या सगळ्या बाहूबळींना सुळी देण्याची कल्पना कशी वाटते? अन सुळी देण्याची प्रथा पौराणिक आहे? :आश्चर्यचकित:

माझ्या मते आजारांच्या वाढत्या प्रमाणाला जबाबदार आहे आजची जीवन शैली>> जागू १०० % अनुमोदन. उलट भारतीय आहारासारखी प्रांतानुसार विविधता, चव, सकसपणा इतर कुठल्याही देशात नाही. आपल्याकडील सर्व पदार्थ त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार (जिथे जे पिकते, वातावरण, व्यक्तीची शरीरयष्टी आणि आहाराची गरज उदा. पंजाबी लोकांचे तेलातुपाचे जास्त प्रमाण) बनवले जातात. पूर्ण ताटात विविधरंगी, चवी आणि प्रथिने-जीवनसत्वांनी युक्त आहार असतो. मीठ, लिंबू, कोशिंबीर, डाळी, चपात्या, भात, हिरव्या, सुक्या किंवा रस्सा भाज्या, पापड, लोणचे, तूप, दही...
मांसाहार्‍यांसाठी अंडी, मासे, मटण, चिकन... इतकी विविधता भारतातच असते!

आपल्याइथले मसाले आणि फोडण्याही किती विविध असतात... जिरे, मोहरी, मेथीदाणे, लसूण, कडीपत्ता, हिंग सर्व पचनास, रक्तशुद्धीकरणास मदत करतात.

जेवणाच्या बदललेल्या व अनियमित वेळा, घरी उशीरा येण्यामुळे क्वचित पुर्ण आहाराला काट देऊन शॉर्टकट मारणे, बाहेरील झटपट होणारे, तयार उपलब्ध असलेले आणि जास्त चवीढवीचे अन्नपदार्थ (पास्ता, पिझ्झा, इटालियन, चायनिज इ.) यांचा वाढता समावेश यामुळे कोलेस्टेरॉल, मधुमेह, ओव्हर्वेट, हार्ट ट्रबल्स असे विकार संभवतात. अती ताणतणाव, बैठी कामे, शून्य व्यायाम हे ही कारणीभूत आहे.

स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी साधं सात्वीक जेवण(वर पूर्ण ताटात सांगितलं गेलेलं ), इटालियन, चायनीज आणि बर्गरेतर चमचमीत पदार्थांचे प्रमाण कटाक्षाने अत्यल्प ठेवणे-(खूप खूप आवडत असतील तरीही!), जमेल तेवढा व्यायाम, मेडिटेशन येवढं तर करूच शकतो.

उलट आजच्या बायका नोकरी सांभाळून विविध साईटस वरून नाविन्यपूर्ण पदार्थ बनवायचा प्रयत्न करीत असतात. स्वत:च्या आणि प्रिय व्यक्तींच्या तब्बेतीविषयी अधिक सजग झाल्यामुळे जाहीरातीतही ते स्पष्ट दिसून येते. त्याव्यतिरिक्त मुलांना रोज पौष्टिक काय द्यावं यासाठी खाऊचा डबा, पटकन होणारे पण चवीने युक्त असे पौष्टिक पदार्थ यांचे कार्यक्रम त्या सवडीने का होइना पण आवडीने बघतात. ते करून बघतात आणि इतर मैत्रीणींबरोबर शेअरही करतात. त्यामुळे भारतीय अन्न किंवा अन्नपूर्णा या वाढत्या आजारांसाठी जबाबदार असू शकतील असे मला मुळीच वाटत नाही.

ड्रीमगर्ल. अनुमोदन.

हे असे बीबी का उघडले जाताहेत ते कळत नाही. जर इथे इतरत्र प्रकाशित झालेल्या मताचा संदर्भ असेल तर तो थेट दुवा देणे चांगले. नाही का ?
अशी विधाने आकडेवारींशिवाय कशी काय ग्राह्य मानता येतील ?
आणि अमेरिकेशिवाय जगात इतर खंड आणि देशही आहेत.

हो आणि पाभेचा कवितेचा धागा नाही, म्हणून आणि म्हणूनच वाचला !

आणि अमेरिकेशिवाय जगात इतर खंड आणि देशही आहेत.

तो संदर्भ एका अमेरिकन माणसाने दिला आहे. अमेरिकेतल्या लोकांना अमेरिकेखेरीज इतर काही देश, खंडे असतात हेच माहित नाही. त्यामुळे ते सर्वाचा संबंध फक्त अमेरिकेशी जोडतात.

आता भारतातल्या लोकांचे लक्ष नेमके 'अमेरिकन' शब्दाकडे का वेधले जाते बरे? इतरहि अनेक गोष्टी लिहील्या आहेत तिथे. माझी खात्री आहे मी युरोपियन, इंग्लिश असे लिहीले असते तर कुणि ढुंकूनहि पाहिले नसते, पण भारतात 'अमेरिका' म्हणजे एकदम काही पण लिहायला मोकळे. अमेरिकन लोक तिकडे ढुंकूनहि बघत नाहीत, पण यांचे चालूच!! सोडा नाद अमेरिकेचा - आपके बसकी बात नही वो!!

चर्चेला एक वेगळाच आयाम मिळाला आहे. बहूतेकांच्या मते अतिरीक्त अन्न पोटात जाणे, अन्नात जास्त कॅलरीज असणे व व्यायामाचा अभाव ही कारणे आहे.

वरील सर्व कारणे मी लेखात गृहीत धरलेली आहेच. मुख्य मुद्दा "भारतीय अन्नाची चव" (व ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी") हा आहे. (यात "ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी" ही गोड तक्रार आहेच.)

कदाचीत अन्नपुर्णा ही घरातली स्त्री- मग ती माता असूदे, पत्नी किंवा भगीनी असूदे - ही नात्यातली स्त्री असल्याकारणाने वरील चर्चेला भावनीक पदरही प्राप्त झालेला असावा. त्या माता-भगीनींच्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला असलेला आदर मी व्यक्त केलेलाच आहे.

बाहेरील जेवणात बर्‍याचदा 'तेलाफुलाची भाजी' नव्हती, भाजीला चव नव्हती अशी तक्रार असते. एक उदाहरण सांगतो: कोबीची भाजी जर कमी तेल वापरले तरीही शिजते, थोडी चवीला खालावते पण खाववली जाते. तिच कोबी जास्त तेल टाकून भाजी बनवली तर चव चांगली लागते. मग असलेच उदाहरण पुढे वाढवत नेवून ईतर अन्नपदार्थांनादेखील लागू होवू शकते.

राहीला मुद्दा आकडेवारीचा. सदर लेख काही सायंटीफीक मॅगेझीन मधला लेख वैगेरे नाही. जेवण जास्त जाण्यास "भारतीय अन्नाची चव" कारणीभुत आहे का याची शक्यता जोखणे हा मुद्दा होता. जास्त जेवण = पचण्यास जास्त शक्ती व त्याच शक्तीचा अभाव शरीरात मेद वाढण्यास कारणीभूत ठरते.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-01-30/india/28363513_1_...

http://www.hindustantimes.com/India-world-diabetes-capital/Article1-2458...

वरील लिंक्स उदाहरणार्थ दिलेल्या आहेत.

वाढती लोकसंख्या ही भारताला बहूतेक बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आणून ठेवते. उद्या समजा एखाद्याने स्पर्धा लावली की जगात एखाद्या दिवशी एखादा देशात किती जास्त लोकं सायकल चालवीणार? आपण (भारताने) ठरवीले की आपल्यालाच पहिला क्रमांक हवा, तर सक्तीने जास्तीत जास्त लोकांना सायकलवर फिरायला लावून आपण प्रथम क्रमांक घेवू शकतो. असलीच थिअरी भारतीय लोकांचे आयुर्मानाबाबतीत लागू करता येईल. तरीही भारतीय लोकांचे आयुर्मान वाढत आहे हे खरेच.

थोडक्यात एखादा पदार्थ (पुर्ण जेवण/ थाळीसुद्धा) जरी चांगली चव असली तरी त्या अन्नपुर्णेला धन्यवाद देत हात राखून खाल्ले तर पुढील परिणामांची शक्यता काही प्रमाणात का होईना टाळली जावू शकते येवढे जरी चर्चेत सहभागी होणार्‍यांच्या/ वाचकांच्या मनी काही प्रमाणात का होईना ठसले गेले तर ही चर्चा काही प्रमाणात का होईना यशस्वी झाली असे काही प्रमाणात का होईना वाटते.

चर्चेत सहभागी होणार्‍यांचे व वाचकांचे मनापासून आभार.