विनोद

Submitted by रविन्द्र खर्चे on 23 September, 2011 - 02:05

पेशंट : वा फारच छान वाटतंय आता , डॉक्टर तुमच पाहिलं शस्त्रक्रिया खूपच यशस्वी झाली
चित्रगुप्त : साहेब डॉक्टर खाली राहिले तुम्ही स्वर्गात आलात

गुलमोहर: 

शाळेत इन्स्पेक्टर साहेब आले. त्यांनी एका मुलाला प्रश्न विचारला,

"शिवधनुष्य कुणी मोडलं..?"
मुलगा घाबरून म्हणाला, "मी नाही मोडलं.."

साहेब चकित झाले..

त्यांनी गुरुजींना विचारले,
"असं काय म्हणतो हा मुलगा..?"

गुरुजी म्हणाले,
"परिस्थितीने गरीब आहे बिचारा, तो अशी काही तोडफोड करेल असं वाटत नाही."

साहेब तरातरा हेड मास्तरांकडे गेले आणि त्यांना म्हणाले,
"मी 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' असं विचारलं, तर तुमच्या शाळेतला मुलगा म्हणतो की 'मी नाही मोडलं' गुरुजी म्हणतात की 'मुलगा तसं काही करण्यातला वाटत नाही.' हा काय प्रकार आहे..?"

हेडमास्तरांना प्रचंड राग आला..

ते म्हणाले,
"कोण नाही म्हणतो..? छडी घेऊन गेलो ना की सगळे कबूल करतील 'मीच मोडलं' म्हणून..!"

प्रकरण गेले शिक्षणमंत्र्यापर्यंत..

शिक्षणमंत्री म्हणाले,
"हे पहा, आता मोडलंच आहे ना धनुष्य..? मग गप्प बसा. आधीच खूप गोष्टी अंगाशी आल्या आहेत, त्यात ही एक नको. येत्या बजेटला पैसे सँक्शन करतो, नवीन घ्या दोनतीन, आत्ता चर्चा नको..!"

साहेब हताश होऊन घरी आले..

बायकोला म्हणाले,

"मी एक प्रश्न विचारला, 'शिवधनुष्य कुणी मोडलं..?' तर कुणालाही माहिती नाही. तुला तरी आहे का माहिती..?"

बायको म्हणाली,
"हे बघा, सकाळपासून काम करून करून मी दमले आहे. त्यात तुम्ही आता येऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारत आहात. मला काय माहिती हे काय कुणी मोडलं ते..? तुमचं हे नेहमीचंच आहे, स्वत: मोडायचं आणि दुसऱ्यावर ढकलायचं...!"