काळजावर मोगर्‍याचे वार झाले

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 September, 2011 - 01:50

***************************************

आज डोळा आसवांचे भार झाले
वेदनांचे मोकळे कोठार झाले

दुश्मनांची राहिली ना जरब काही
ओळखीचे चोर येथे फार झाले

देवभोळा साव आता मी न उरलो
दैव माझे यारहो गद्दार झाले

भ्रष्ट का अंधारही होतो अताशा..?
चंद्र तारे कां निशेचे, 'जार' झाले?

आळ घ्यावा ज्यावरी, ना शस्त्र उरले
काळजावर मोगर्‍याचे वार झाले

वाचले जे झुंजले जगती 'विशाला'
पाठ दावुन धावले ते ठार झाले !

***************************************

(मंजुघोषा)

विशाल

गुलमोहर: 

कातील..!

जखमा किती सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा
>> या ओळींची याद आली.

वेदनांचे मोकळे कोठार झाले>>>सुरेख मिसरा

मक्ता खास,

बाकी पारंपारिक खयाल ..
कौतुक म्हणतो त्यात तथ्य आहे...

मलाही लिअहताना हा मोह टाळता येत नाही..शिकूयात हळूहळू..

शुभेच्छा!!!:)

गझलकारांनी अताशा वेदना, चंद्र आणि मोगरा या गोष्टींकडे कानाडोळा करावा. और भी है जमाने मे लफडे हजार सनम >>> सहमत आहे.

भटांच्या काव्याचा प्रभाव (मला तरी) जाणवला. 'तो असणारच की/ तो असण्यात काय गैर' हे खरे असले तरी व्यक्तीशः मला ते पटत नाही.

छान!