चिकन चिली (स्टार्टर) - chicken chili

Submitted by टोकूरिका on 23 September, 2011 - 00:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बॉयलर चिकन २५० ग्रॅम, मध्यम आकाराच्या सिमला मिरच्या ३, आलं-लसूण-मिरची-जिरे व कोथिंबीरची पेस्ट २ मोठे चमचे,यात मिरच्या थोड्या जास्त घ्याव्या., ८-१० मोठया लसूण पाकळ्या गोल काप करून, धणे-जिरे पावडर १ चमचा, गरम मसाला १ चमचा,हळद अर्धा चमचा, तेल २ चमचे , पाणी , मीठ चवीनुसार.
सजावटीसाठी ओलं खोबरं, चिरलेली कोथिंबीर व लिंबू.

क्रमवार पाककृती: 

चिकन स्वच्छ धुऊन घ्यावी. एका भांड्यात पाणी व थोडेसे मीठ घालून त्यात चिकन उकडून घ्यावी. त्यातील पाणी काढून टाकावे. सिमला मिरचीतील बिया काढून पातळ उभे काप करून घ्यावे.
दुसर्‍या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यावर चिरलेला लसूण, तयार वाटण व गरम मसाला, हळद्,धणे-जिरे पावडर, गरजेनुसार मीठ आणि मिरचीचे काप घालून परतावे. झाकण ठेऊन पाच मिनिटे मंद आचेवर ठेवावे. मिरची मऊ झाल्यावर त्यात उकडलेली चिकन घालून व्यवस्थित एकत्र करावे.पुन्हा पाच मिनिटे झाकण न ठेवता शिजू द्यावे.

प्लेटमध्ये काढून त्यावर ओलं खोबरं व कोथिंबीर भुरभुरावी. खाताना त्यावर लिंबू पिळला की अप्रतिम चव येते.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जण
अधिक टिपा: 

स्टार्टर नुसतेच खायचे असल्याने यात ग्रेव्ही नाहीये. ग्रेव्ही करायची असल्यास २ मोठे कांदे व १ मध्यम टोमॅटो ची प्युरी करून ती मिरचीसोबत शिजवून मग चिकन घालावे. तांदळाच्या भाकरीसोबत मस्त लागते.

How to make chicken chili recipe in marathi

माहितीचा स्रोत: 
अर्थात पप्पा..........:) माझी फेव्हरेट डीश असल्याने माहेरपणात एकदा तरी हमखास होते.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही चालते. शक्यतो दोन्हींचा समावेश असावा. ज्याच्यात्याच्या आवडीनुसार वाढता येते.

नेहा माझी ही आवडती डिश आहे. छान आवडली मला पाकृ. मला वाटत जी हॉटेलमध्ये मिळते ते चिकन कॉर्नफ्लॉवरमधुन तळून काढलेले असते. पण हे चांगले आहे डाएटच्या दृष्टीने.

जागू मलाही फार आवडते ही डिश. पण तू म्हटलस तस हॉटेलमध्ये ते कॉर्नफ्लोअर वापरतात. घरी बनवताना ते कटाक्षाने टाळता येते. चिकन थोडे क्रिस्पी हवे असेल तर फेट्लेल्या अंड्यामध्ये बुडवून मग तांदळाच्या पीठात घोळवून शॅलो फ्राय करून घेता येइल. लहान मुलांना पण फार आवडते ही डिश. माझा भाचा तर तूटूनच पड्तो दिसली की.:)

चिकनचे बोनलेस पीसेस घेतले तर उकडायची गरज नाही, थोडावेळ मॅरिनेट केले तर पटकन शिजतात.>>>अगदी.

चात्क्या नेक्श्ट टाईम नक्की टाकेन हा फोटू. आता हास बरं.......अन दे प्रतिसाद.