चिकन फ्रँकी

Submitted by अश्विनीमामी on 22 September, 2011 - 11:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन बोनलेस ब्रेस्ट एक चिकनचे, बारीक चिरलेला कांदा, मिरची, मीठ, चिकन मसाला, धने जिरे पावडर, केचप, कोथिंबीर. आले लसूण पेस्ट हे सारणा साठी.
दोन अंडी फेटून.

मैदा, तेल मीठ. पोळी साठी. तेल आवश्यकते नुसार.

क्रमवार पाककृती: 

कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरचीचे बारीक तुकडे परतावे. आले लसूण पेस्ट घालावी व चिकन मसाला एक चमचा घालावा. त्यावर बारीक चिरलेले चिकनचे तुकडे परतावे. चिकन चांगले परतले की त्यात थोडेसे पाणी व दोन चमचे केचप घालावे. झाकण ठेवून शिजू द्यावे. अंगाबरोबर असे सारण तयार करावे. लिक्विड बाजूला राहता कामा नवे.

मैद्यात तेल व मीठ घालून पोळीसाठी कणीक भिजवून घ्यावी. व तेल लावूनमळून घ्यावी. फ्रॅन्कीच्या पोळ्या मैद्याच्याच चांगल्या लागतात. पौष्टिक म्हणून गव्हाच्या कणकेच्या करू नयेत. चव बिघडेल.

जित्क्या फ्रँकी करायच्या तितक्या पातळ पोळ्या आधी करून घ्याव्या. व हलके शेकून घ्याव्या. होल व्हीट तोर्तिया प्रमाणे.

आता दोन अंडी एका पसरट भांड्यात फेटून घ्यावीत.
हे सर्व आधी करून ठेवता येते किंवा सारण बनवून घरच्या पोळ्यावाल्या बाईस सांग्ता येते कि आयत्या वेळी फ्रँकी बनवून दे म्हणून. सारण व मैदा अंडी फ्रिज मध्ये नीट राहते सकाळी करून ठेवता येते.
दुपारला मुलांना शाळेतून आल्यावर बनवून देता येते.

सो आता, पोळ्यांचा जाड तवा गरम करावा. त्यावर तेल एक चमचा घालावे. मैद्याची एक पोळी
अंड्यात बुडवून तव्यावर ठेवावी. ते अंडे जरा शिजेल. मग चपळाईने उलथन्याने पोळी उलटावी व गरज वाटल्यास अजून अंडे वरून सोडावे. हे थोडे मेसी होउ शकते पण सवईने जमेल. गॅस कमी जास्त करावा कारण अंडे जळल्यास वाइट वास लागतो. खरपूस भाजले पाहिजे. आता वरच्या साइडला
आपले चिकनचे सारण उभे पसरावे. व कच्चा कांदा आवड्त असल्यास आणि कोथिंबीर पसरावी. मग उलथन्याने पोळी त्यावर लपेटावी व रोल बनविता आल्यास उत्तमच. रोल बनवावा.
प्लेट मध्ये घ्यावा. बरोबर खरे तर काही लागत नाही पण हिरवी पुदिन्याची चटणी मस्त लागेल.

एक किंवा दीड फ्रँकीत १३ - १४ वरशाची मुले आउट होतात. अगदीच जबरी एकावेळी दोन खाऊ
शकतात. मोठी मुले, टीन्स घरी आपण हून बनवून खाऊ शकतात. मग कॉलनीत फूटबॉल खेळायला मोकळी. व्हेज फ्रॅन्की बनत नाही.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात तीन बनतील. मी एकावेळी दोन बनविते.
अधिक टिपा: 

खिमा कटलेट चे साहित्य घेउन लांब्डे रोल बनविले तर ते ही मैद्याच्या पोळीत लपेट्ता येतील.
सर्व करताना बरोबर किसलेले गाजर, कोबी दिल्यास सलाड मुळे जरा शोभा येइल. बारक्या पोरांना
टिश्यू पेपर मध्ये अर्धा भाग गुंडाळून द्यावे म्हणजे हात तेलकट होणार नाहीत.

माहितीचा स्रोत: 
टिब्स फ्रँकी.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages