आमचा साखर चौथीचा गणपती

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 September, 2011 - 14:54

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात मी साखरचौथी बद्दल खालील धाग्यावर माहीती दिली होती.
http://www.maayboli.com/node/28517

दिनांक १६ व १७ सप्टेंबर रोजी आमच्या घरी साखर चौथीचे गणपती बाप्पा आले त्याची काही छायाचित्रे.

१)१५ तारखेला रात्री आमच्या घरात बाप्पांचे आगमन झाले.

२) त्याच रात्री २ वाजता हे तोरण तयार करुन घराला बांधले.

३) दुसर्‍या दिवशी सकाळी ओटीवर माझी फुलांची रांगोळी मंगलमय वातावरणात सजली.

४)

५)

६) बाप्पांची प्रतिष्ठापना झाली.

७) असे सजले आमचे बाप्पा.

८) संध्याकाळी मायबोलीकरांनी मागणी केलेल्या फोटोसाठी खास साखरचौथीचे ताट भरायची सुरुवात केली.
आमच्या कडे जेवण करण्या करीता ठेवलेल्या सुगरण बायकांनी हे दिवे केले.

९) माझ्या आईने अश्या प्रकारे मला ताट भरून दिले. ताटात मध्य भागी दिवे, बाजुला मोदक, जिबूडच्या, काकडीच्या पाच फोडी, त्यावर नागदौणा (कळलावी) ची फुले, नारळ, एक फळ, पाच केळी त्या केळींच्या वर नारळाच्या पातीतील काडीचे तुकडे करुन त्यात पाच फुले ओऊन ती केळींमध्ये खोचली आहे. पानाचा विडा

१०)

११)

१२)

१३) दिवे लागल्यावर ही आरती तेजोमय झाली व सगळ्या पाहुण्यांची ह्याचे फोटो काढायची रिघ लागली.

१४)

१५)

१६) अंगणात ररांगोळी काढून हे ताट चंद्राच्या पुजेसाठी पाटावर ठेवले व चंद्राला हळद कुंकु वाहुन ह्या ताटाने ५ जणींनी चंद्राची आरती ओवाळली.

१७) त्या आधी गणपती बाप्पाची आरती झाली.

१८)

१९) दुसर्‍या दिवशी बाप्पा विसर्जनासाठी तलावावर केलेली आरती.

२०) बाप्पा विसर्जनाला निघाले.

२१) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पुढचे छोटे बाप्पा आमचे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागू, मस्त प्रचि. बाप्पा, सजावट, आरतीचं सुरेख सजवलेलं ताट सगळंच मस्त दिसतंय. तुझ्यामुळे साखरचौथीच्या गणपतीबद्दल माझ्यासकट बर्‍याच जणांना माहिती झाली. धन्यवाद.

मस्त

_/\_

सविस्तर माहिती अन सुंदर फोटो. आरतीचे ताट खूप छान दिसतेय.
नेहमीचा गणेशोत्सव आणि साखरचौथीचा गणेशोत्सव तितक्याच थाटामाटात साजरा करता त्याबद्दल तुमच्या सगळ्या कुटुंबाचे कौतुक वाटते आपला संस्कृतीक वारसा पुढे चालवण्यात तुमच्या कुटुंबाचा खुप मोठा वाटा आहे >>> अनुमोदन. स्मित सगळेच सणवार, उन्हाळी, हिवाळी कामे जागूबाई करत असतात अस दिसतं. शिवाय उत्तमोत्तम खाद्यपदार्थ, निसर्गात रममाण होणे, इ.इ. कसा वेळ काढतेस ग? खूपच कौतुक आहे जागुले तुझं.

अगदी!

दाराला तोरण, फुलांची रांगोळी, अप्रतिम सजलेले आरतीचे ताट, फुले, उदबत्या यांच्या सुगंधीत वातावरणात बसलेली सुंदर बाप्पाची मुर्ती बघुन मन अगदी प्रसन्न झाले. प्रथमच असे आरतीचे ताट पाहीले. केळ्यामधे अशी फुले खोचुन केलेली रचना तर अप्रतिम!

Pages