मायबोलीची १५ वर्षे

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
1’

मायबोलीने या गणेशचतुर्थीला १५ वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे आज). गेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.

गेल्या वर्षी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला होता तो म्हणजे नवीन निघणार्‍या मराठी वेबसाईट. दुर्देवाची गोष्ट म्हणजे आज एका वर्षांनंतर त्यातला अनेक आज चालू नाहीत किंवा चालू असल्या तरी त्यावर काही होताना दिसत नाही. आणखी मराठी वेबसाईट निघाल्या तर मराठी संस्कृतीच्या वाढीसाठी ते चांगलेच आहे. ज्या नवीन वेबसाईट तयार करण्याचा प्रयत्न झाला (होतो आहे) त्या सगळ्या मराठी साहित्य, कविता, ललित लेख या एकाच वर्तुळात रहाणार्‍या आहेत हे ही मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी फारसे उत्साहाचे नाही. मायबोलीची सुरुवातही अशीच मराठी साहित्य, कविता यांसारख्या विषयांपासून सुरु झाली असली (आणि भविष्यातही तो एक महत्वाचा भाग राहणार आहे) तरी फक्त याच विषयांमधे ती अडकून पडू नये यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करतो आहोत. मायबोली व्यतिरिक्त ही अनेक जागा आज आंतरजालावर मराठी वाचकाला उपलब्ध आहेत याची आम्हाला जाणिव आहे. आणि तरीही तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

मायबोली हा एक किंवा दोन खांबी तंबू नसावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. या महिन्यापासून मायबोलीच्या मुख्य टीम मधे दीपक ठाकरे (साजिरा) सामील झाले आहेत. त्यांचे अभिनंदन. ते मायबोली (इंडीया) चे अधिकृत डायरेक्टर झाले आहेत. येत्या काही वर्षात मायबोलीचा पसारा, खर्च वाढतो आहे त्याचबरोबर मायबोलीच्या अस्तित्वासाठी नवीन उत्पन्न मिळवणेही तितकेच आवश्यक झाले आहे. त्यासाठी जाहिरात व्यवसायात असलेल्या व्यक्तीची गरज होती. दीपक ठाकरे याबाबतीत मायबोलीला पुढे नेण्यात नक्कीच मदत करतील असा आमचा विश्वास आहे.

मायबोली.कॉम

मायबोलीकरांना एखाद्या कार्यक्रमासाठी एकत्रीत येणे सोयीचे व्हावे यासाठी "कार्यक्रम" ही नवीन सुविधा
(आणि त्या अनुषंगाने नावनोंदणी, ईमेल आठवण) या वर्षी सुरु झाली.

एकमेकांना उपयुक्त माहिती देणे घेणे हा मायबोलीवरच्या अनुभवाचा एक महत्वाचा भाग. यासाठी "प्रश्न आणि सर्वोत्तम उत्तर" ही सुविधाही या वर्षी सुरु झाली.

गणेशोत्सव २०१०:
(आऊटडोअर्स) -मेघना पाध्ये-गोखले यांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २०१० चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला. योग यांनी या वर्षी श्रवणीय कार्यक्रमांत त्यांची गाणी दिल्याबद्दल त्यांचे आभार.

दिवाळी अंक २०१०:
ललिता-प्रीति (प्रिति छत्रे) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०१० चा अंक प्रकाशित केला. महाराष्ट्रात शंभराहून अधिक वर्षे अव्याहतपणे चालत आलेली दिवाळी अंकांची परंपरा सर्वप्रथम मायबोलीच्या माध्यमातून अकरा वर्षांपूर्वी आंतरजालावर आली. अधिकाधिक लेखकांना सहभागी होता यावे, म्हणून एकीऐवजी सर्वसमावेशक अशा चार संकल्पना ठरवण्यात आल्या. संपादकमंडळातर्फे छोटीशी दिवाळीभेट म्हणून 'ग्रंथस्नेह' हा उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह वाचकांना उपलब्ध केला होता. तसेच हितगुज दिवाळी अंक - २०१० पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला.

मदत समिती आणि स्वागत समिती:
सतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.

मराठी उद्योजक:
मराठी उद्योजक ग्रूपचे पहिले GTG आक्टोबर २०१० मधे पुण्यात झाले. आतापर्यंत ग्रूपचे १०२ सभासद झाले आहेत. "उद्योजक तुमच्या भेटीला" या उपक्रमाअंतर्गत या वर्षी ५ मराठी उद्योजकांशी मायबोलीकरांना संवाद साधता आला.

संयुक्ता:
वैशाली राजे (लालू) यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या "संयुक्ता" चं हे दुसरं वर्ष. यावर्षी त्यांनी स्वतःहून संयुक्ताची जबाबदारी नवीन टीमला देऊन एक खूप अनुकरणीय पायंडा पाडून दिला. त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल मायबोली त्यांची ऋणी आहे.

मराठी भाषा दिवस:
या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला आहे. ह्या उपक्रमाची जबाबदारी घेतल्याबद्दल संयुक्ता प्रशासनाचे आभार.

अक्षरवार्ता:
चिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.

विश्वकप विशेषांकः
या वर्षी भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. तो विजय साजरा करण्यासाठी बी यांच्या नेतृत्वाखाली मायबोलीवर पहिल्यांदाच दिवाळी व्यतिरिक्त एक विशेषांक काढण्यात आला. हा पुढाकार घेतल्याबद्दल बी यांचे आभार.

वर्षाविहार २०११:
या वर्षी वर्षाविहार मेळाव्याला गेल्यावर्षीपेक्षा कमी उपस्थिती होती. पण जमलेल्या मायबोलीकरांनी नेमक्या आलेल्या पावसामुळे वर्षा विहाराचा भरपूर आनंद लुटला.

टीशर्ट २०११:
या वर्षी टीशर्ट समितीने तयार केलेले टिशर्ट मायबोलीकरांना खूप आवडले. यावर्षी काही अडचणींमुळे काही मायबोलीकरांपर्यंत टीशर्ट्/टोपी पोचण्यास उशीर झाला. संयोजक ते सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पल्ली (पल्लवी देशपांडे) आणि प्राजक्ता थरथरे (पारीजातक) यांनी टिशर्टसाठी सुलेखन तयार करून दिल्याबद्दल त्यांचे आभार.

रसग्रहण स्पर्धा ऑगस्ट २०११:
नवनवीन पुस्तकं वाचली जावीत, त्यांवर चर्चा व्हावी, हे वाचनचळवळीच्या दृष्टीनं अत्यावश्यक असतं. लेखक, वाचक आणि प्रकाशक यांच्यातलं नातंही अशा देवाणघेवाणीतून दृढ होतं. मायबोली.कॉम हे संकेतस्थळ वाचनचळवळ जोमदार व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेचा हा उपक्रमही या प्रयत्नांचांच एक भाग आहे. या उपक्रमात संकल्पनेपासून ते निकालापर्यंत भरीव मदत केल्याबद्दल चिनूक्स (चिन्मय दामले) यांचे आभार. दै. कृषिवल यांनी या प्रस्तावाला ताबडतोब संमती देऊन विजेत्यांना बक्षिसे प्रायोजित केल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून आलेल्या सर्व प्रवेशिका तपासून विजेते निवडण्यात मदत केल्याबद्दल मेनका प्रकाशनाच्या संपादिका श्रीमती सुजाताताई देशमुख आणि दै. कृषिवलचे संपादक संजय आवटे यांचे मनःपूर्वक आभार.

तन्वीर सन्मान सोहळा
दरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.या सोहळ्यांतील भाषणं, मुलाखती हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा आहे. भारतीय आणि जागतिक रंगभूमीवरही आपलं नाव अजरामर करणार्‍या थोर रंगकर्मींनी केलेली भाषणं, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या समकालीनांनी, शिष्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार येणार्‍या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंकाच नाही. हे विचारधन सर्वांपर्यंत पोहोचावं, तरुणांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून तन्वीर सन्मान सोहळ्यांतली भाषणं, मुलाखती मायबोलीवर ऐकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमात पुढाकार घेतल्याबद्दल चिनूक्स (चिन्मय दामले) यांचे आभार. तसेच या ध्वनीचित्रफिती उपलब्ध लरून दिल्याबद्दल श्रीमती दीपा श्रीराम अणि रूपवेध प्रतिष्ठान यांचे मनःपूर्वक आभार.

जीटीजी (GTG):
वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी मायबोलीकरांची संमेलने होत असतात. मुंबई-पुण्याबरोबरच बंगळूरू, न्यूजर्सी, अटलांटा, बे एरीया इथेही सातत्याने संमेलने होऊ लागली आहेत. गेल्या वर्षी झालेल्या वासंतीक कल्लोळाचा पायंडा चालू ठेवण्यासाठी अंजली भस्मे (अंजली) यांनी स्वत:च्या घरी ते आयोजीत केले याबद्दल त्यांचे आभार.

मायबोली पत्रकः
काही कारणामुळे काही दिवस (कधी कधी काही महिने) मायबोलीला भेट देणं जमत नाही. तेंव्हा तुमच्या सोयीसाठी अधून मधून या पत्रकातून ईमेल द्वारा मायबोलीला तुमच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या मायबोलीकरांच्या दृष्टीने नवीन काय विशेष आहे हे देखील तुम्हाला या सुविधेमधून कळेल.

खरेदी विभाग

नुकतेच खरेदी विभागाचे नूतणीकरण पूर्ण झाले. आकर्षक दृष्य विभाग आणि इतरही अनेक नवीन सुविधा त्यात समाविष्ट केल्या आहेत.

थेट फेसबुकावरून मराठी पुस्तके खरेदी करायची सोयही यावर्षी आपण या विभागातर्फे चालू केली.

नवीन प्रकाशक/भागीदार (partners/providers)
या वर्षात पद्मगंधा प्रकाशन, परममित्र प्रकाशन, रोहन प्रकाशन, भारतीय संस्कृतीकोष मंडळ, थाट बाट, संजीव चौबळ या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण २८ झाले आहेत.

खरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.


जाहिराती विभाग

जाहिराती विभाग यावर्षी पूर्णपणे नव्याने चालू केला आणि पहिल्यापेक्षा त्याला मायबोलीकरांचा प्रतिसादही जास्त मिळतो आहे.

जाहिराती विभागाबाहेरही ,मायबोलीला जाहिरातदार मिळवण्याचे यशस्वी प्रयत्न दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात आले. त्यामुळेच अनेक वेळेस मायबोलीवर मराठी भाषेत जाहिराती दिसायला लागल्या.

कानोकानी.कॉम
या विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.


इतर प्रशासकीय आणि कार्यालयीन कामे

या शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.

मायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.

-----------------------------------------------------------------------------
विविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः

मदत समिती: रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी

मराठी उद्योजकः
मिलिंद माईणकर (भ्रमर), दीपक कुलकर्णी (डुआय),मयूरेश कंटक (मयूरेश),गोविंद सोवळे (जीएस), अल्पना खंदारे (अल्पना),अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी),नवीन केळकर (शुभंकरोति), अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई), रूपाली महाजन(रूनी पॉटर),अजय गल्लेवाले (अजय), भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के), समीर सरवटे (समीर), वैशाली कालेकर (आशि), भारत करडक (चंपक), कामिनी फडणिस केंभावी (श्यामली),अदिती हिरणवार (punawa),निलेश डोंगरे (चंबू), निनाद कट्यारे (निनाद)

गणेशोत्सव २०१० - आऊटडोअर्स -(मेघना पाध्ये-गोखले) , अंजली, ज्ञाती, पूर्वा, मन-कवडा, मिनी (भावना पवार), मिनोती (मिनोती कुंदरगी)

दिवाळी अंक २०१०
ललिता-प्रीति (प्रिति छत्रे), रैना, श्रद्धा (श्रद्धा द्रवीड), anudon (विद्युल्लता महाबळ), हिम्सकूल (हिमांशू कुलकर्णी), पराग (पराग सहस्रबुद्धे), मधुरिमा (मधुरीमा डाबली), स्वरुप (स्वरूप कुलकर्णी), शर्मिला फडके, जाईजुई

अक्षरवार्ता
अश्विनी के, अनीशा, साजिरा, श्रद्धा, नंद्या, पौर्णिमा, ऋयाम, मंदार_जोशी, चिंगी, मंजूडी, चिनूक्स

संयुक्ता व्यवस्थापनः
मार्च २०११ पर्यंतः लालू, शैलजा, स्वाती_दांडेकर, स्वाती_आंबोळे,रूनी पॉटर,anudon,अदिती,मैत्रेयी,रैना,सीमा
एप्रिल २०११ पासूनः अंजली, अरुंधती कुलकर्णी, anudon, मंजूडी, नीधप, शैलजा, स्वाती२, रैना.

संयुक्ता संपर्क सदस्यः
नंदिनी ,शर्मिला फडके ,लाजो ,आऊटडोअर्स ,,मीपुणेकर, सशल ,लालू ,संपदा

मराठी दिवस २०११
मंजिरी, प्राजक्ता_शिरीन, सशल, सावली, सुनिधी, सायो.

महिला दिन २०११
साया, सुनिधी, संयुक्ता व्यवस्थापन.

विश्वकप विशेषांकः
दोस्ती, मास्तुरे, लालू , प्रज्ञा९,वैद्यबुवा, बी

वर्षाविहार २०११
मल्लीनाथ (MallinathK) ,राम चिंचलीकर(राम) , आनंद चव्हाण (anandmaitri),आनंद केळकर (anandsuju), संदिप खांबेटे(घारुआण्णा) , मी_आर्या, ह.बा., आयडू, ठमादेवी, कविता नवरे, सुरश.

टीशर्ट २०११
आनंद चव्हाण (आनंदमैत्री), मल्लीनाथ (MallinathK) ,राम चिंचलीकर(राम), प्राजक्ता थरथरे (पारीजातक)आणि पल्लवी देशपांडे(पल्ली)

कानोकानी
अश्विनीमामी, आऊटडोअर्स, चंपक, डॅफोडिल्स, मन-कवडा, महागुरु, विनायक, सायो

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Happy
साजिरा, अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

मायबोलीला 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'. अशीच उत्तरोत्तर भरभराट होत जावो.
साजिर्‍यालाही शुभेच्छा.

अभिनंदन मायबोली.
सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! Happy
साजिरा, अभिनंदन!

मायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

साजिर्‍याचे अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

मायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे हार्दिक अभिनंदन ...
उत्तरोत्तर भरभराट होत जावो... पुढील वाटचालीकरीता अनेक शुभेच्छा! Happy

मायबोलीस वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो.. सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

साजिर्‍याचे अभिनंदन आणि शुभेच्छा! Happy

हॅप्पी बर्थडे मायबोली !
मायबोली , प्रशासक , अ‍ॅडमीनटीम , स्वयंसेवक व सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

अभिनंदन मायबोली. सर्व स्वयंसेवकांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ! Happy

नवीन उत्पन्न मिळवणे महत्त्वाचे झाले असेल तर जसे खाजगी रंगीबेरंगी 'पान' आहे तसे 'ग्रूप' विकत देण्याचा विचार करणार का? वर्षाची वर्गणी घेऊन? Happy

मायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा! आढावा आवडला. Happy
साजिरा, शुभेच्छा. पुढे कधीतरी मायबोलीवरील जाहिरातींचे किस्से तू लिहिशील अशी आशा बाळगतो. Proud

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

इतकी वर्षे झाली तरी मायबोलीवरचा जिव्हाळा कायम राहिलाय. आजही इथला ताजेपणा अबधित आहे.

मायबोलीचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन आणि स्वयंसेवकांचे आभार!
साजिर्‍याचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

आढावा छान घेतला आहे.
मायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
साजिरा, अभिनंदन.

मायबोलीचे आणि सर्व स्वयंसेवकांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
साजिर्‍या - अभिनंदन.

Pages