निरोप

Submitted by vedangandhaa on 14 September, 2011 - 13:05

नको करूस ग आई
प्रश्नांची बरसात
पाठी तुझीच पुण्याई
ईथे आहे मी सुखात.

जन्म लेकीचा चंदन
शिकवीले तूच मला
तुझी आठवण देई
बळ कळ सोसण्याला.

पोटातल्या उकळीला
आत जाऊ दे आटून
झाकळ काढू नको
हात जाईल जळून.

तुझी मायेची सावली
क्षणभर विसऊ दे
नवी उमेद उद्याची
तुझ्या कुशीत बांधू दे.

पाय जड होई माझा
ओथंबता तुझ मन
आण तूला या लेकीची
नको भरूस नयन.

पाय निघता निघेना
तुझा निरोप घेताना
जीव कासावीस होतो
बांध घाल आसवाना.

उरी दाटल मळभ
आनू नकोस नयनी
लाख मोलाची शिकवण
लावीन मी कारणी..

थेंब थेंब आटऊन
तू ग वाढवील रोप
अस हासत मुखाने
तू ग मला दे निरोप............

विनिता ल. पाटिल

गुलमोहर: