मुलांसाठी उपयुक्त अ‍ॅप्स

Submitted by मेधा on 14 September, 2011 - 09:44

आयपॅडच्या अ‍ॅपस्टोअरमधे शैक्षणिक या प्रकाराखाली हजारो अ‍ॅप्स दिसतात व त्यात रोज भर पडत असते. ज्यांनी अशा प्रकारची अ‍ॅप्स वापरली आहेत, त्यांनी आपापले अनुभव इथे लिहिले, रेकमेंडेशन लिहिले तर इतरांना त्या माहितीचा उपयोग होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दोन वर्षाच्या मुलाला फ़्लाश कार्ड्सची आप फ़ार आवडते. त्यातुन त्याला बरेच नवीन शब्द आणि वस्तु कळतात.

symbols, MathEdge, spell lite, Multiplication हे सध्या आवडते आहेत.
आणि टिपी साठी Magic board, Coloring 3D
शिवाय iBooks मधे मुलांसाठीही भरपूर पुस्तकं PDF मधे आहेत.

मराठी शिकण्यासाठी www.aimkara.com यांचे marathi lesson (level I , II)
चित्रकलेची आवड असणार्‍यांसाठी How To Draw
easyTime यांचे 'Origami' I to V अ‍ॅप्स पण लहानांसोबत थोरांनाही वेड लावतील अशी आहेत.

लहान मुलांसठी काही शैक्षणिक अ‍ॅप्सः
- Brain Tuner
- ArthmeTick
- GeoQuiz
- State Capitals ( या सारखी अजुन काही: The States, USAQuiz, Presiआहेत,)
(अजुन बरीच आहेत, आठवतील तशी लिहिन)

मुले मोठी असतील तर अल्जेब्रा वगैरे किचकट विषयांसाठी : खान अकॅडमीचे अ‍ॅप्स चांगले आहेत. (हे व्हिडीओज् रोकु वर पण आहेत)
त्याचबरोबर BARRON's PAINLESS मालिकेमधील अ‍ॅप्स पण चांगली आहेत.
Pearson चे Science हे पण हसत खेळत विज्ञासाठी चांगली आहेत

अजुन मोठ्यांकरीता SAT Genius आणि PSAT Genius

चेस करता बरीच फ्री वर्गवारीतील अ‍ॅप्स वापरुन बघितले. कोणतेच आवडले नाही.
अजुन एक आवडलेले म्हणजे : Learn To Sign (american sign language साठी)

(वरील सर्व अ‍ॅप्स हे आयफोन साठी डाउनलोड केलेली आहेत्/होती. अ‍ॅपलच्या इतर प्रॉडक्ट्स करता पण उपलब्ध असावीत. तसेच वरील बहुतांश अ‍ॅप्स हे फ्री / चकटफु आहेत)

ह्या विषयाशी संबंधित एक गोष्टा तुम्हा सर्वान बरोबर share करावीशी वाटतीये. माझी "Learn Marathi For Kids" App Android market मध्ये "विनामूल्य" उपलब्ध आहे.
This app is to help people of Indian origin to teach their children our mother tongue 'Marathi' through a very interactive and fun way.We have sincerely tried to make an app which will really help our children to learn Marathi with more interest.

here is the link
https://market.android.com/details?id=com.pmpandroid.learnmarathikidsv2

It would be really great if you could try it out and also share with your friends Happy

धन्यवाद,
पूनम पंडित

माझ्या ४ आणि २ वर्षांच्या भाचे कंपनीला आपण बोलू त्यावर वेडावून दाखवत तेच परत बोलून दाखवणारे अ‍ॅप फार आवडते. (फार शैक्षणिक नाही, तरी लिहिले आपले. :-))