मला स्फूर्तीदायक वाटलेले असे काही

Submitted by अजय on 13 September, 2011 - 22:09

आपल्यापैकी ज्यांनी स्वप्नांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष काहितरी करायचा प्रयत्न केला आहे, त्यांना हा अनुभव नक्कीच आला असेल. आपली स्वप्न , आपल्या योजना पुढे जात नसतात, एकटं वाटतं, अपयश आलेलं असतं किंवा उंबरठ्यावर दिसत असतं. अशा वेळा एखादा स्फूर्तीदायक प्रसंग, वाक्य, गोष्ट आपल्याला नवीन शक्ती देऊन जाते.
नुकताच ब्रायन वाँग या मुलाचा हा विडियो पाहीला. हा मुलगा अजून २० वर्षांचाही नाही पण एका कंपनीचा मुख्य अधिकारी (CEO) आहे त्याच्याच कंपनीतल्या कीचनमधल्या बीयरच्या बाटल्यांना त्याला हात लावायला परवानगी नाही. पण या व्हीडीयोत त्याची जी वैयक्तिक उर्जा आहे ती थक्क करून टाकणारी आहे.

ब्रायन वॉंगः मी शिकलेल्या सहा गोष्टी:

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1) You are the most powerfull force in your life.
2) Stand up for yourself.
3) Think Big.
4) Use your youth.
5) Build relationships. Don't acquire.
6) If the fight's is hard, then it's worth even more to fight it.
>>>
क्या बात है! Happy

अजय म्हणतो तसे, खरेच अफाट एनर्जी आणि बॉडी लँग्वेज आहे त्या पोराची.

या अशा ऊर्जेवाली ही माणसं थकत नाहीत, एक्झॉस्ट होत नाहीत, तर चक्रवाढव्याजामुळे मुद्दल सारखे वाढत राहावे, त्याप्रमाणे त्यांच्यातली ऊर्जा सतत वाढत राहते. कारण या ऊर्जेमुळे समोरची माणसं सतत प्रभावित झालेली ती बघत असतात. सिनर्जी!