१ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
काल दिनांक १०/९/२०११ रोजी जाहीर झालेल्या निकालात माझ्या खालील कवितेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
कधीतरी लहर लागली म्हणून चार ओळी खरडणा-या, साहित्याचा आणि व्यवसायाचा दुरान्वयेही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या एका साध्या माणसाला या निकालाने एक नविन आत्मविश्वास दिला आहे, त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल मी मीमराठी.नेटचे संचालक श्री. राज जैन, माझा उत्साह वाढवणारे मायबाप वाचक आणि परिक्षक श्री. प्रदीपजी निफाडकर यांचा मनापासून आभारी आहे.
खूप झालं!
मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं!
तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं!
काचेचं शमादान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं!
नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला? खूप झालं!
मला नाही जमणार तुला न्यायला लॉंग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं!
तुला नाही समजली माझी कविता? चालेल!
हिशोब समजतोय ना? खूप झालं!
नसू आपण रोमिओ-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण? खूप झालं!
-आदित्य चंद्रशेखर
-पूर्वप्रकाशित: http://mimarathi.net/node/6228
मस्त !!! आणि अभिनंदन !!!
मस्त !!!
आणि अभिनंदन !!!
कधीतरी लहर लागली म्हणून चार
कधीतरी लहर लागली म्हणून चार ओळी खरडत असाल तुम्ही, पण जे काही खरडता ते सामान्य माणसाच्या मनाला स्पर्शून जाते.
वास्तवाशी जवळीक साधणारी कविता आहे ही.
अभिनंदन.
धन्यवाद सांजसंध्या!
धन्यवाद सांजसंध्या!
धन्यवाद मुटे सर!
धन्यवाद मुटे सर!
चंद्रता-यांच्या कितीही गोष्टी केल्या तरी वास्तव हे असंच असतं हे मला हा कवितेतून सांगायचं होतं.
छान.
छान.
अरे वा , प्रथम आणी द्वितीय ,
अरे वा , प्रथम आणी द्वितीय , दोघेही माबोकर.
हार्दीक अभीनंदन.
कविता पण बेष्ट.
वा वा! मस्तच... आणि हार्दीक
वा वा! मस्तच...
आणि हार्दीक अभिनंदन !!!
अभिनंदन !
अभिनंदन !
विप्रा विनार्च , महागुरु
विप्रा विनार्च , महागुरु ,मन:पूर्वक धन्यवाद !
सुंदर कविता, हार्दिक अभिनंदन.
सुंदर कविता, हार्दिक अभिनंदन.
पुर्वी वाचली होती. बहुदा
पुर्वी वाचली होती. बहुदा माबोवर
कविता सुंदरच.. अभिनंदन
सुंदर कविता .अभिनंदन.
सुंदर कविता .अभिनंदन.
पुर्वी वाचली होती, द्वीतीय
पुर्वी वाचली होती,
द्वीतीय क्रमांका साठी अभिनंदन !!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! ही कविता मी बरीच आधी माबोवर टाकली होती.
अभिनंदन आदित्यजी
अभिनंदन आदित्यजी