शाळा सुटली, पेपर ....

Submitted by छोटी on 9 September, 2011 - 04:02

आज काल वर्तमानपत्र उघडलं ना कि पेपर फुटीच्या बातम्या येत असतात ना.... कि बस्स.कालच अशी एक बातमी वाचली आणि मन काहीस माझ्या माहेरी नासिक ला CIDCO मध्ये गेलं.कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आठवलं(माझ शिक्षण तिथे झालं आहे ना...). १० वी ला असताना जेव्हा आमचा अभ्यासक्रम पुर्ण शिकवून झाला(अस मला आमच्या शिक्षकांनी सांगितल्यावरच कळाल होत.) त्यानंतर आमचे सरावाचे पेपर असायचे आणि ते पण रोज, अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही(आयुष्यात तो मला कधीच मिळाला नाही... वेळ हो) आणि लगेच दुसर्या दिवशी पेपर असायचा.
मन कंटाळून गेलं होत.अभ्यास करायला उत्साह राहिला नव्हता.
आमचे SCHOLAR मित्र-मैत्रिणी मात्र एकदम धूम धडाक्यात पेपर लिहायचे , कधी एवढा अभ्यास करायचे कळायचं नाही.माझा एक मित्र माझ्यासारखाच पण त्याला पेपर नेहमी खूप सोप्पे जायचे.खूप खुश असायचा तो पेपर झाल्यानंतर..
एक दिवस तो मित्र आला होता.घरी असेच बोलत होतो, आम्ही त्यात तो बोलला मला, कि त्याच्याकडे उद्याचा पेपर आहे मला वाटलं गंमत करतो ,
आणि त्याने खिश्यातून एक चुरगळलेला कागद काढला, माझ्या हातात दिला मला एकदम धक्का बसला.तो बोलला कि एवढा अभ्यास केला तरी चालतो.हाच पेपर असतो. मी त्याला विचारलं तुझ्याकडे कुठून आला पेपर?
"अग आपले भोळे सर आहेत ना, त्याच्या मुलाची प्रिंटींग प्रेस आहे तिथेच पेपर छापतात. आपल्या शाळेतला शिपाई आहे ना सुरेश, तोच आणतो पेपर. प्रिंटींग करताना चुकलेले पेपर तिथेच टाकतात. तो हे पेपर आपल्या एका दोस्त ला देतो.. आणि दोस्त हे पेपर आम्हाला देतो. तो पण असाच पास होतो. "
मला तेव्हा कळल कि हा एवढा खुश का असतो पेपर झाला कि...आणि तो कागद(so called tomo pepar) माझ्याकडे सोडून गेला माझा विश्वास नव्हता त्या कागदावर पण अभ्यास करताना मी त्या प्रश्न वर जास्त लक्ष नाही दिलं पण मी त्या प्रश्नांचा अभ्यास मात्र केला.दुसर्या दिवशी पेपरला गेली तेव्हा माझा माझ्या डोळ्यावर विश्वास नव्हता बसतं कि कालचा चुरगळलेला कागद आज माझ्याकडे पेपर म्हणून होता.मस्त एकदम सगळ्या प्रश्नाची उत्तर लिहिली एकदम भारी वाटल पेपर सोप्पा गेला सही ना भो... आनंदात बाहेर आलो तर आमचे वर्गातले हुशार मुल बाहेर खूप चिंतेमध्ये होते आजचा पेपर किती अवघड होता म्हणून... हो का... मी तर खुशीत बागडत बागडत घरी आली. येत येत त्या मित्राने परत एक कागद मला दिला उद्याचा पेपर विज्ञानाचा. मस्त पैकी तेवढाच अभ्यास केला तेव्हा मला कळल कि बर्फाळ प्रदेशात जलचर प्राणी कसे जिवंत राहतात?पृथकरण म्हणजे काय ?रासायनिक प्रक्रिया म्हणजे काय? सही मज्जा आली अभ्यास करायला.
भारी एकदम असाच दुसर्या दिवसाचा पण पेपर पण मस्त होता.
त्या संध्याकाळी मित्राला मी भटकताना बघितलं मी त्याला विचारला, "अरे, भटकतो का आहे अभ्यास नाही आहे का? "
"अग, पेपर मिळेल ना. "
"अरे पण तो पर्यंत वाचायला तरी सुरुवात करूया ना...शेवटच्या परीक्षेला ला आपल्या मदत होईल "
मित्र : "हे, वेडी झाली का? अग, मस्त पैकी कॉपी करायची पेपर मध्ये,सगळे प्रश्न उत्तर एका कागद वर लिहून घ्यायचे."
मी : "काहीतरिच काय?"
मित्र : " अग मग कशाला अभ्यास करून वेळ कशाला वाया घालायचं.. जाऊ दे, तू ज घरी मी आणून देतो तुला पेपर."
मी : "पण हे चुकीच आहे शेवटी आपल्याला अभ्यास हा करावाच लागेल ना लास्ट EXAM चा पेपर थोडीच मिळणार आपल्याला?"
मित्र : "मग तू काय आता बरोबर नाही करत आहेस दोन दिवसापासून. जा घरी जा अभ्यास कर..पेपर आला कि देईन आणून."
मी मग विचार करत घरी निघाली.तेवढ्यात मागून त्याचा आवाज आला मित्राचा हा घे पेपर मी काही बोलण्याच्या आधी गाडी वरून बूम.... आता तो निघून पण गेला.मी तो कागद तसाच घेऊन घरात आली आणि तो कागद एका ठिकाणी भिरकावून मी माझ्या अभ्यासाला बसली. त्या दिवशी मी खरच मन लावून अभ्यास केला.दुसर्या दिवशी पेपरला गेल्यावर एक अनामिक हुरहूर मनाला लागली होती. पेपर कसा असेल ?
पेपर आला आमच्या शिक्षिकेने माझ्या हातात दिला पेपर. खूप छान होता पेपर. काल वाचलेलंच सगळ होत त्याच्यात.सही!!!
मी भराभर पेपर लिहित होती.आज खरच खूप छान वाटत होतं.मनाला एक नवीन उभारी मिळाली होती.कॉपी हा पर्याय मुळात नसतोच स्वत: पर्यंत करा सगळ व्यवस्तीत होईल.सही ना भो....मस्तपैकी पेपर लिहून बाहेर आली, माझा मित्र खूप tension मध्ये दिसला.
मी : "काय रे, काय झाल?"
मित्र : "जस तुला माहितीच नाही."
मी: "काय माहिती नाही ??"
मित्र : "कालच्या पेपर मधलं काहीच नाही आला. सरांना वाटत कळल, आमच्याकडे पेपर असतात म्हणून त्यांनी पेपर बदलला."
मी: "अरे, बाप रे तुझे तर हालच झाले ना."
मित्र : "माझे म्हंजे? तुझे नाही झाले. "
मी: "माझे नाही झाले.कारण मी काल तू दिलेला पेपर पेपर बघितलाच नाही.मी अभ्यास केला आणि महत्वाची गोष्ट आजचा पेपर खूप सोप्पा होता.
आणि अभ्यास करून पेपर दिल्यामुळे मला खूप छान वाटत आहे.कॉपी करून आता प्रोब्लेम सुटेल होईल.पुढच काय? आपल्याला फक्त दहावी पास करून घरी बसायचं असत तर ठीक होत पण मला फक्त घरी नाही बसायचं आहे.काहीतरी करून दाखवायचं आहे आणि तू जेव्हा पेपर देत होतास, तेव्हा पण त्या पेपर व्यतिरिक्त बराच अभ्यास केला होता, त्याचा फायदा मला नक्कीच शेवटच्या परीक्षेत होईल त्याबद्दल धन्यवाद.पण आता मला नको ते पेपर , नको त्या कुबड्या!!! मी माझा माझा अभ्यास करेन.ऐन वेळी तोंडघाशी पडण्यापेक्षा प्रयत्न केलेला बरा."
आणि मी तिथून निघून गेली.कदाचित एक माझा मित्र तुटला असेल पण तो खरच मित्र असेल तर त्याला कधीतरी नक्कीच कळेल हेच बरोबर आहे. त्या नंतर मी कधीच कॉपी केली नाही कि पेपर मिळत असेल तरी बघितला नाही.
पुढे दहावीचे पेपर जवळ आले आभ्यास चालू होता परीक्षेचे क्रमांक आले,कुठल्या शाळेत क्रमांक आहे ते कळला माझा क्रमांक एका जवळच्या शाळेत होता ती शाळा खूप कडक आहे.त्या संध्याकाळी माझा तो मित्र परत मला भेटला खूप खुश होता.मी विचारलं "का रे, एवढा खुश आहेस."
मित्र : "एकदम आनंदी आनद गडे इकडे तिकडे चोहीकडे"
माझा क्रमांक अमुक शाळेत आला आहे. आत्ता दहावी तर मी पास आहेच आणि तुझ्यापेक्षा चांगल्या मार्कांनी पास होईन नक्कीच...
मी :"गुड आनंद आहे.पण एक गोष्ट लक्षात ठेव, मेहनत करताना आपण जितके short cut मारतो ना तेवढंच पुढे फळ मिळताना long cut पडतो लागतो अजून हि वेळ गेली नाही, आता सुद्धा अभ्यास कर, पुढे उपयोगी पडेल. माझ्यापेक्षा तुला चांगले मार्क पडले तर मला आनंद होईल. तुला जर कमी मार्क पडले तर मला दुख होईल.बघ तुझा विचार काय होतो तो ?
आणि खरच तसच झालं मला 72% पडले आणि त्याला 85%
त्याने हि science admission घेतलं आणि मी पण. नंतर आमची२ वर्षानंतर बस Stop वर तो भेट झाली.तो गाडी वरून जात होता. मी त्याला आवाज दिला.
मी: "कसा आहेस. "
मित्र : "मस्त मजेत "
तोच निष्काळजीपणा
मी : "मग आता काय engg कि medical"
मित्र : "जान्हवी, तू त्या दिवशी बोलली तेच खंर होत मेहनत करताना No Short Cut ..
11 विला गेलो तेव्हाच कळली मला माझी लायकी काय आहे ते फक्त 48% टक्के पडले आणि लक्ख प्रकाश पडला डोक्यात त्या दिवशी तूचसमोर उभी होतीस.खूप दिवसापसुन भेटायचं होत तुला. मग ठरवलं बस आता स्वत: ला अजून फसवायचं नाही.आणि पप्पा मम्मी शी बोललो
आणि विज्ञान सोडून वाणिज्य घेतले.आता खूप चांगले मार्क आले आहेत. मी b com करेन.CA चा अभ्यास सुरु करेन.मला आता चांगल कळल आहे no short cut हि खुणगाठ बांधली आहे."
त्यानंतर आमच्या अश्याच इकडच्या तिकडच्या थोड्या फार गप्प्पा झाल्या आणि तो निघून गेला.माझ्या मनात एक विचार आला कि "चुका सगळ्याकडून होतात, चूक होण हे चुकीच नसून आपण चूक केली हे आपल्याला ना समजण चुकीच आहे आणि आपली चूक जिथे आपल्याला समजेल तिथेच ती सुधारण्याचा प्रयत्न करणे हे महत्वाच आहे."

आत्ताच काही दिवसापूर्वी तोच मित्र FB वर भेटला होता. मस्त CA झाला आहे.आंतरास्त्रीय कंपनीमध्ये कामाला आहे.आताच विदेश वारी करून आला आहे .तो आता smart Work करतो पण NO Shortcuts .....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छानं

छान लिहील आहेस छोटी.
थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष देणार का? वाचताना लिंक लागत नाहीये त्यामुळे!

कथाबीज छान आहे.
पण, शुद्धलेखनाच्या अभावामुळे वाचताना लिंक लागत नाहीये >> वत्स ला अनुमोदन.

धन्यवाद पिन्ट्या.,मी_चिऊ ,वत्सला ,रान्चो ,आभिजीत Ghodinde |,जाईजुई....
पुढच्या वेळेस लिहिताना काळजी घेईन नक्की....

>>मेहनत करताना आपण जितके short cut मारतो ना तेवढंच पुढे फळ मिळताना long cut पडतो

अगदी खरं! केलेल्या अभ्यासावर पेपर सोडवताना येणारा आनंद वेगळाच असतो. Happy

प्रत्यक्ष जगायची लढाई आपली आपल्यालाच लढावी लागते - तिथे तर कॉपी काय, शस्त्रे कशी चालवायची याचे कितीही शिक्षण मिळाले तरी सगळे निर्णय आपले आपणच घ्यावे लागतात - कुणाला विचारणार तिथे ?

वॉव काय सही आहे. ही कथा जर खरी तुमचीच असेल तर काय सही आहात तुम्ही..... कॉपी केली हे कबूल करताय. मला खरच मस्त वाटत.
हे एकदम खर आहे When it comes to success, there are no shortcuts.

~Bo Bennett

धन्यवाद पुरंदरे शशांक आणि तुमच्या बोलण्याला अनुमोदन
,धन्यवाद जयनीत
,धन्यवाद रणजित चितळे
धन्यवाद अनन्या वर्तक आणि अर्धी गोष्ट माझीच आहे, नन्तर काही गोष्ट गोष्टच आहे..... पण मी खरचं नंतर कधीच कॉपी नाही केली..