"बॉडीगार्ड"

Submitted by मुरारी on 4 September, 2011 - 02:45

आदरणीय सलमान जी खान यांचे wanted , दबंग, आणि रेडी हे चित्रपट माझ्यासारख्या अभागी माणसाने चित्रपटगृहात जाऊन न पहिल्याने जे पाप माझ्या डोक्यावर चढलेल होत, त्याच क्षालन करण्याची संधी परमेश्वराने मला "बॉडीगार्ड" च्या रूपाने दिली आहे, असे माझ्या हापिसातल्या मित्रांनी जेंव्हा मला समजावून सांगितले तेंव्हा मी सुद्धा भारावून जाऊन त्यांच्या बरोबर चित्रपट केंद्रात जाऊन चित्रपट बघण्यास तयार झालो,
सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी, संध्याकाळी ६ च्या मुहूर्तावर १२० रुपयांची दक्षिणा देऊन जेंव्हा आतमध्ये पोचलो, तेंव्हा आतमध्ये उपस्थित असलेल्या जवळपास ६०% मुली पाहून सलमान चित्रपट मुलं सुद्धा थेटरात येऊन का पाहतात याचा अंदाज आला
असो
थेटरात नशीब नेहमीच साथ सोडत. सर्व सुंदर मुली आजूबाजूला विखुरलेल्या असताना, आमच्या बाजूला २ भरभक्कम गुजराती येऊन बसले, काकवा मागे बसल्या होत्या
आणि आखिरकार ज्यासाठी १२० रुपये खर्च केले तो क्षण आला, चित्रपट सुरु झाला
एक लहान ढापण्या मुलगा त्याच्या आईची डायरी वाचताना ट्रेन मध्ये दाखवलय (कूच कूच होता हे छाप), आता थोडा अंदाज आलाच
तर चित्रपट आपल्याला भूतकाळात घेऊन जातो
सरताज नावाचं (राज बब्बर) बड प्रस्थ जयसिंगपूर मध्ये दाखवलंय , त्याची वट एवढी असते कि म्हणे त्याचा बंगला हे त्या गावासाठी स्वतंत्र न्यायालय का काय ते असत. तर एक बाई भेकत त्याकडे येते, आणि म्हणते कि तिच्या मुलीला कोणी म्हात्रे ग्यांग ने पळवून नेल आहे, परदेशात विकण्यासाठी, आणि ते जहाज आजच मुंबईहून सुटणार आहे. मग बब्र्या (राज हो) दय्लोग मारतो आप पुलिस के पास क्यू नाही गयी, मग तिची बडबड.. पुलिस मिली हुई हे वेग्रे वेग्रे.
आता गावापुरत ठीक आहे, पण याची वट मुंबईत पण चालते हे पाहून डोक बधीर व्हायला सुरुवात झाल. तिकडच्या टायगर नावाच्या सिक्युरिटी कंपनीला सरताज १० गार्डस मागवतो मुलींची सुटका करायला, मग अजून एक डायलॉग, त्याचा मालक म्हणतो.. सर इस काम के लिये तो तो सिर्फ एकही बॉडीगार्ड काफी हे. उसकी सिर्फ आंखे हि सामनेवाले कि प्यांट गिली कर देती हे
असे म्हणून तो सलमान ला फोन लावतो,
आणि
आणि
जिस बात का इंतजार था.. वो घडी आ गयी
सलमान खान एका उडत्या गाण्यावर एन्ट्री मारतो . त्याच्या त्या अचकट विचकट स्टेप्स मागे बसलेल्या काकवा आणि समस्त इतर मुली चवीने वेन्जोय करत होत्या . वर कतरिना पण थोड्यावेळासाठी थोबाड दाखवून गेलीये
, धधधडणारी लोकल आणि त्यात उभा असलेला सलमान ..... (ब्लुठूथ कानाला लावून .. हो कारण ते अख्या पिक्चर भर त्याच्या कानाला दाखवलंय Wink )
त्याच बॉस त्याला काय झालंय ते सांगतो आणि डॉक्कयार्ड ला जायला सांगतो ,
सलमान उर्फ लवली सिंग म्हणतो सर मी तो अभी उत्तर मे जा राहा हु, ये काम दक्षिण मे हे, आप किसी ओर को भेज दिजीये ना
बॉस : नही ये सरताज जी का काम हे, इस बहाणे तुम्हे उनका कर्ज चुकता करनेका मोका मिल रहा हे ( मग आपल्याला कळत कि सलमान चा बाप हा सुद्धा सरताज चा बॉडीगार्ड असतो आणि कार अपघातात तो दगावतो, आणि सलमान च पालन पोषण सरताज करतो, म्हणजे त्याचा मालिक)
हे एकदा कळल्यावर सलमान एकदम लोकल च्या बाहेर उडी मारतो, आणि चक्क ओवेऱ्हेड वायर ला पकडून गोल गिरकी खाऊन समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस वर चढतो.. बाब्बो ..
परवाच एक फेसबुक वर असा स्टंट बघितला होता लोकल चे किडे, हा तर त्यांचा बाप निघाला, अभिमानाने डोळ्यात दाटलेलं पाणी फुसून मी पुढे काय होत बघायला सरसावलो , इकडे पब्लिक ने ठेतर शिट्या मारून डोक्यावर घेतलेलं होत Lol
पुढे तर तो त्या गाडीवरूनही उलटी उडी मारून फ्लाय ओवर वर चढतो. हे कस काय झाल याच कोड न सुटल्याने मेंदू ह्यांग होऊन रीस्टार्ट होत असतानाच , तो फ्लाय ओवर वरून परत एक उडी मारतो, आणि थेट जहाज्याचा बेसमेंट मधेच येतो. असा मुंबईत जहाजाला कनेक्ट होणारा फ्लाय ओवर कुठे आहे याचा शोध सध्या घेतोय Wink
मग खाली आल्यावर गुंडांची जी धुलाई होते, ते केवळ बघण्यासारखी, अचाट मारामारी करून तो त्या मुलीना सोडवतो .
इकडे सरताज खुश होऊन त्याला त्याच्या मुलीचा दिव्याचा (करीना कपूर ) "बॉडीगार्ड" म्हणून नेमतो, कारण त्याने आता म्हात्रे ग्यांग शी दुष्मनी घेतलेली असते .
इकडे ती दिव्या लंडन हून MBA करायला इकडे आलेली असते. (खी: खी:)
ब्वार्र ती काय करते आणि तिचं MBA पूर्ण होत का हे कळायला नंतर मार्गच नाहि.
तिला असा "बॉडीगार्ड" नेमलेला अजिबात आवडत नाहि. त्याला काहीही करून पळवून लावायचाच, किंवा इतर कामात अडकवायचा म्हणून ती तिच्या फोन वरून त्याला "छाया" नावाने फोन करायला सुरुवात करते . तिचं नंबर "प्रायवेट नंबर" म्हणून दिसत असल्याने, यालाही कोण फोन करताय ते कळत नाहि.
हळू हळू तो तिच्यात अडकतो. आणि दिव्यालाही जरा मोकळीक मिळते
अशा एका वेळेस एका डिस्को मध्ये म्हात्रे चे गुंड परत हमला करतात, हा परत एकेकाला तोडतो. तेंव्हा दिव्याला कळत कि हा खरोखर आपल्या रक्षणालाच ठेवलेला आहे, आणि त्याची ताकद आणि साधेपणा पाहून त्याच्या प्रेमात पडते. हि गोष्ट ती आपल्या मैत्रिणीला सांगते. पण सरताजला हे कळले तर तो लवली चा जीव घेईल हि भीती असल्याने ती छाया म्हणूनच बोलत राहते .
इकडे बार मध्ये म्हात्रेच्या एका भावाला लवली ने स्वर्गवासी केल्याने म्हात्रे ( आदित्य पांचोली ) भडकतो. आता बदला घ्यायचाच या भावनेने टिपिकल गुंडान प्रमाणे भर पावसात(?) तो भावाची चिता जळवताना (?) प्रतिज्ञा घेतो . इकडे छाया हीच करीना आहे , हे घरातल्या नोकराणीला कळत आणि ती करीनाच्या आईला सांगते , आई सरताज ला. सरताज भडकतो. तो बाहेरगावी असतो. "इकडे करीनाच mba करून संपत वाटत (१० १५ दिवसात m b a ?? ), म्हणून ती ब्यागा भरून लंडन ला जायला निघते, आणि लवली ला सांगते कि मला स्टेशन ला भेट म्हणजे मी कोण आहे हे तुला कळेलच. पण सलमानच्या मोबिल वर सरताज चा फोन येतो हि फोन उचलते, पण काही बोलायच्या आधीच सरताज याला घाल घाल शिव्या घालून मोकळा होतो, आता हिला कळत कि बापाला सर्व कळलेलं आहे , आता काय करायचं ब्वा ? या विचारात असताना म्हात्रे परत सर्व शक्तीनिशी करीनावर तुटून पडतो , हि पळत पळत कुठल्या तरी खंडर मध्ये जाते.. आता तिथे आसपास राजस्थानी खंडर कुठून आलं असा क्षुद्र विचार माझ्या मनात डोकावून गेला पण असो, मागोमाग सलमान धावत तिला वाचवायला येतो,
आता फुल फिल्मी सेट, खाली पाणी साचलंय. सलमान च्या डोळ्यात माती गेल्याने तो डोळे मिटूनच (?) सर्वांना झोडपून काढतोय
परत घमासान, शेवटी फक्त मेन म्हात्रे आणि त्याचा साथीदार (महेश मांजेरकर) उरतात .
मांजेरकर बाजूला करीनाला घेऊन उभा आणि तात्पुरत्या आंधळ्या सलमानला म्हणतो, एक मे तुम्म्पे एहसान करता हु, याहासे जाने देता हु
(आता मगास पासून सलमान च्या जीवावर ५० जण उठलेले असताना , आता कीस खुशिमे हे एहसान असा प्रश्न पडलेला असताना, मला लगेच त्याच उत्तर मिळाल )
"मुझपर एक एहसान करना कि मुझपर कोई एहसान ना करना" .. इति सलमान
(ओक्के हि टुकार पंच लाईन मारायची होती म्हणून आधीचा डायलॉग , मी पण ना.. मंदच आहे)
इकडे पांचोली रागाने एक पाण्याचा पाईप तोडतो. आणि सलमान वर फुल प्रेशर ने पाणी मारतो, त्या पाण्यामुळे सलमान चा शर्ट हळू हळू .......................................

येस you are right !!!!
ज्या क्षणासाठी समस्त स्त्री वर्गाने १२० ची पावती फाडली होती तो क्षण आला. सलमान च्या उघड्या अंगाच दर्शन. त्याच्या "6 packs abs "
कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
:O असो..

तर यथावकाश शेवटचा म्हात्रे पण संपतो. हा करीनाला सोडवून बाहेर येतो, तर बाहेर सरताज परत याला चोप्तो, मग करीना मध्ये पडून सांगते कि ती मुलगी मी नव्हे याच प्रेम कोणी दुसरच आहे, याला स्टेशन वर जौंद्या
मग सरताज सलमान ला सोडतो. हा धावत स्टेशन वर जातो, स्टेशन कुठलं तर "पुणे" वा वा
पण सरताज त्याच्या मागे एक गुंड पाठवतो आणि सांगतो जर याला कुठली मुलगी दिसली नाहि तर खपवून टाक
इकडे करीना धावत घरी येऊन तिच्या मैत्रिणीला सर्व सांगते , आणि सांगते कि तू आत्ताच्या आता स्टेशन ला जा आणि त्याला संग कि छाया म्हणजे मीच आहे.
ती मैत्रीण सुसाट पळत स्टेशन गाठते, त्याने आधी छाया कोण हे बघितलेलं नसल्याने , त्याला वाटत तीच आहे, तो तिला मिठी मारतो, इकडे गुंड पण सर्व ओके म्हणून सरताज ला फोन लावतो..

पण पण...
पुढे काय ???

हे तर तुम्हाला जाऊनच बघायला हव Wink
पिक्चर मधली गाणी बरी आहेत
सलमान त्याच्या युनिफोर्म मध्ये कडकच दिसतो
करीना तर अहाहा .. आणि चक्क तिला अभिनयाची संधी दिलेली आहे, आणि तिने तिचं सोन केल आहे
ती जब वे मेट नंतर याच्यात खूपच सुंदर दिसली आहे
असो मी चित्रपटाला २ स्टार देईन .
बाकी तुम्ही हुशार आहातच Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जयसिंगपूर... जहाज बंदर... पुणे स्टेशन... राजस्तान खंडहर... सगळे एकत्र असलेले हे गाव कुठले?

kuch kuch hota hai .... ani angrakshak ya don pic na jodun banavlaa gelaa....

TADDAN FAALATU.....KON KAY KASE KARAT AAHE TECH KALAT NAHI...
ACHANAK KARINA CHYA MAITRINILAA PREM KASE HOTE...MOBILE KA FEKATE...SAGALECH ACHANAK... Happy

MI CHUKUN DOKE BAROBAR GHEUN GELELO...

PAAPA CHI FALE BHOGALO.... Happy

काय ही ट्रेंड आणलीये सल्लुनी :), रजनी श्टाइल मारामार्‍या आणि दिवसें दिवस जास्तच कॉन्झर्वेटिव्ह होत जाणारा रोमान्स Biggrin
सुरवातीला तो प्रोफेसर करीनाला क्लास मधे खडु फेकून मारतात आणि बॉडिगार्ड तो झेलतो सीन बघून पुढे पण अजुन असेच पंचेस असतील असं वाटलं .. पण नंतर उगीच ती अन्जानी अनदेखी लव्ह स्टोरी वगैरे आणून सुरवातीला वाटलेल्या तंदुरी चिकनच अचानक आळुचं फदफदं झालं Proud
सलमान खान दिसतो मस्तं , करीनाने विचित्र लांब कुर्ते ( चुकून लांब झालेत वाटवे अशा उंचीचे)आणि त्यावर पटियाला घातलेत, नाही आवडले फारसे.

स्पॉयलर वॉर्निंग :
शेवट तोच आवडला असता जिथे ती मैत्रीण येते आणि तिच सल्लु बरोबर जाते.. दॅट्स इट्.. मज्जा आली असती.. पुढे अजुन काही दाखवायलाच नको होते !

>>हे कस काय झाल याच कोड न सुटल्याने मेंदू ह्यांग होऊन रीस्टार्ट होत असतानाच >>>कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!>>> Rofl

परिक्षण लय भारी राव.. आवडलं!! Happy

>>फुडच्या म्हयन्यांत टीवी वरच बघुया...>> अगदी Happy

धमाल लिहीलं आहे! मजा आली वाचायला Lol तो फ्लायओव्हर सापडला तर आम्हालाही कळव. हार्बर लाईनवर असेल कदाचित Happy

हाहाहाहा
कहर ..
प्रसन्न
काय बेकार लिहील आहेस रे ...
जीव गेलाय हसून हसून Lol

खालची वाक्य अफाट आहे , जास्तच परिणाम झालाय वाटत, बाडी गार्ड चा

सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी,

आदरणीय सलमान जी खान यांचे

थेटरात नशीब नेहमीच साथ सोडत

हे कस काय झाल याच कोड न सुटल्याने मेंदू ह्यांग होऊन रीस्टार्ट होत असतानाच ,

इकडे करीनाच mba करून संपत वाटत , म्हणून ती ब्यागा भरून लंडन ला जायला निघते, =))

सलमान च्या डोळ्यात माती गेल्याने तो डोळे मिटूनच (?) सर्वांना झोडपून काढतोय

कॅमेरा नुसता गरा गरा ३६० अंशात फिरतोय, सलमान च्या डोळ्यातून अंगारे .. इकडे आनंदाने चीर्कून बेभान झालेल्या मुली, आणि आमच्या टीम मधल्या काकवा.. आणि हे सर्व हतबुद्ध पण पाहणारा मी ... !!!!
असो..

__/\__

प्रसन्न, हे लेखन चित्रपट विभागात हलव (आणि तरीही "सार्वजनिक" ठेव). तुला करता आले नाही तर अ‍ॅडमिनना विनंती कर. म्हणजे तेथे लौकर सापडेल काही दिवसांनी शोधले तरी.

मस्त लिहिलयस !
सलमानचा दबंग ईडियट बॉक्सवर पहाण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण नाहीच पाहू शकले.
आता आमच्या गल्लीत बोडीगार्ड मधलं टायटल साँग गणपतीपुढे, गणपतीच्या आरतीपेक्षा जास्त वेळा आणि भक्तिभावाने लावताहेत. डोक्याचा भुगा झालाय!

सलमान च्या डबल अश्या आमच्या टीम मधल्या तीन काकवा, सलमान च्या अर्धे असे माझे दोन मित्र, आणि पाव असा पापी मी... हा कडक होता..मित्रा...............

अफाट लिहितोस रे तू.........

मस्त लिव्हले आहे. करीनाच्या फॅशन्स जरा कॉन्झरवेटिव स्वरुपाच्या आहेत कारण सिनेमा इद रिलीज आहे. त्या मुलींच्यात लोकप्रिय होइल अशी फॅशन हवी असणार. नैतर अब्बाजान गुस्सा हो जैंगे ना.

बाकी काही असो, सलमान्च्या यशामुळे शारुख आजोबांचं सिंहासन नुसतं डोललं नाही तर कलमडून पडलय म्हणून अ‍ॅम हॅपी फॉर सलमान Proud
एस आर के चा किंग खान किताब अता ऑईफिशिअली बहाल करावा सल्लुला :).

BODY - KAADH..

SHIRT - KAADH..

PANT - KAADH..

CHADDI - SUDDHA - KAADH..
Happy

हो तोडलं म्हणे. आणि दिपांजली, ह्यासाठी फुल्ल अनुमोदन Happy
रावणाचा शारूख पिक्चर आता कोण बघेल कोण जाणे... Proud

>> बाकी काही असो, सलमान्च्या यशामुळे शारुख आजोबांचं सिंहासन नुसतं डोललं नाही तर कलमडून पडलय म्हणून अ‍ॅम हॅपी फॉर सलमान फिदीफिदी

मी ही डिजेशी सहमत. शारुकचा मूर्खपणा सहन करण्यापेक्षा सल्लूचा टिपी कधीही परवडला. डिव्हिडी आलेली आहे घरात. बघु कधी मुहुर्त लागतोय.

Pages