दुर्ग-गणेश

Submitted by आशुचँप on 2 September, 2011 - 12:16

मंडळी...
मायबोली गणेशोत्सवात प्रसिद्ध, अप्रसिद्ध मंदिरे पाहून मला दुर्ग-गणेशची संकल्पना सुचली. जरी बहुतांश गडांवर महादेव किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी गणराय देखील काही ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत असतात.
या दुर्गभ्रमंती दरम्यान पावलेल्या या काही बाप्पांची प्रकाशचित्रे माबोकरांसाठी सादर करत आहे.
माबोकर आनंदयात्रीला ही संकल्पना सांगितल्यावर त्यानेही उत्साहाने प्रतिसाद देत त्याच्याकडील आणि रोहन एक मावळा कडील काही बाप्पा पाठवले....
सर्व भटक्यांनी देखील आपल्याकडे असलेली दुर्ग गणेशांची प्रचि पाठवाव्यात जेणेकरून एक सुंदर असे संकलन करता येईल...
धन्यवाद...

प्रचि १

पहिले बाप्पा.. कुलाबा किल्ल्यावरील..अलिबागच्या जवळील या किल्ल्यात सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आजही मोठ्या प्रमाणावर भाविक इथे भेट देतात. दीड फूट उंचीची ही संगमरवरी मूर्ती अतिशय लोभसवाणी आहे. राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात...

प्रचि २

हे बाप्पा अनेकांना माहिती असतील...राजगडच्या सुवेळा माचीवर विराजमान झालेल्या या बाप्पांना वंदन करून मगच राजगडची फेरी पूर्ण होते...सर्वसाधारणपणे माची किंवा पहार्याच्या ठिकाणी मारूती आढळतो पण गणेश अपवादानेच आढळतात.

प्रचि ३

काळ्या संगमरवरातील गणेशमूर्ती...कोल्हापूरजवळील गगनगडावर आढळलेली...
विशेष म्हणजे माझ्या पाहण्यात महादेव मंदिरात सहसा गणेश आढळलेले नाहीयेत पण इथे आपल्या वडीलांबरोबर आपले स्थान राखून आहेत.

प्रचि ४

ही देखील अजून एक प्रसिद्ध गणेशमूर्ती...हरिश्चंद्रगडावर अत्यंत अनघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेली....

प्रचि ५

आणि ही तिथून जवळच असलेल्या गुंहेत...या गुहेला नावच गणेश गुहा आहे. दुर्ग गणेश मध्ये आकाराने सर्वात मोठा.

प्रचि ६

प्रचि ७

मोरधन उर्फ मोराचा डोंगर च्या पायथ्याशी एका वडाच्या झाडाखाली विराजमान झालेले हे रेखीव गणेश...(कळसूबाई रांग)

प्रचि ८

साल्हेर किल्ल्यावरील गणेशप्रतिमा

प्रचि ९

मुल्हेर माचीवर एक सुरेखसे गणेशमंदिर आहे...तिथली एक गणेशमूर्ती...(फोटो- रोमा)

प्रचि १०

त्या मंदिराच्या बाहेर विराजमान झालेले अजून एक बाप्पा

प्रचि ११

हा फोटो यो रॉक्सने काढलेला...वॉमावरून कळेलच अर्थात Happy

प्रचि १२

किल्ले अजिंक्यताराच्या बळकट प्रवेशद्वारावर विराजलेले बाप्पा..
(फोटो - आनंदयात्री)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणखी काही..

कुलंग दुर्ग


दुर्ग तिकोना


हरिश्चंद्रगड. पुष्करिणीच्या वरच्या बाजूच्या एका देवळीत.


सुधागड. पंतसचिव वाड्याशेजारी.

आशु, पहिल्या फोटोवरून कित्तीतरी वेळ नजर हटलीच नाही.
इतकी सुंदर आणि सुबक मुर्ती मी पहिल्यांदाच पाहिली. Happy

सुरेख काढलेस फोटो.

मस्तच थिम रे आशु.... एकदम संयुक्तिक....

माझ्याकडुन ही काही प्र.चि.
१. नाणेघाट पार करुन वरती आले की उजव्या गुहेतील गणेश

२. कुकडेश्वर मंदिरातील गणेश
हा गणपती कोरलेला दगड असाच जमिनीवर पडला होतो आणी आम्ही गेलो होतो तेव्हा ASI कडुन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम चालू होते. आता बहुदा पुनर्स्थापीत केला असावा..

३. चावंड किल्ल्याच्या प्रवेशद्वारच्या गणेशपट्टीवरील गणेश

४. पळू-सोनावळे (गणेश गडद) गुंफामधील मुख्य गुहेतील गणेश

५. राजमाची किल्ल्याच्या तळ्याजवळील शंकराच्या मंदिरातील गणेश

अजुनही बरेच असेच गणपतींचे प्र.चि. किल्ल्यांवर फिरताना काढले आहेत. घरी जाऊन शोधावयास हवे..

गणपती प्रमाणेच अशी थिम किल्ल्यांवर असलेल्या हनुमान, शंकर इ. मुर्तींवर सुरु करायला हवी असे वाटते.....

हेम, मनोज.. मस्त मस्त.. अपेक्षेप्रमाणे तुमच्याकडून फोटो आल्याबद्दल खूप धन्यवाद.. मस्तच.. Happy
मनोज.. शोधा म्हणजे नक्की सापडेल.. Wink मस्तच.. त्या पळू-सोनावळे गुहेबद्दल थोडी माहिती द्या..

हनुमान, शंकर इ. मुर्तींवर सुरु करायला हवी असे वाटते..... >> अनुमोदन.. Happy

भीमाशंकरला गणेशघाटातून गाठायचे तर घाटात सुरवातीलाच लागणार्‍या या गणेश मंदिराचे दर्शन झालेच पाहीजे.. Happy

मस्त रे यो! अरे तुया गांवाकडलो रामगड बगलाहांस कांय? रामगडांर एक सुबकशी गणेशाची मूर्ती आसां. इतर कुणाजवळ असेल तर टाका रे! आणखी राहिलेले म्हणजे.. अलंगच्या उडदवणे वाटेवरील ढासळलेल्या दरवाजावरील गणेश.
या आशूला एकेक गोष्टी दुसर्‍यांना कामाला लावून संकलीत करण्याचा नाद लागलाय... आधी भुताच्या गोष्टी झाल्या आता किल्ल्यांवरचे गणपती! ....नवरात्र येतंय, मग आहेत दुर्ग श्रीदेवी, नंतर दुर्ग मारुती..दुर्ग शंकर ....दुर्ग भैरव!!!

या आशूला एकेक गोष्टी दुसर्‍यांना कामाला लावून संकलीत करण्याचा नाद लागलाय... आधी भुताच्या गोष्टी झाल्या आता किल्ल्यांवरचे गणपती! ....नवरात्र येतंय, मग आहेत दुर्ग श्रीदेवी, नंतर दुर्ग मारुती..दुर्ग शंकर ....दुर्ग भैरव!!! >>>अगदी Lol पण होउन जाउ दे... ! Proud

रामगडांर एक सुबकशी गणेशाची मूर्ती आसां. >> बघूक व्हया..

दिपावलि निमित्य विविध किल्ल्याचे चित्र प्रकाशित करावे. आमच्या सारखे किल्लाप्रेमि प्रतिकशेत आहेत.

या आशूला एकेक गोष्टी दुसर्‍यांना कामाला लावून संकलीत करण्याचा नाद लागलाय... आधी भुताच्या गोष्टी झाल्या आता किल्ल्यांवरचे गणपती! ....नवरात्र येतंय, मग आहेत दुर्ग श्रीदेवी, नंतर दुर्ग मारुती..दुर्ग शंकर ....दुर्ग भैरव!!! >>> Lol

अरे चॅम्प, सरसगडावरच्या महादेवाच्या पाठीमागच्या बाप्पाचा फोटॉ टाक ना... (की मी टाकू? ;))

च्यायला हेमट्या....
तुला कसे कळले...
अरे खरेच माझ्या डोक्यात बरेच विषय आहेत...
पण आता फोटो नाही...पुढचा विषय कानात सांगतो तुझ्या...आधीच बोभाटा करायचा नाही...

रामगिरीकर - नक्कीच प्रयत्न राहील..पण असेही आपल्या भटक्यांनी खूप सा्या किल्ल्यांचे फोटो टाकले आहेत.
नचिकेता - मी टाकतो रे...उद्याच टाकतो

लोकहो हीच थीम मी डीएनए च्या आर्टीकलसाठीपण वापरली आहे.
उद्या पुणे डीएनए आफ्टर अवर्स पुरवणी शेवटचे पान पहा...
गिरीविहार तुला विपू केली आहे ती कृपया पहावी

माझ्या कडुन आणखीन काही प्र. चि. .....

१. अलिबाग (कुलाबा) किल्ल्यातील गणेश पंचायतन

धाग्याच्या सुरुवातीलाच आशुने याचा फोटो दिलाय पण संपुर्ण गणेश पंचायतनाचा फोटो माझ्याकडून

२. घोसाळगड पायथ्याच्या घोसाळे गावातील गणेश

३. सज्जनगडावरील राममंदिरातील गणेश

४. साल्हेर किल्याच्या माचीवरील रेणुकामंदिरातील गणेश
छत नसलेल्या मंदिरातील ही गणेश मुर्ती बरीच झिजली आहे

५. अवचीतगडाच्या पायथ्याच्या पिंगळसई गावातील गणेश*

हे सिद्धिविनायकाचे मंदिर पेशवेकालीन आहे आणी खाजगी (नाव विसरलो पण आता मुंबई स्थायीक बहुतेक बर्वे किंवा भुरे) मालकीचे आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा ते स्वतः तिथे आलेले होते आणी त्यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर सारसबागेच्या गणपतीच्या समकालीन आहे. दोन्ही मुर्तीतील साधर्म्य पाहता दोन्ही मुर्ती एकाच मुर्तीकाराने बनवल्याची शक्यता नाकारता येत नाही

* हा फोटो मंदिराच्या मालकांना विचारुन काढला आहे.

Pages