बखर

Submitted by अज्ञात on 2 September, 2011 - 05:57

जिणे मोकळे माझे जे एकदाचचे देणे घेणे
निवांत जमलो आकाशी बोललो किती ते ना जाणे
कुणी वाहिल्या शब्दकळ्या कुणि कल्पनेतले नजराणे
पहुडले हृदयतळ एकांती ऐकले कळांचे अन गाणे

तापल्या तनूवर शिडकावा जाणिवांत दोघांचे असणे
भरभरले उतले काळिजभर सजले मनभर उठले मेणे
आठवू किती साठवू किती रडण्यातुन ओघळले हसणे
दूरस्थ तरीही एक जणू होते स्वर्गातिल ते रमणे

गेले उरले कांही न आता स्वप्नावत घडले हे जेणे
दाटले फिकुटले अवघडले विरघळले नकळत हिरवळणे
आशेत मग्न संमोहित मी झेलण्या थेंब चातक जैसे
पाहती नयनद्वय वाट उणी जाहली बखर त्यांचे लेणे

.........................अज्ञात

गुलमोहर: 

छान!:)

हर्षदा, चाऊ, विभाग्रज,

मनापासून धन्यवाद !! Happy