रसग्रहण स्पर्धा - "अर्थात" - ले.अच्युत गोडबोले

Submitted by धनश्री पाथक on 30 August, 2011 - 23:16

"अर्थात"
लेखक: अच्युत गोडबोले
प्रकाशन: राजहंस प्रकाशन
पहिली आवृत्ती: ऑक्टोबर -२००९
मूल्य ; रु. ३००/-

"अर्थात" अच्युत गोडबोले लिखित अर्थशास्त्रावराचे पुस्तक. पुस्तक घरी आल्यानंतर ४-५ महिने तसेच शेल्फवर पडून होते. ४५० पाने आणि अर्थशास्त्रावरचे पुस्तक वाचायची हिम्मत होत नव्हती. एकदा असेच दुसरे काही वाचायला नव्हते म्हणून वाचायला सुरु केले आणि प्रस्तावनेनेच पुस्तकाबद्दल ओढ निर्माण केली.
अच्युत गोडबोलेंनी अतिशय सुंदर पुस्तक लिहिले आहे. अर्थशास्त्र म्हजे रटाळ, कंटाळवाणे हे समीकरण त्यांनी बदलून टाकले आहे. अर्थशास्त्र रोजच्या जीवनाशी कसे निगडीत आहे आणि महागाई, लोकसंख्यावाढ यांचा अर्थशास्त्राशी किती जवळचा संबंध आहे , बरेचदा " गरीब लोक ज्यास्त मुले पैदा करतात त्यामुळे लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे गरिबी वाढते " ह्या आपल्या नेहमीच्या वाक्यांचे खरं विश्लेषण कसे व्हायला हवे तसेच भ्रष्टाचार , गरिबी कशातून निर्माण होते हे खूपच सोप्या आणि रंजक भाषेत लिहिले आहे. पुस्तकाची प्रस्तावनाच मनावर पकड घेते.

तशी मराठी मध्ये अर्थशास्त्रावराची पुस्तके कमी आहेत. त्यात हा विषय क्लिष्ट. तरीही सामान्य माणसापर्यंत अर्थशास्त्र पोहोचवण्याची अवघड कामगिरी या पुस्तकाने केली आहे.एक मात्र सांगावेसे वाटते की हे पुस्तक "कुठे काय गुंतवल्याने जास्त पैसे मिळतील ?" हे सांगण्यासाठी नाही. त्या आशेने हे पुस्तक वाचूही नये. ज्यांना खरच अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना यामध्ये नक्की असते काय हे जाणून घायचे आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. पुस्तकात प्रत्येक ठिकाणी अतिशय सोपी सोपी उदाहरणे देऊन प्रत्येक गोष्ट उलगडून सांगितली आहे. कुठेही किचकट समीकरणे किंवा अवघड आलेख वापरले नाही आहेत. अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडला आहे.

पुस्तकामध्ये एकूण ८ प्रकरणे आहेत. सुरुवात होते ती " अर्थशास्त्राची पार्श्वभूमी "यामधून. यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय? त्याचे प्रकार माइक्रोएकोनोमिक्स आणि मॅक्रोएकोनोमिक्स याबद्दल माहिती मिळते. माइक्रोइकॉनॉमिक्स म्हणजे ग्राहक आणि उत्पादन यांचे बाजारपेठेतील संबंध याचा आणि मॅक्रोएकोनोमिक्स्मधे सर्व राष्ट्राच्या अर्थकारणाचा विचार केला जातो. अलीकडे अर्थशास्त्राचा पर्यावरणाच्या दृष्टीतूनही विचार होतो आहे. याला एन्व्हायरन्मेंटल इकॉनॉमिक्स म्हटले जाते. इथून पुढे लेखक जॉन लोक, मार्क्स यांच्या बद्दल चर्चा करतो.

दुसरे प्रकरण "अर्थशास्त्राचा गाभा " हे अतिशय महत्वाचे आहे. ज्यांना अर्थशास्त्रातल्या सर्व गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत त्यांच्या दृष्टीने हे प्रकरण महत्वाचे आहे. यात जी डी पी . कसा काढला जातो? जी डी पी. म्हणजे "राष्ट्रीय उत्पादन " याचे मोजमापन कसे केले जाते ते अतिशय सोपे उदाहरण देऊन समजून सांगितले आहे. अर्थव्यवस्थेतील वस्तू / सेवा आणि पैसा यांचा 'circular flow' कसा असतो पैसा पुरवठा आणि banks यांचा परस्पर संबंध कसा आहे ते सांगितले आहे. बँका चालतात कश्या ? ' Federal Reserve Bank ' आणि 'Reserve bank of India' यांचे नक्की काम काय? त्या कशाप्रकारे चालतात ते नीट सांगितले आहे. याच्यात आपल्याला माहित नसलेल्या बर्‍याच गोष्टी माहीत होतात उदाहरणार्थ 'monitory base'(बँकांनी मध्यवर्ती बँकेत ठेवलेला reserve पैसा आणि अर्थव्यवस्थेतील फिरणारे चलन नोटा नाणी यांची बेरीज याला 'monitory base' म्हणतात , यालाच " reserve money "असेही म्हणतात ) , 'money supply' , कॅश रिझर्व्ह रेशो ( CR R ) अश्या गोष्टी आपल्याला माहित होतात ते देखील उदाहरणासहीत. Equation of Exchange = MV * PT म्हणजे थोडक्यात MV म्हणजे पैशाची अर्थाव्यवास्थेतली संपूर्ण भ्रमंती (circulation) आणि PT म्हणजे संपूर्ण व्यवहाराचे मूल्य एकच असले पाहिजे. यातच भर घालून विकसित झालेली "Quantity Theory of Money" काय आहे आणि ती कोणी आणि कशी प्रसिद्धीस आणली हे रंजकरीत्या सांगितले आहे. आपल्याला नेहमी "Economic Times ", " CNBC" मध्ये दिसणारे शब्द "रेपो रेट ", "मॉनिटरी उपाय " म्हणजे नेमके काय ? तसेच एकूण पैसा पुरवठा हा अर्थव्यवस्थेतल्या बेकारी , महागाई , आर्थिक वाढ , चलन दर , "trade deficit" यावर परिणाम कसा करतो आणि मध्यवर्ती बँक्स त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय काय करतात हे कळते.

आपण नेहमी महागाई विषयी चर्चा करतो पण महागाईचे मोजमाप कसे केले जाते? "Deflation", "Disinflation"," Hiper-inflation" यांचे अर्थ काय? तसेच सी पी आई , कोला, पी पी आई हे महागाई मोजण्याचे मापदंड म्हणजे नक्की काय आहे? महागाईचा आयात - निर्यातीवर काय परिणाम होतो हे लेखकाने विस्तृतपणे मांडले आहे. नेहमीच्या बातम्यात ऐकणार्र्‍या गोष्टी चलन वाढ वगैरे , परकीय चलनाचे महत्व, ते कसे नियंत्रित केले जाते, त्याचा महागाईशी काय संबंध आहे, रुपया वधारला म्हणजे काय ? त्याचा नक्की अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो , हेही समजवून सांगितले आहे. तसेच हल्ली आपण सगळे घाबरत असलेले "recession" कसे येते? " Business cycles " कशी काम करतात? त्यामागच्या theories काय आहेत? हेही खूप समर्पक उदाहरणे देऊन समजावले आहे. जिथे जरूर पडेल तिथे योग्य आकृत्या दिल्या आहेत जेणे करून आपल्याला विषय नीट समजेल. काही ठिकाणी आलेख दिले आहेत पण हे इतके सोपे आहेत कि कोणालाही लगेचच कळेल.

नन्तर लेखक "प्राचीन अर्थशास्त्र " कडे वळतो. अर्थशास्त्र सुरु कसे झाले ? चाणक्य, ग्रीक,चीनी आणि अरबांचे अर्थशास्त्र कसे होते, याचा उहापोह केला आहे. जगातले पहिले अर्थतज्ञ भारतीय वेदच आहेत. अथर्ववेद , ऋग्वेद यामध्ये लोकसंख्या , उत्पादन, विनिमय, विभाजन, कर आकारणी , आर्थिक धोरण या सगळ्यांचा विचार केला गेलाय. अगदी रामायण काळातही व्यापारावर समाजाचे नियंत्रण होते. भारताबरोबरच चीन मधेही अर्थशास्त्राच्या जाणीवा जागृत होत्या. चीनच्या "वंग आशी" याला अर्थशास्त्राचा जनक म्हटले जाते. इस्लामिक राजवटीमध्ये "अबू युसुफ" याने अर्थशास्त्रावर पुस्तक लिहिले होते.

याच प्रकरणात पुढे लेखक बँकिंग आणि "insurance" चा आरंभ कसा झाला, कंपन्या आणि "stock exchange" ची सुरुवात कशी झाली. तिथूनच सट्टेबाजीचे बुडबुडे कसे सुरु झाले याची गंमतशीर कहाणी सांगतो.

तिथून पुढे सर्व " classical economics" सांगितले आहे. अर्थशास्त्राचा पितामह "अ‍ॅडम स्मिथ", त्यचे "Wealth of Nations", तसेच थोमास माल्त्हास, देविद रेकॅर्डो, भांडवलशाही आणि त्यातून निर्माण झालेली औद्यागिक क्रांती यावर विवेचन केले आहे. मार्क्स आणि त्याचे विचार याबद्दलही लेखकाने बरेच लिहिले आहे. मार्क्स नन्तर केंस पर्यंतच्या कालखंडामध्ये लेखकाने आल्फ्रेड मार्शल , वेव्लीन , आईर्विंग फिशर यांची संक्षिप्त चरित्रे सांगितली आहेत. पूर्ण पुस्तकामध्ये जवळपास सर्व महान अर्थशास्त्रज्ञांची संक्षिप्त रंजक चरित्रे सांगितलेली आहेत.

यानंतर " केंस आणि त्याच्या नंतरचा कालखंड" ( John Maynard Keynes) सांगितला आहे. यामध्ये अमेरिकेच्या इतिहासातले गाजलेले "ग्रेट डिप्रेशन" (Great Depression) , वर्णिले आहे. केंस , "fiscal policy" केंस ला झालेला विरोध स्पष्ट केला आहे. हा केंस होता तरी कोण? - हा माणूस म्हणजेच ज्याने १९२९ च्या भयानक परिस्थितीतून मार्ग दाखवला होता तो. या माणसाने सांगितलेल्या गोष्टी खरोखरीच कमालीच्या होत्या.१९३० साली त्याचे "A Treatise on Money " पुस्तक प्रसिद्ध झाले आणि यामध्ये त्याने अर्थव्यवस्था कशी चालते , तिची भरभराट कशी होते, त्यात मंदीही कशी येते याचा खूप सखोल आणि शास्त्रशुद्ध विचार मांडला होता.पूर्वी सनातनी अर्थत्ज्ज्ञांचे मत असे होते की मंदीवर मात करण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची काहीच गरज नाही आहे. मुक्त बाजारपेठ स्वतःच स्वतःला नियंत्रित करेल. (Famous invisible hands of market) पण केंसचे म्हणणे वेगळे होते. त्याच्या मते महामंदी आपोआप सुटणार नाही. मंदी सौम्य असेल तर CRR आणि व्याजदर कमी करण्यासारखे monitory उपाय योजून आणि मंदी तीव्र असेल तर सरकारला हस्तक्षेप करून, सरकारी खर्च वाढवून म्हणजेच "Fiscal Policy" वापरून , लोकांची खरेदीक्षमता वाढवून , घटलेल्या मागणीला चालना देवून भांडवलशाहीला मंदीतून वर काढावे लागेल. केंस बद्दलच्या बर्याच गोष्टी पुस्तकात मांडल्या आहेत.

त्या वाचायला मज्जा येते. यानंतर "Fiscal Policy", "Multiplier Effect" या गोष्टी लेखक समजावून सांगतो. यानंतर केंसवर तात्त्विक टीका करणाऱ्या फ्रीडमनची तत्वे आपल्याला कळतात.

नंतर लेखकाने अमर्त्य सेन यांच्या अर्थशास्त्रातल्या योगदानाविषयी लिहिले आहे. अमर्त्य सेन यांनी "Welfare Economics" आणि विषमता, गरिबी आणि दुष्काळ यावर लोकशाही पद्धतीतले उपाय (Economic Development)यावर खोलवर विचार मांडले आहेत.आणि अर्थशास्त्राशी निगडीत सर्व संकल्पना सोप्या भाषेत मांडल्या आहेत.बरेचदा आपल्याला फक्त नावे माहित असतात पण त्यांचे अर्थ माहित नसतात आणि "व्याज दर कमी जास्त झाले, रुपयाचे अवमूल्यन झाले " यागोष्टीने नक्की काय परिणाम होतो, जो आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे हे या पुस्तकात कळेल अश्या भाषेत सांगितले आहे.

या संपूर्ण पुस्तकाचा प्रवास "अर्थशास्त्र" सुरु कसे झाले? बँका सुरु कश्या झाल्या? नाणी , नोटा सुरु कशा झाल्या? Insurance , सट्टेबाजी सुरु कशी झाली, वेळोवेळी अर्थव्यवस्थेत कुठल्या कुठल्या विचारांचा पगडा होता. अर्थव्यवस्थेत तेजी, मंदी ही चक्रे कशी येत गेली आणि हळू हळू अर्थशास्त्राचा सुरुवातीपासून आत्तापर्यंत प्रवास कसा झाला. कोणी कोणी त्यात महत्वाचे योगदान दिले आणि त्यांची छोटी छोटी रंजक चरित्रे यांचा समावेश आहे.

पुस्तकाच्या शेवटी लेखक "आजच्या प्रश्नांबद्दल" बोलतात. २००८-०९ मध्ये आलेले share-market मधील अरिष्ट किती भयानक होते आणि ते का आले होते याची कारणमीमांसा केली आहे. मुख्यतः अर्थशास्त्र का शिकायचे? त्याचे सामान्य जन-जीवनाशी काय नाते आहे हे लेखकाने उलगडून सांगितले आहे. तसेच शेवटी "अर्थ-पूर्ण-विराम" यामध्ये गेल्या दोन दशकात झालेली अर्थश्स्त्राची प्रगती खरोखरच जन-सामन्यापर्यंत पोहोचली आहे का? या प्रगतीचा भारताने कसा उपयोग करून घेतला आहे ? आणि सध्याची भारताची परिस्थिती काय आहे? हल्ली IT industry मुळे भारतात प्रचंड सुबत्ता आली असे जे चित्र निर्माण होत आहे ते खरोखरच बरोबर आहे काय? आपण अजून किती ठिकाणी मागे आहोत आणि यातून पुढे जायचे असेल तर कुठले विचार आपल्याला मार्गदर्शन करतील याचा विस्तृत आढावा घेतला आहे.

पूर्ण पुस्तक वाचणे हा खरोखरच एक चांगला अनुभव आहे.यातून अर्थशास्त्राबद्दल बराच रस निर्माण होतो. मुख्य म्हणजे कुठेही पुस्तक कंटाळवाणे वाटत नाही. मध्ये मध्ये लेखकाने बरेच विनोदी किस्से सांगितले आहे, अर्थतज्ञांच्या गमतीजमती सांगितल्या आहेत.

एका वेगळ्या विषयावरील आपल्या माहितीत अजून भर घालायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचावे. हे वाचून झाल्यावर "Economic Times" आणि "CNBC" वर ज्या चर्चा चालतात त्या आपल्याला कळायला बरीचशी मदत होते.ज्यांना अर्थशास्त्राच्या इतिहासाबद्दल रस नाही पण आधुनिक अर्थशास्त्राबद्दल वाचायचे आहे त्यांनी "अर्थशास्त्राचा गाभा", "केंस आणि नंतर " आणि " आजचे प्रश्न" ही प्रकारणे तरी जरूर वाचावीत. तसे पूर्ण पुस्तकच मनोरंजनपर माहितीपूर्ण/अर्थपूर्ण पुस्तक आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांपासून हे पुस्तक माझ्या विशलिस्ट वर आहे पण धनश्री ने म्हटल्याप्रमाणे वाचायची हिम्मत होत नव्हती Sad
सोप्या भाषेतल्या या उत्कंठा वाढवणाऱ्या परीक्षणानंतर वाचीन म्हणते ...

परीक्षण खरंच चांगले झाले आहे .. थोड्या शुद्धीकरणाच्या चुका आहेत पण प्रयत्न हि पहिलाच दिसतोय. म्हणून दुर्लक्ष करायला हरकत नाही. Happy

चांगली माहिती दिलीय. सर्वसाधारणपणे रुक्ष विषयावरची पुस्तकं वाचणं जड जातं, पण हे रसग्रहण वाचून पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शुद्धलेखनाच्या चुका सोडल्यास चांगला माहितीपर लेख लिहिला आहे तुम्ही. पुस्तकातल्या सर्व प्रकरणांचा संक्षिप्त आढावा, त्यात दिलेली माहिती वगैरे पुस्तकाबद्दल नेमकी माहिती देते. तसेच शेवटी तुम्हाला पुस्तक वाचून झाल्यावर वाटलेला अनुभवपण इतरांना उत्तेजन देईल.

Excellent efforts...first of all reading something on such topic and digesting it is a huge challenge. This is a really good summary and it made me more inclined to read this book now. Thanks for sharing this with us.

Being new comer here, I myself struggle a lot in typos and spellings while typing in Marathi Lol so won't comment on it. but kudos to your effort on content of this synopsis.

क्लिष्ट विषयवरच्या पुस्तकाची सोप्या भाषेत ओळख करून दिलीत याबद्दल अभिनंदन अन धन्यवाद.

मुख्यतः अर्थशास्त्र का शिकायचे? त्याचे सामान्य जन-जीवनाशी काय नाते आहे हे लेखकाने उलगडून सांगितले आहे. >> एकदम पटलं.

रसग्रहण स्पर्धा आज संपेल, पण तुम्ही यापुढेही वाचलेल्या पुस्तकांबद्दल वाचू आनंदे मधे लिहीत रहाल अशी अपेक्षा.

"कुठे काय गुंतावाल्याने ज्यास्त पैसे मिळतील ?" हे सांगण्यासाठी नाही. त्या आशेने हे पुस्तक वाचूही नये. ज्यांना खरच अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्यांना यामध्ये नक्की असते काय हे जाणून घायचे आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे >> वा!!

फायनान्स बॅकग्राउन्ड अजिबात नसेल्यांनी माहितीसाठी-ते सुद्धा मराठीत- वाचायला हवे असे वाटतेय हे पुस्तक. रसग्रहण आवडले.

गो मेधा Happy
धनश्री, चांगलं आहे रसग्रहण. अशी "नॉन फिक्शन" कॅटेगरीत मोडणारी पुस्तक सहसा आपणहोवून वाचली जात नाहीत पण हे रसग्रहणा वाचून वाचायची इच्छा होते आहे. गुड जॉब.

मेधा. Happy काहीतरी करायला पाहिजे असं वाटणं वेगळं आणि करणं वेगळं.

मस्त आहे धनश्री. अशा विषयांकडे बहुतेक सारे भीतभीतच बघत असावेत. छान!

आमच्या रटाळ पाठ्यपुस्तकानी या विषयाबद्दल पुरेशी घृणा निर्माण केली होती.
आमच्या शिक्षकांच्यामूळेच आम्ही तरलो. त्या काळात असे पुस्तक वाचायला
मिळते तर !!!

मेधा मनःपूर्वक धन्यवाद ! typo दुरुस्त करून दिल्याबद्दल खरच आभारी आहे. माझा हा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे आणि त्यात मायबोलीवर तुम्ही सगळे देत असलेले प्रोत्साहन बघून खरच खूप आनंद होत आहे. मी सर्वांचीच आभारी आहे.

अर्थशास्रासंबंधी काही वाचायचे म्हणजे मला धडकी भरते कारण थोड्या वेळाने काहीच कळेनासे होते! Proud रसग्रहण मात्र आवडले, धन्यवाद.

एफवाय आणि एसवाय बी कॉमच्या वर्गांची आठवण झाली.
जर परीक्षेत उत्तरं लिहायला लागणार नसतील तर अर्थशास्त्र हा अजिबात रुक्ष विषय नाही.
कुणी गंगाधर गाडगीळ यांच्या आर्थिक नवलकथा वाचल्यात का?

शैलजा +१
हे पुस्तक छान असणार! मला अर्थशास्त्र कधीच नव्हतं अभ्यासाला, पण ही लेखमाला लोकसत्तेत यायची तेव्हा आवर्जून वाचली जायची.