....तशी माझी आई....

Submitted by विभाग्रज on 28 August, 2011 - 05:20

पीडा सुमनाला, सुंड भ्रमराची
परी मधू घास देई, तशी माझी आई
...................फुलापरी आई !

ऐरणीचे पाठी,घाव हाथोड्याचे
तेणे सोन्या भाव येई,तशी माझी आई
...................ऐरणीपरी आई!

तरू नोहे पाहे,जात पात धर्म
फूले फळे छाया देई,तशी माझी आई
.....................तरूपरी आई!

घारीची भरारी, नभी चार्‍यासाठी
लक्ष पिलांपाठी, तशी माझी आई
....................घारीपरी आई!

शशी तापे गगनी,रवि किरणाने
धरे देई शितलता,तशी माझी आई
....................शशीपरी आई!

टाकिच्या घावे,देवपण येई
देवाहुनही थोर्,आहे माझी आई
................आहे माझी आई!!

गुलमोहर: 

छान आहे !

छान कविता. )

पीडा सुमनाला, सुंड भ्रमराची
परी मधू घास देई, तशी माझी आई
.......................फुलापरी आई !

फूल आणि भ्रमर या उपमा आतापर्यंत प्रेयसी आणि प्रियकर यासाठीच वापरल्या गेल्या आहेत.
त्यामुळे आई आणि लेकरू यासाठी ही उपमा वाचकांना कितपत रुचेल हे सांगणे कठीण आहे.

<< टाकिच्या घावे,देवपण येई
देवाहुनही थोर्,आहे माझी आई
.................होती माझी आई!! >>
फार सुंदर, सर्व मातांच्या चरणी दंडवत.

टाकिच्या घावे,देवपण येई
देवाहुनही थोर्,आहे माझी आई
.................होती माझी आई!! >>>

आईचे सार्थ वर्णन !

टाकिच्या घावे,देवपण येई
देवाहुनही थोर्,आहे माझी आई
.................होती माझी आई

कविता खूप आवडली .

देसले साहेब
गोजिरीजी...धन्यवाद.

टाकिच्या घावे,देवपण येई
देवाहुनही थोर्,आहे माझी आई
.................होती माझी आई!!
फार सुंदर.

अरे कालपरवाच वाचली कविता. एकदम भावूक झालो भाऊ. आईची महती काय सांगावी. तुमचे शब्द साकार झाले.

Pages