नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.
आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो. वेळ होताच त्यामुळे पहिल्यांदा न्युयॉर्क शहर बघायला घेतले. क्विन्स डोमेस्टीक ऐअर पोर्टवर आमची सामानाची बॅग सापडत नव्हती. म्हणून आम्ही तेथील काउंटरवर उभे असतांना एक मुलगी आमचे नाव पुकारत आली. तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत. येथे येण्याच्या आधी ते भारतात बंगळूरू येथे कामाला होते. मुलगीही तेथेच कामाला होती. तेथेच त्यांनी एकमेकांचे लग्न जुळवले. असो.
तर थोडक्यात आमचे सामान आम्हाला परत विनासायास मिळाले. आम्ही न्युयॉर्क शहर भटकण्यासाठी काही ठिकाणी टॅक्सी केली तर बर्याचदा शहर बससेवा वापरली. शहरबसमधले (City Bus) दरवाजे ड्रायव्हर अॅटोमॅटीक पद्धतीने उघडतो. येथे तिकीट आधीच काढावे लागते. पुण्यातल्या सिटीबससारखे येथे कंडक्टर नसतात. बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो.
M9 या क्रमांकाच्या बसने आम्ही ब्रॉडवे येथे फिरत होते. तेथे एका स्टॉपवर आम्ही उतरून पायी पायी उंच इमारती पाहत चाललो असतांना समोरून एक माणसांचा घोळका येत होता. त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. हातात तिरंगी ध्वज आणि बॅनर्स होते. आमच्या जावयांना तो ध्वज भारताचा वाटला. त्यांनी तसे मला बोलून दाखवले. आमचे 'हे' म्हणाले की कदाचीत तो नायजर या देशाचा ध्वज असावा. (पण नंतर तो भारताचाच ध्वज होता हे समजले. आमच्या जावयांना दुरूनही ध्वज ओळखता आला त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटला. असो.) तो जमाव जवळ आला तर त्यांच्या गांधी टोप्यांवर 'मी आण्णा आहे' असे लिहीलेले होते. म्हणजे ते इंग्रजीत "I am Aana" असेच होते पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले. त्यातील बरेचसे चेहेरे भारतीय होते. आमच्या जावयांनी त्यातील लोकांकडे चौकशी केली. त्यातून समजले की भारतात त्यावेळी आण्णा हजारेंचे दिल्लीत भ्रष्टाचार, लोकपाल याबाबत उपोषण चालू आहे व येथील भारतीय लोकांनी त्याला पाठींबा म्हणून हा मोर्चा काढला होता. हळूहळू तो मोर्चा पुढे निघून गेला. मलाही त्या मोर्चात जावेसे वाटले पण आम्हाला शहर बघायचे असल्याने तो मोह टाळला.
तो मोर्चा पुढे निघून गेल्यानंतर तेथे एक छोटा ध्वज खाली पडलेला दिसला. तेव्हड्यात आमच्या शेजारी मोर्चा बघत उभा असलेला एक गोरापान अमेरिकन युवक तेथे गेला अन त्याने तो ध्वज उचलला. त्यानंतर तो ध्वज त्याने माझ्या हातात दिला. त्याने मी भारतीय आहे हे माझ्या नेसलेल्या साडीवरून ओळखले असावे असा माझा अंदाज आहे. आम्ही तो ध्वज हातात घेतला व नंतर तो व्यवस्थित घडी घालून आमच्या बॅगेत ठेवला.
एका अमेरिकन युवकाने दुसर्या देशाच्या ध्वजालादेखील योग्य सन्मान दिल्याचे पाहून मला त्याचा अभिमान वाटला.
नंतर आम्ही बरीच अमेरीका पाहिली. त्यांच्यावरचे लेख नंतर कधीतरी.
मी_चिऊ हे घ्या, इथे वाचा :
मी_चिऊ हे घ्या, इथे वाचा : http://72.78.249.107/esakal/20110803/5644522081247510845.htm
एकदम कळस आहेत प्रतिक्रिया
हा लेख आणी किल्लेदारांची प्रतिक्रिया महान
ह्या लेखाच्या प्र. बघा..
ह्या लेखाच्या प्र. बघा..

मस्त आहेत एक्-एक..
http://72.78.249.107/esakal/20100104/5717214080439619228.htm
@ avani१४०५ तुमचे खूप खूप
@ avani१४०५ तुमचे खूप खूप धन्यवाद.. किती हसलो आत्ता..वा वा थ्यांकू हं.. जबराट.. इथे सुद्धा सार्देना आहेच
लेख, किल्लेदारांची
लेख, किल्लेदारांची प्रतिक्रिया आणि इतर सगळ्याच प्रतिक्रिया
अगागाआआआआ ! सकाळपासुन नविन
अगागाआआआआ !
सकाळपासुन नविन लेखन मधे हा लेख खुणावत होता.. प्रतिक्रियांचा वेग पाहुन लोळण होईल वाटतच होते. म्हनून ऑफिस टाईम मधे नाही वाचला.. पण ल्केहाबरोबर प्रतिक्रीयाही
लेख प्रतिक्रिया
लेख

प्रतिक्रिया
किल्लेदारांचा प्रतिसाद धमाल
किल्लेदारांचा प्रतिसाद धमाल आहे. बाकी प्रतिसाद सुद्धा
काही लोकं नायजर च्या ऐवजी
काही लोकं नायजर च्या ऐवजी नाइजर म्हणतात हाच काय तो फरक. (बहूदा ते हिंदी भाषी असतात) >>
अस अजिबातच नाही. हिंदीत या देशाला नाइगर असेही म्हणतातच. हा घ्या माझाही पुरावा
http://www.omegawiki.org/DefinedMeaning:Niger_(8372)
(आता तिथे मराठी मधे नायजर म्हणतात दिलय पण बहुदा ही चुकीची माहिती तुम्हीच त्या वेबसाईटला दिली असावी.) तसे नायगर देशात फ्रेन्च लोकांचे राज्य अनेक वर्षे असल्याने खुद्द त्या देशातले लोक उच्चार "निझेर" असा करतात, तेव्हा तोच ग्राह्य धरायला हवा.
बाई बाई तेथल्या उन्हाळ्याचे काय सांगू? नुसता घाम निघत असे सारखा. >> कुठल्याही फडतूस गोष्टींचे वर्णन करायची बाकी तुम्हाला सवयच दिसतेय. इथे मुंबईत उन्हाळा नसतांना सुद्धा घाम फुटतो दिवस रात्र! तेव्हा निझेरच्या उन्हाळ्याचे ऐकण्यात कुणाला आलय स्वारस्य.
बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो. >>
अरेरे म्हणजे बस मधे ओकून बाकीच्या सहप्रवाश्यांना वात आणलेला दिसतोय.
I am Aana >> Anna असे स्पेलींग हवे ते. इन्ग्लिश येत नाही तरी उगाच लिहायचा सोस पहा.
अरे इसकाळच्या लिंक्समध्ये तो
अरे इसकाळच्या लिंक्समध्ये तो ताम्हीणी घाट आणि टेनिस बॉल ब्रेकखाली अडकतो ती लिंक नाही दिली का...तो लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया केवळ अशक्य आहेत.
Anna असे स्पेलींग हवे ते <<<<
Anna असे स्पेलींग हवे ते <<<< ते स्पेलिंग एका अॅना, किंवा अॅन म्हणून उच्चारले जाते, मुलीचे नांव आहे.. तेव्हा गैरसमज नको म्हणुन Aana केले असणार..
हिंदी चित्रपटांची इंग्रजीत नावं लिहीताना 'मन' आणि Man मधे फरक दाखवण्यासाठी करतात तसे..
अरे इसकाळच्या लिंक्समध्ये तो
अरे इसकाळच्या लिंक्समध्ये तो ताम्हीणी घाट आणि टेनिस बॉल ब्रेकखाली अडकतो ती लिंक नाही दिली का...तो लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया केवळ अशक्य आहेत. >>>

हो हो ब्रेकखाली फणस आला होता.. अशी कहिशी प्र. भारी होति..
आणी १ लाडू कावळा असा ही लेख होता..
अरे इसकाळच्या लिंक्समध्ये तो
अरे इसकाळच्या लिंक्समध्ये तो ताम्हीणी घाट आणि टेनिस बॉल ब्रेकखाली अडकतो ती लिंक नाही दिली का...तो लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया केवळ अशक्य आहेत. >>>
हो हो ब्रेकखाली फणस आला होता.. अशी कहिशी प्र. भारी होति<<<
आठवलं.. भारी होतं ते.
Anna असे स्पेलींग हवे ते
Anna असे स्पेलींग हवे ते <<<<
एखाद्या न्यूमरॉलॉजिस्ट ने हे नवे स्पेलिंग वापरले तर लोकपाल लवकर पास होईल असे सांगितले असेल.
पाषाण भेदी काकू. आपण
पाषाण भेदी काकू. आपण अमेरिकेतला पुढचा लेख कधी लिहिणार?.
मी पण गेली चाळीस वर्ष इस्राईलला असते. माझ्या कडे पण सांगण्यासारख्या गोड गोड आठवणी खूप आहेत
हे आपले माझे मत .
काकू तुमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न का खाल्ले?. तुमच्या दशम्या खायला त्यांना लाज वाटते की काय?
तुम्ही मात्र न लाजता विमानात दशम्या खाल्यात या बदल मला तुमचा अभिमान वाटतो.
(ओरिजिनल) मिसेस सासोन्कर यार्देना इस्राईल .मी ओरीजनल आहे.:)
(No subject)
मि माझ्या प्र. अशा देत जैन
मि माझ्या प्र. अशा देत जैन आता ::: (ओरिजिनल) मिसेस सासोन्कर यार्देना इस्राईल (ओरिजिनल)
खर तर अशी आपण कोणाची खिल्ली
खर तर अशी आपण कोणाची खिल्ली उडवू नये.
पण त्या बाईच्या प्रतिक्रिया इतक्या खतरा असतात कि राहवत नाही
अवनी
अवनी
पाषाणभेद,
पाषाणभेद, किल्लेदार.......हसून हसून पुरेवाट झाली.......
निर्मलाबाय अंजनी बापू मु.पो.
निर्मलाबाय अंजनी बापू मु.पो. मॉरिशियस यांना पण मायबोलीवर यायचंय.
त्यांच्या चार पिढ्या तिथेच स्थायिक झाल्यात. पण अजूनी मराठी बोलतात.
ही घ्या तो इसकाळमधला प्रसिद्ध
ही घ्या तो इसकाळमधला प्रसिद्ध लेख आणि त्यावरच्या अतिअफाट प्रतिक्रीया
http://72.78.249.107/esakal/20100719/4711632484305432417.htm
बाई बाई तेथल्या उन्हाळ्याचे
बाई बाई तेथल्या उन्हाळ्याचे काय सांगू? नुसता घाम निघत असे सारखा. >> आणी आमच्या इथल्या उन्हाळ्यात काय सरबतं निघतात का ? कोणाला कशाचे काय नि कशाचे काय ?
मिसेस सासोन्कर यार्देना इस्राईल >
(No subject)
अग आई गं .. हा लेख आणि त्या
अग आई गं ..

हा लेख आणि त्या वरची किल्लेदार यांची प्रतिक्रिया म्हणजे लाफिंग टॉनिक च आहे..
विनोदी लेखन विभागात हवा
आशुचँप, ही घ्या तो इसकाळमधला
आशुचँप,
ही घ्या तो इसकाळमधला प्रसिद्ध लेख आणि त्यावरच्या अतिअफाट प्रतिक्रीया >>
हो आठवतो तो लेख. खुपच अफट प्रतिक्रिया आहेत. तश्या प्रतिक्रिया नंतर नाही मिळाल्या कधी.
याच पाषाणभेद काकूंनी गेल्या
याच पाषाणभेद काकूंनी गेल्या महिन्याच्या मुक्तपीठात त्यांची मुलगी (काकूंच्या) जावयासह तीन वर्षांपूर्वी भारतभेटीला आली तेव्हा तिची व यांच्या जावयाची दातांची रूट कॅनॉल ट्रीटमेंट करताना डॉलरांच्या लोभाने डॉक्टराने वाटेल तशी ट्रीटमेंट लांबवत अखेर दोघांचे सगळेच्यासगळे दात कसे उपटून टाकले व त्यांना कवळ्या कशा बसवाव्या लागल्या, याबद्दल (पकाऊ) लेख लिहिला होता. नातवाचेही अजून बोळकेच असेल. मग घरात इलेक्ट्रॉनिक टूथब्रश काय प्रदर्शनात ठेवला आहे काय? आमच्याकडे डॉलर आहेत ते आम्ही कसे बिनकामाच्या गोष्टींवर उधळतो, हे दाखवायचा एक केविलवाणा प्रयत्न. अहो काकू, इलेक्ट्रॉनिक टूथब्रशपेक्षा महत्त्वाची गोष्ट दात आहेत, हे तुम्हांला कळत नाही का? आणि त्यांना (दातांना) कडुलिंबाची काडीही चालते.
आणि हो, स्वैंपाक करायला शिका. तुम्ही केलेल्या दशम्या तुमचा नवराही खात नाही, हे अभिमानाने लिहिताय वर. बसमध्ये ड्रायव्हरला पिशवी मागावी लागली म्हणजे सकाळी नाश्त्याला तुम्ही केलेल्या दशम्या होत्या की काय?
- एक परखड
श्रद्धा खरच मुक्तपीठ वाचत
श्रद्धा
खरच मुक्तपीठ वाचत आहे असच वाटतय..
(No subject)
त्या टेनीस बॉल च्या
त्या टेनीस बॉल च्या लेखासाठीची १ कहर प्रतिक्रीया..
>>बाप रे !! केव्ह्ढ्या भयंकर संकटातून वाचलात आपण. वाचूनच अंगावर शहारे आले. माझ्यावर पण असाच प्रसंग गुदरला होता . झाले काय कि मी घाट उतरत होतो आणि अचानक मला जाणवले कि ड्रायव्हिंग करताना माझ्या डाव्या हातावर माशी बसली आहे. आता माशीला हाकलावे तर steering सोडावे लागले असते. आणि हात सोडवा तर गाडी खाली दरीत गेली असती न !! मोठी द्विधा मनस्थिती झाली हो !! पाच सेकंदानी माशी उडून गेली पण ते पाच सेकंद म्हणजे पाच युगान्सारखे वाटले मला. मी मुक्तपीठमध्ये माझा अनुभव देणार आहे छापायला.
त्या चेन्डूच्या लेखावरील
त्या चेन्डूच्या लेखावरील प्रतिक्रिया वाचून लोकान्ची कीव आली. माणूस सान्गु काय पहातो अन हे त्याला कुठे टान्गू पहातात!
मी फियाट गाडी चालवित असताना, सीटच्या उजवीकडे खोचून ठेवलेली पाण्याची बाटली घरन्गळत जाऊन ब्रेक खाली अडकली असता ऐन वेळेस ब्रेक मारायचे वेळेस लक्षात आल्यावर कशी पाचावर धारण बसली होती व एकीकडे रस्त्यावर नजर ठेवुन अडथळे चुकवित गाडि कन्ट्रोल करीत असतानाच शेजारी बसलेल्या लिम्बीला शब्दशः बोम्बलुन जागे करवुन एका हाताने खुणा करत पायापाशीच्या ब्रेकचे पेडल खालील बाटली काढणेस सान्गणे व ते सान्गतानाच गाडी बाजुला कशी कुठे घ्यावी याचा वेगनियन्त्रण करत करत अन्दाज घेणे चालू असे ते शब्दशः थरारक "क्षण" अनुभवलेले असल्याने मला त्या लेखात खिल्ली उडविण्यासारखे वा चिरफाड करण्यासारखे काहीच वाटले नाही.
ज्यान्ना वाटते त्यान्ना "स्वतः अनुभवाने शहाणे होण्याचीच" हौस जास्त असणार हे नक्की! तर तथास्तू.
पण असो.
हल्लीच्या नविन गाड्यान्ना बहुधा ब्रेक वगैरे पेडल वरुन टान्गुन लटकवलेली/बसवलेली असतात, तर पूर्वीच्या गाड्यान्ना ती समोर खालिल बाजुस घुसणारी अशी असत, त्यामुळे जुन्या गाड्यान्ना तो धोका जास्त होता असे माझे मत.
Pages