नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.
आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो. वेळ होताच त्यामुळे पहिल्यांदा न्युयॉर्क शहर बघायला घेतले. क्विन्स डोमेस्टीक ऐअर पोर्टवर आमची सामानाची बॅग सापडत नव्हती. म्हणून आम्ही तेथील काउंटरवर उभे असतांना एक मुलगी आमचे नाव पुकारत आली. तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत. येथे येण्याच्या आधी ते भारतात बंगळूरू येथे कामाला होते. मुलगीही तेथेच कामाला होती. तेथेच त्यांनी एकमेकांचे लग्न जुळवले. असो.
तर थोडक्यात आमचे सामान आम्हाला परत विनासायास मिळाले. आम्ही न्युयॉर्क शहर भटकण्यासाठी काही ठिकाणी टॅक्सी केली तर बर्याचदा शहर बससेवा वापरली. शहरबसमधले (City Bus) दरवाजे ड्रायव्हर अॅटोमॅटीक पद्धतीने उघडतो. येथे तिकीट आधीच काढावे लागते. पुण्यातल्या सिटीबससारखे येथे कंडक्टर नसतात. बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो.
M9 या क्रमांकाच्या बसने आम्ही ब्रॉडवे येथे फिरत होते. तेथे एका स्टॉपवर आम्ही उतरून पायी पायी उंच इमारती पाहत चाललो असतांना समोरून एक माणसांचा घोळका येत होता. त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. हातात तिरंगी ध्वज आणि बॅनर्स होते. आमच्या जावयांना तो ध्वज भारताचा वाटला. त्यांनी तसे मला बोलून दाखवले. आमचे 'हे' म्हणाले की कदाचीत तो नायजर या देशाचा ध्वज असावा. (पण नंतर तो भारताचाच ध्वज होता हे समजले. आमच्या जावयांना दुरूनही ध्वज ओळखता आला त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटला. असो.) तो जमाव जवळ आला तर त्यांच्या गांधी टोप्यांवर 'मी आण्णा आहे' असे लिहीलेले होते. म्हणजे ते इंग्रजीत "I am Aana" असेच होते पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले. त्यातील बरेचसे चेहेरे भारतीय होते. आमच्या जावयांनी त्यातील लोकांकडे चौकशी केली. त्यातून समजले की भारतात त्यावेळी आण्णा हजारेंचे दिल्लीत भ्रष्टाचार, लोकपाल याबाबत उपोषण चालू आहे व येथील भारतीय लोकांनी त्याला पाठींबा म्हणून हा मोर्चा काढला होता. हळूहळू तो मोर्चा पुढे निघून गेला. मलाही त्या मोर्चात जावेसे वाटले पण आम्हाला शहर बघायचे असल्याने तो मोह टाळला.
तो मोर्चा पुढे निघून गेल्यानंतर तेथे एक छोटा ध्वज खाली पडलेला दिसला. तेव्हड्यात आमच्या शेजारी मोर्चा बघत उभा असलेला एक गोरापान अमेरिकन युवक तेथे गेला अन त्याने तो ध्वज उचलला. त्यानंतर तो ध्वज त्याने माझ्या हातात दिला. त्याने मी भारतीय आहे हे माझ्या नेसलेल्या साडीवरून ओळखले असावे असा माझा अंदाज आहे. आम्ही तो ध्वज हातात घेतला व नंतर तो व्यवस्थित घडी घालून आमच्या बॅगेत ठेवला.
एका अमेरिकन युवकाने दुसर्या देशाच्या ध्वजालादेखील योग्य सन्मान दिल्याचे पाहून मला त्याचा अभिमान वाटला.
नंतर आम्ही बरीच अमेरीका पाहिली. त्यांच्यावरचे लेख नंतर कधीतरी.
पाषाणभेद म्हण्जे नक्की कोण ,
पाषाणभेद म्हण्जे नक्की कोण , बाई का बुवा ... ?
>>> अहो ब्रिटनमधले मुळ
>>> अहो ब्रिटनमधले मुळ लोकदेखील प्रमाणबद्ध इंग्रजी बोलत नाहीत.
पटत नसेल तर विचारा झक्कीन्ना 
अगदी अगदी, म्हणून तर तेच काय, बारामधले लोक देखिल नाकेमुरडत का होईना, पण पुन्हा आपले इन्ग्रजी उच्चारण सुधरवायला त्या "विशिष्ट शहरातील विशिष्ट पेठान्मधे" येतात
अन "ग" नै, "ज"च हवा, नैतर जावई चे गावई करतील ही लोकं, काय सान्गाव!
सॉल्लिड जमलाय एकदम.
सॉल्लिड जमलाय एकदम. प्रतिक्रिया पण एकदम भारी.
तुमची गोष्ट ऐकून डोळ्यांत
तुमची गोष्ट ऐकून डोळ्यांत पाणी आले. असेच लिहीत राहा..
आजच वाचलं हे. लेख आणि
आजच वाचलं हे. लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही भारी.
(No subject)
(No subject)
(No subject)
लेख आणि किल्लेदारांचा
लेख आणि किल्लेदारांचा प्रतिसाद दोन्ही कहर आहे
>>आणि तुमचे केमन आयलंडमधे बॅंकेत खाते असेल तर विमानाची डिलिव्हरी तिकडे घ्यायची, म्हणजे टॅक्सपण वाचतो. मला ही आयडीया फार फार आवडली.>>
ठार!
आम्ही अमेरिकेच्या प्रवासाला
आम्ही अमेरिकेच्या प्रवासाला जाताना नेहमी कॅंपातल्या मॅकडोनाल्डमधून बर्गर बांधून घेतो. तिथल्या मॅनेजरला "Want to carry to US" असे वेगळे इंग्रजीत सांगितले की तो बरोबर सगळी तयारी करून देतो. तिथे उपासाचे वेगळे बर्गरपण मिळतात. जंगली महाराजवरच्या मॅकडोनाल्डमधल्या गावंढळ माणसांना "अमेरिकेला विमानातून बर्गर न्यायचे आहे" वगैरे काही कळत नाही. तिथे फक्त पुण्यातल्या पुण्यात खायचे बर्गर घ्यावेत.>>
खल्लास...
(No subject)
पाभे काकू लय भारी लिवलय..
पाभे काकू लय भारी लिवलय.. कित्ती हुश्शार जावई तुमचे..आणि नजर सुद्धा किती तिक्ष्ण.. तिथल्या गोर्यांचे इंग्रजी त्यांना समजते??? किती भारी... लक्की यु आणि युअर डॉटर हां ..काकू अजुन लेख पाडा की नायगरा, तिथली स्वच्छता, तिथले इंग्रजी, ई. वरती.
किल्लेदार काका तुमचा प्रतिसाद सुद्धा आवडला बरका विशेषतः तुमचे ते बर्गरचे observation..किती उपयुक्त सुचना आहेत आणि.. काकू आणि काका इथे काही लोक तुम्हाला, तुम्च्या जावयाला/मुलाना लय श्या देतील पण ignore them त्याना कधी सदाशिव पेठे बाहेर जाता आले नाही म्हणून बोटे मोडत आहेत..
लेख तर मस्तचे पण कसल्या भारी
लेख तर मस्तचे पण कसल्या भारी प्रतिक्रिया आहेत!!

किल्लेदार अमेझिंग पोस्ट!
किल्लेदारांचा प्रतिसाद कहर
किल्लेदारांचा प्रतिसाद कहर आहे !
अगागा...
अगागा...
दगडफोड्या आणि किल्लेदार सही.
दगडफोड्या आणि किल्लेदार सही. अफाट लिहिले आहे दोघांनीही.
काही निवडक प्रतिक्रिया
----------------------
किल्लेदार पुण्याचे दिसतात, हया पुणेकरांना पुणे सोडून इतर भागात लोक राहतात हे माहित नाही. जिकडे तिकडे पुणे, पुणे. आता अमेरिकेतही घाण करायला निघाले हे पुणेकर.
----------------------
जावयाच्या पैशावर अमेरिकेला गेलात, चांगलं आहे. पोराने नेले नसते कारण सुनबाईशी पटत नसावे.
----------------------
अमेरिकेतही साडीच का? काय मागासलेले लोकं आहेत हे, ह्यांच्यामुळे भारतीय स्त्रीयांना अजूनही मान नाही.
----------------------
आल्या स्त्री स्वातंत्र्यवादाचे झेंडे घेऊन ह्या बायका.
----------------------
ओ बायांना निट बोला, फुकटात काही पण.
----------------------
अहो नेट फुकटात नाही, पैसे भरतो मोजून
----------------------
अहो पैसे मोजूनच भरतात, येडंच दिसतंय बेणं.
----------------------
अरे लेख काय, तुम्ही काय लिहितात. त्या तिकडं जावयाच्या पैशाने मजा करत आहेत. तुम्ही बसलात भांडत. मराठी बाणा दुसरे काय?
फालतू लिखाण आहे. जरा काही तरी
फालतू लिखाण आहे. जरा काही तरी अर्थपूर्ण लिहा. ..

सकाळ वाले कहिहि छापतात हल्लि...
--चिमणराव
काकु, मला तुमचा लेख फारच
काकु, मला तुमचा लेख फारच आवडला . कुजकट प्रतिक्रियांकडे लक्ष देऊ नका.
त्यांना जायला मिळत नाहीत न अमेरिकेत म्हणून ते जळतात.कोल्ह्याला द्राक्षे आंबट
आणखीन तुमचे अनुभव सांगा हो .
(No subject)
काकु , खूप छान लेख.ध्वजाचा
काकु , खूप छान लेख.ध्वजाचा आदर केलाच पाहिजे हे माझे मत आहे.
आम्ही इस्राईल मध्ये दशम्या खातो.(विमानात बसून नव्हे, घरातच).
-- मिसेस सासोनकर यार्देना इस्राईल
आणी दशम्याना लागणारे धान्य
आणी दशम्याना लागणारे धान्य आम्ही स्वतः च्या शेतातले वापरतो.
--- -- मिसेस सासोनकर यार्देना इस्राईल (ओरिजिनल)
मिसेस सासोनकर यार्देना
मिसेस सासोनकर यार्देना इस्राईल >>
हा काय प्रकार आहे? या बाई अशा प्रतिक्रिया लिहीत असतात का?
हो हो रैना. जवळपास सर्व
हो हो रैना. जवळपास सर्व लेखांवर या प्र. असतात अन ओरिजिनल अस सुध्दा.. :हहपुवा:
हो ना.. अशाच काहीही वाट्टेल
हो ना..
अशाच काहीही वाट्टेल तशा प्रतिक्रिया लिहीत असतात
हायला अनघा/ अवनी- धन्यवाद.
हायला
अनघा/ अवनी- धन्यवाद.
हा मुक्तपीठ लेख वाचा -
हा मुक्तपीठ लेख वाचा - प्रतिक्रिया कळस आहेत .ह्ह्पुवा.
http://72.78.249.107/esakal/20110810/5111950265008191144.htm
(No subject)
http://72.78.249.107/esakal/2
http://72.78.249.107/esakal/20110627/4818305253354627226.htm
हाही लेख आणि प्रतिक्रिया पहा.. सगळच विसंगत
@ शमा, @मी_चिऊ अरे तुम्ही
@ शमा, @मी_चिऊ अरे तुम्ही मेजर दहातोंडे ह्यांचे अमेरिकापुराण नाही का वाचत (पैलतीरमधे)? लय झ्याक असतय.. त्यावर अशा काही प्रतिक्रिया असतात ना... फक्त लेख ताजा ताजा वाचावा कारण सकाळ बर्याच प्रतिक्रीया उडवते नंतर..
@ लंपन - नाही वाचले अजुन..
@ लंपन - नाही वाचले अजुन.. मिळाल्यास नक्की वाचेन..
Pages