हितगुज बखर

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

रविवार, ऑगस्ट १६, १९९८ :
हितगुज चा जन्म !

हितगुजवरचं पहिलं अधिकृत पोस्ट
http://www.maayboli.com/hitguj/messages/1/82575.html?1112721762
हे होतं पोस्ट # १७. पहिली १६ "टेस्ट" पोस्ट्स काळाच्या ओघात वाहुन गेली ! हितगुजची सुरूवात ५ विषयांनी झाली.
हितगुजवर तुमचं स्वागत (Welcome to Hitguj)
माझ्या गावात (My City)
संस्कृती (Culture)
मदत हवी आहे? (Looking for?)
तंत्रज्ञान (technology)

ऑगस्ट ??, १९९८ :
sandeep (संदीप पांडव) हितगुजचा पहिला सभासद.
sunder35 (सुंदर हत्तंगडी) दुसरा आणि
dattaguru (दत्तगुरु महाबळ) हितगुज चा तिसरा सभासद.

ऑगस्ट १७, १९९८ :
"technology" मधे S.G. कुलकर्णींचा पहिलं पोस्ट
http://www.maayboli.com/hitguj/messages/338/1440.html?920807301

ऑगस्ट २१,१९९८:
"Culture" मधे रवी गोडबोलेंच पहिलं पोस्ट

ऑगस्ट २९, १९९८:
"Views and comments" मधे पल्लवी दातार चे पहिले पोस्ट

"My City" आर्काईव्ह होत नाही म्हणुन पहिलं पोस्ट उपलब्ध नाही.

"Looking for" पण सुरूवातीला आर्काईव्ह होत नव्हतं म्हणुन त्याचंही पहिलं पोस्ट उपलब्ध नाही.

सप्टेम्बर ९,१९९८, ११:२९ pm:
"गुलमोहर" ची सुरुवात. (Admin ला काळजी कोणी काहीच लिहीलं नाही तर काय करणार? backup plan स्वत:च्या कविता ?
मायबोलीकरांच्या सुदैवाने backup plan वापरावा लागला नाही.)

गुरुवार, सप्टेम्बर १०, १९९८ - ०७:३८ am:
गुलमोहर वरती पहिलं पोस्ट (कवीता), किरण पाटील.

डिसेम्बर २८, १९९८:
कार्ट्याने (kaarta) "सोबती" चे पहिले प्रकरण हितगुजवर लिहिले.
ईंटरनेटवर प्रसीद्ध झालेली मराठीतली पहिली कादंबरी.

जानेवारी १९९९:
हितगुजकरांची पहिली प्रत्यक्ष भेट, पुण्यामधे.
(मंडळी कोण कोण भेटले हे please सांगाल का? -Admin)

एप्रील १, १९९९:
"My Experience" ची सुरूवात. Milya (मिलींद छत्रे) चं पहिलं पोस्ट
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/646.html?958684913

ऑगस्ट १९९९:
किरण भावे (kiran) आणि अमृता जोशी (amruta) यांची हितगुजवर भेट ज़ाली आणि लग्न ठरले. हितगुजवरचे पहिले लग्न !

१६ ऑगस्ट १९९९:
हितगुज : वय वर्षे १

सप्टेम्बर १९९९:
नवीन मेम्बरांचे स्वागत करण्यासाठी अधीकृत स्वागत समिति कार्यान्वीत झाली. ह्या स्वागत समिति मधे समर्‍या, मिल्या आणि svsameer ह्यानी काम केले.

मे १०, २०००:
हितगुजवरची पोस्ट संख्या १०,०००. ("आर्काईव न झालेले" पोस्ट मोजले तर हा आकड पुर्वीच होऊन गेला. )
मंदार कुलकर्णी (Mandarmk) ने बखर लिहीण्याबद्दल सुचवले

सप्टेम्बर २०००:
हितगुजकरानी उत्स्फ़ुर्तपणे e-गणेशोत्सव साजरा केला.

क्रमशः

विषय: 
प्रकार: 

ग्रेट....... आम्ही कित्ती मिसलं उशिरा येऊन्.......

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

खरच मस्त माहीती Happy
'खरेदी' वर टाईम मशीन मिळेल का हो ८-१० वर्ष मागे जायला Proud

माझा पूर्वी हित्गुज वर गजानन १ हा आय डी होता.... तो इथे कसा उघडायचा?

...............................................................................सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
अहं त्वाम सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा श्रुचः ||