साहित्य, वाङ्मय...

Submitted by पुरंदरे शशांक on 22 August, 2011 - 13:09

साहित्य, वाङ्मय...

एकाने मारली आडवी रेघ
टांगले त्यावर अ, ब, क, ड सुरेख

कोणीतरी म्हटले हे तर शब्द
शब्दामागून शब्द हे तर वाक्य

कोणी त्या संवाद म्हणे तर कोणी गद्य
नाट्य दिसे कोणा तर कोणा वाटे पद्य

भावभावनांचा कधी कल्लोळ
कधी शब्दांचेच लोळामागून लोळ

नामकरण केले त्याचे साजेसे
साहित्य, वाङ्मय असेच काहीसे....