थरांचा थरार

Submitted by अपूर्व on 22 August, 2011 - 03:34

दहीहंडी हा खरं तर श्रीकृष्णाच्या बाललीलांमधून जन्मलेला खेळ. त्याचा आता ‘स्पोर्ट’ झालाय ‘स्पोर्ट’. त्यात संस्कृती किती उरलीय हा वादाचा मुद्दा झाला, पण त्याचं स्वरूप फार (जरा जास्तच) मोठं झालंय. बक्षीसांच्या रकमांमधे शून्यावर शून्य चढवली जातायत. (गोविंदांच्या हातात किती पैसे येतात हा एक वेगळाच प्रश्न आहे.) वर्गणी चं स्वरूप वर्गणी सारखं कमी आणि खंडणी सारखं अधिक वाटायला लागलंय. स्पॉन्सर्स चे बॅनर आणि डीजेंचे स्पीकर दोन्ही वर्षागणिक मोठे होतायत. यातले गोविंदा मात्र मनो-यासरशी वर जातात आणि मनो-यागत खाली येतात.

या प्रकारात त्यांना कुठला आनंद मिळतो ते मला ठाऊक नाही पण ते जीव धोक्यात घालतात एवढं दिसतं. ८ थर.... ९ थर..... १० थर.....; थरांची संख्या वाढत जाते. आयोजक याला ’थरार’ असं म्हणतात. बघणा-यांचा हे बघूनच थरकाप होतो. आणि प्रत्यक्ष गोविंदा मात्र थरा थराला थरथरतात.

एकूणच सगळं कुठल्या थराला नेलंय... काय रे बाबा!

गुलमोहर: 

गल्लोगल्लीतल्या भाऊ/दादांना राजकारण करायला आयता सण झालाय हा! मागच्या वर्षी किशोर कांबळे हा तरूण (आई-वडीलांचा एकुलता) मरण पावला त्यावेळला त्या दहीहंडीचे प्रायोजकांनी सरळ हात झटकले. कित्येक तरूण अपघातात जायबंदी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. भर डेक्कनवर सगळा जं मा रस्ता वेठीला धरून काय मिळवतात ही मंडळी?