राखेमधे लोळतो मी - हजल (तरही)

Submitted by अभय आर्वीकर on 21 August, 2011 - 03:06

राखेमधे लोळतो मी (हजल)

मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                         गंगाधर मुटे
-------------------------------------
(तर ही हजल)

गुलमोहर: 

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

Biggrin

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी >>>> हा शेर तर अर्थपुर्ण आहे... Wink

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी! >>> हा Biggrin

मस्तच!! Rofl

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी>>>

इथे पेंगतो ऐवजी घोरतो केले तर इफेक्ट अजून मस्त येईल....

मुटेजी,
भन्नाट जमलीय हजल.

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी>>>१०० टक्के हजलिश. जियो यार!

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. Happy

(पेंगतो ऐवजी घोरतो - होय. थोडा फेरबदल केला तर तो शेर अधिक भन्नाट होऊ शकेल. प्रयत्न करतो.)

व्वा!:)