जगावेगळे मागणे मागतो मी.. (तरही)

Submitted by बागेश्री on 19 August, 2011 - 05:55

डॉक्टर सर, तरहीत माझा पण सहभाग! आनंदयात्रींचे चे पुन्हा आभार Happy
____________________________________

ललाटी तुझ्या या, मला रेखतो मी!
जगावेगळे मागणे मागतो मी

नशीबा उसासू नको व्यर्थ आता,
असे काय उरले, कुणा राखतो मी?

ठरवले जगाने मला ठार वेडा,
न असण्यात- असणे, तुझे मानतो मी..!

जगाला नको मी, असू दे तसेही!
कसे सत्य पचवू, तुला बाधतो मी?

सरी पावसाच्या, तुफानी बरसती
तरी कोरडा का, असा राहतो मी?

जिथे मी तिथे तू, कसे हे कळेना?
भ्रमी बघ अताशा, सुखे नांदतो मी

उमटशी कशी तू, चिटोर्‍यात माझ्या?
गझल तू खरी, फक्त रेखाटतो मी....!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.:)

>>जिथे मी तिथे तू, कसे हे कळेना?
भ्रमी बघ अताशा, सुखे नांदतो मी

सुंदर......खूप आवडली Happy

ठरवले जगाने मला ठार वेडा,
न असण्यात- असणे, तुझे मानतो मी..!...व्वा

सरी पावसाच्या, तुफानी बरसती
तरी कोरडा का, असा राहतो मी?....सुरेख.

गझल तू खरी, फक्त रेखाटतो मी.... वा वा ..

व्वा छान झालीये गझल.

मस्तः)

ठरवले जगाने मला ठार वेडा,
न असण्यात- असणे, तुझे मानतो मी..!

जगाला नको मी, असू दे तसेही!
कसे सत्य पचवू, तुला बाधतो मी?
हे आवडले..

सुटे मिसरे छान आले आहेत...
Happy

छान

बेफिजी, कणखरजी, नचिकेत, डॉकाका, अरविंदजी,मुक्ता,क्रांतिजी, मुटेजी- मनापासून आभार.... Happy

स्मितु, मंदार, किश्या, हर्षदा- गझलेचा आस्वाद घेतल्याबद्दल फार आभार तुमचे Happy

बागेश्री, प्रेमात पडले आहे मी तुझ्या लिखाणाच्या. तुफान सुंदर लिहिलं आहेस. काय आवडलं सांगायचं तर वरची पुर्ण गझल पेस्ट करायला लागेल मला. अप्रतिम !

मंदार, ही पण प्रिंट टाकते कुरियर मधे. बघ उशीर झाल्याचा फायदा.