नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

|| श्री

म्हटलं आपण पण जागा घ्यावी म्हणजे इथून कुणी विषयांतर केलं म्हणून हाकलणार नाही.

पण seriously आम्हालाही कधी कधी लिहायचं असतं पण त्याचा काय परीणाम होईल याचा दहा वेळा विचार करावा लागतो. आम्ही नेमकं काय काय करतो, कसं करतो, का करतो हे तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून हा प्रपंच.

इथे खुसखुशीत आणि खमंग वाचायला मिळणार नाही. पण तुम्हाला खुसखुशीत लिहायला आणि खमंग वाचायला मिळावं म्हणून आम्ही केलेली धडपड दिसेल कदाचित. आणि त्याचबरोबर स्वतःचा नोकरीधंदा संभाळुन, घरच्या कामातून वेळ काढून, हितगुजवर चाललेल्या आगी विझवणारे, messages तुम्हाला नंतर सापडावे म्हणून योग्य जागी हलवणारे, तुमच्या प्रश्नांना शक्य असेल तेंव्हा उत्तर देणारे नेमस्तक त्याच्याच / तिच्याच शब्दात तुम्हाला दिसतील.

विषय: 
प्रकार: 

लिहायला सुरुवात करा पटपट!! रंगीबेरंगी पानाबद्दल शुभेच्छा! Happy

नमस्कार!

माझ्या जुन्या रंगीबेरंगी पाना बद्दल यापुर्वी मी विचारले होते. ती पाने पुन्हा मिळवण्यासाठी काय करावे लागेल?

कृपया या मागणीकडे लक्ष द्यावे.

ता. क. नवीन मायबोली वर मराठीत लिहीणे जाम सोपे झालेय ... पण मग अशुद्ध लिखाणासठी नवा वेगळा बीबी काढावा लागेल!!! Happy

>>मग अशुद्ध लिखाणासठी नवा वेगळा बीबी

Proud

धन्यवाद!

मागील लेखन पुन्हा इथे मिळु शकेल का?

आभारी आहे!