वादळाची जात अण्णा

Submitted by अभय आर्वीकर on 17 August, 2011 - 22:35

अण्णा हजारेवादळाची जात अण्णा

माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा
इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला?
भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा

भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा

एक आशेचा उमाळा, शोधताहे देशवासी
चेतना चिंतामणीची, भासते बरसात अण्णा

आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा

                                                - गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------

गुलमोहर: 

खरच. खूप छान. मनापासून आवडलं.

थाट सत्तेचा कसा हा काही केल्या आकळेना
भ्रष्ट नेते मोकळे अन कोठडीच्या आत अण्णा>>>हे किती दुखःद आहे.

आस अण्णा ध्यास अण्णा, अभयतेचा श्वास अण्णा
अग्निलाही पोळणार्‍या वादळाची जात अण्णा>>>>>>>>>हे विशेष आवडलं. अण्णा नावाच वादळ सरकार ला सळो की पळो करून सोडतंय. मस्त रचना मुटेजी.

मुटेजी,आपण फार साधे आहात्,व हीच निर्मळता गझलेत व्यक्त झाली आहे.

बेफिकिर म्हणताहेत त्याप्रमाणे ''भावना पोचल्या''

भ्रष्ट आचारास सत्ता हाच मुख्य स्रोत आहे
घाव घाला मुख्यजागी एकदा द्या मात अण्णा..........पहिल्या मिसर्‍यात वृत्त चुकले आहे.

शुभेच्छा

मीहि कैलासरावांप्रमाणेच लिहिणार होतो काही तांत्रिक बबिंबाबत! पण अख्खा देश पेटवणार्‍यावर, व तेही अहिंसक मार्गाने, ही रचना असल्याने अधिक काही लिहीले नाही. Happy

थाट सत्तेचा कसा हा काही केल्या आकळेना - येथे 'काही'चे 'काहि' कराल काय? Happy

(बाकी 'गझल की कविता की कसीदा' ही चर्चा या रचनेबाबत न झालेलीच बरी!)

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. Happy

कैलासजी, बेफिकीरजी विशेष धन्यवाद.

('गझल की कविता की कसीदा' ही चर्चा आपण नक्किच करू. कारण हे जाणून घेण्याची मला उत्कंठा आहे. पण आता नाही थोड्या कालांतराने.)

भा.पो ?
म्हणजे भारी पोस्ट?
पोस्ट ?
ही पोस्ट आहे?
गझल, कविता, बालकविता, बडबडगीत, ललीत, लेख, किंवा भाकडकथा वगैरे.... यापैकी काहीच नाही? Happy

मुटेजी.
जनसामान्याचे भाव रचनेत शब्दांकीत केले आहेत. सहाजिकच मनाला भिडली. आपली रचना पण जनजागराचाच एक भाग आहे. उत्तम रचनेबद्दल धन्यवाद.

<<<<भा.पो ?
म्हणजे भारी पोस्ट?
पोस्ट ?
ही पोस्ट आहे?
गझल, कविता, बालकविता, बडबडगीत, ललीत, लेख, किंवा भाकडकथा वगैरे.... यापैकी काहीच नाही?>>>>

भावना पोचल्या - असे त्यांना म्हणायचे असावे. Happy

मस्त... खुप आवडले...

विशेशत:

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला?
भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा.. >> अगदीच भावस्पर्शी

छान

खरंच खुप सुंदर गझल.
आणि आपणही अण्णांच्या आंदोलनला पाठींबा द्यायला हवा.आपला मराठी माणूस देश हालवून सोडतोय.
कितीही कोठडीत टाकलं तरी अण्णा झंजावात आहेत.त्याला ही असली बंधने थोडीच रोखु शकणार आहेत.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. Happy

क्षमस्व :
हे.मा.शे.पो - म्हणजे हे माझे शेवटचे पोस्ट
पुलेशू - पुढील लेखनास शुभेच्छा
रच्याक - रस्त्याच्या कडेने
भा.पो - भारी पोस्ट

मायबोलीची ही सांकेतीक भाषा मला माहीत होती.

भा.पो म्हणजे भावना पोचल्या हे आजच कळले.

आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा

मुटेजी,
यात या ओळी खुप आवडल्या ..
Happy