गावाचं घर

Submitted by gajanan mule on 13 August, 2011 - 15:57

गावाचं घर

तुटायची सर
उठायचा दर्वळ
भिजलेल्या ढेकळांना
आठवायची हिरवळ

उगवायचा सूर्य
रांगायचं ऊन
वासूदेवान वाड्याला
ऐकवायची धून

व्हायची दुपार
तपायचं रान
गळणाऱ्या घामाला
रहायचं ना भान

यायची सांज
विरायची धग
सारचं काही
आठवायचं मग

पडायचं चांदणं
लागायचे दिवे
निजलेल्या डोळ्यात
जगायचे थवे

दिवसामागून रात्रीचा
गळायचा प्रहर
शहराच्या मनात
गावाचं घर

गुलमोहर: 

गुरुजी,
प्रतेक कडवं मनाला भिडणारं.

गावच्या घरानी
ओलावा मायेचा,
पाणावलेल्या दोळ्यांमधे
मायेच्या सायेचा.

गावच्या घरानी
ओलावा मायेचा,
पाणावलेल्या डोळ्यांमधे
मायेच्या सायेचा.

छान!:)