सौंदर्य

Submitted by यःकश्चित on 8 August, 2011 - 08:58

सौंदर्य
______________________________
स्वप्नापलिकडले रूप तुझे
डोळा भरुनी वाहताहे
मनी उमलले गर्द गुलाबी
गुलाब तुजला पाहता हे ...........||

गौर वर्ण अन् नील चक्षु हे
नाक चाफेकळी
दंत मोतीवत ओठ मुलायम
जणू गुलाबाची पाकळी ............||

उजळ कांती नितळ त्वचा
शाल रेशमाची
सौंदर्याप्रत तुला न लागो
दृष्ट हि कुणाची.......................!​!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: