=========================
कसे घर बांधता येते तुला ह्रदयात हातांनी ?
तुला नक्कीच आहे घडवले निष्णात हातांनी !
कशाला आंधळा हा चाचपडतो रोज तार्यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी
कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी
ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
मला कळते; तरीही वाटते की तूच सांगावे,
(जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी )
नसू दे स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व आहे की-
बनवल्या ओंजळी नाही उभ्या जन्मात हातांनी !
किती हे पारदर्शी हासणे निद्रिस्त बाळाचे..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी !
जिथे संवादण्याचे संपते सामर्थ्य शब्दांचे,
अशा वेळी धरावे फक्त आपण हात हातांनी..
बनू लागेल आता शस्त्र या प्रत्येक दगडाचे,
सुटू लागेल आता प्रश्न हा रस्त्यात, हातांनी
तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!
-ज्ञानेश.
==========================
व्वा ज्ञानेश ! अप्रतिम
व्वा ज्ञानेश ! अप्रतिम !
>>कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी
खासच.
अप्रतिम. सगळेच शेर कसदार.
अप्रतिम. सगळेच शेर कसदार. मक्ता मनात कोरला गेला. अभिनंदन!
अप्रतिम !! सर्वच शेर सुन्दर
अप्रतिम !! सर्वच शेर सुन्दर !!
ऋणी आहेत काही पापण्या, कायम
ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
नसू दे स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व आहे की-
बनवल्या ओंजळी नाही उभ्या जन्मात हातांनी !.......... अफाट शेर.
तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!........हा सुद्धा क्लास. !!
एकंदर झकास गझल.
चांगला रदीफ निवडला.
चांगला रदीफ निवडला.
सुंदर गझल...
अशक्य ! खूप दिवसांनी ज्ञानेश
अशक्य !
खूप दिवसांनी ज्ञानेश स्ताईल गझल वाचली. आवडली
कुठला शेर सर्वात चांगला हे ठरवणं कठीण आहे. अफाट आहेत सगळेच शेर....
क्या बात है डॉक्टरसाहेब...
क्या बात है डॉक्टरसाहेब... मान गये आपको... अप्रतीम म्हणणे कंजुषी ठरेल... काय म्हणू ???
किल्ले , मुल, ओंजळी , नास्तिक्य ... लाजवाब ... !!!
सलाम !
मला कळते; तरीही वाटते की तूच
मला कळते; तरीही वाटते की तूच सांगावे,
(जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी ) >>> - सुंदर शेर!
तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!>>> जाणवते या शब्दाने मजा आली.
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी>> ही ओळ फार आवडली.
गझल आवडली.
-'बेफिकीर'!
तुमच्या सारख्या श्रेष्ठींना
तुमच्या सारख्या श्रेष्ठींना मी प्रतिसाद द्यावा का, या द्विधेत लिहिते आहे
कमालीची सहज गझल वाटली...
बास, सुचत गेली आणि लिहीती झाली, अशी!
प्रत्येक शब्द, सहज...
कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी
ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी ! >> हे दोन शेर तर अ फा ट!!
कसे घर बांधता येते तुला
कसे घर बांधता येते तुला ह्रदयात हातांनी ?
क्या बात है !!!
कुठे वाळूतले किल्ले, कुठे स्वप्नातले इमले
किती उधळून आलो मी, तुझ्या पश्चात हातांनी
एक से एक शेर आहेत !!
संपूर्ण गझल खासच
अहाहा ! माझी गझलची भूक
अहाहा !
माझी गझलची भूक पूर्णपणे शमली.
प्रत्येक शेर अप्रतीम...
''अप्रतीम '' गझल ...
शेवटचा शेर 'सव्वाशेर'. खास
शेवटचा शेर 'सव्वाशेर'. खास आवडला.!
____________/\________
____________/\________ अफाट.... पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटली.
ऋणी आहेत काही पापण्या, कायम
ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
किती हे पारदर्शी हासणे निद्रिस्त बाळाचे..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी !
जिथे संवादण्याचे संपते सामर्थ्य शब्दांचे,
अशा वेळी धरावे फक्त आपण हात हातांनी..
बनू लागेल आता शस्त्र या प्रत्येक दगडाचे,
सुटू लागेल आता प्रश्न हा रस्त्यात, हातांनी
तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!
हे सर्व शेर अप्रतिम!! तशी सगळी गझलच आवडली पण हे विशेष उल्लेखनीय
ऋणी आहेत काही पापण्या, कायम
ऋणी आहेत काही पापण्या, कायम अशासाठी-
कधीही एकटे ना सोडले दु:खात हातांनी !
व्व्वाह!!! क्या बात है!
या शेरापासूनचे पुढचे सगळे आवडले...
अप्रतिम! मजा आली वाचताना...
शुभेच्छा!
एकापे़क्षा एक सरस शेरांनी
एकापे़क्षा एक सरस शेरांनी सजलेली प्रचंड ताकदीची गझल!
असे काही वाचायला मिळाले की लिहायला हुरूप येतो. दिवसाची सुरेख सुरूवात झाली.
अभिनंदन!!!
हबा ला अनुमोदन...
हबा ला अनुमोदन... नेहमीप्रमाणेच मस्त गझल...
सगळेच शेर सुंदर पण आंधळा, पापण्या, हात हातांनी आणि शेवटचा शेर फार आवडले..
लाडावलेले मूल तर हासिल ए गझल शेर...
हातांनी हा अवघड रदीफ इतक्या सुरेख रितीने निभावल्याबद्दल अभिनंदन
---
अवांतर : माझी नेहमीची तक्रार ... इतक्या चांगल्या गझलला फक्त १७ प्रतिसाद
हे खटकले...
गजल खासच! सगळेच शेर आवडले!
गजल खासच! सगळेच शेर आवडले! नेहमीप्रमाणे!!!
अज्ञात हातांनी फक्त सांभाळले नाहीये तुला मित्रा, तुझ्या शब्दांनाही त्यांचा स्पर्श जाणवतो!
मला कळते; तरीही वाटते की तूच
मला कळते; तरीही वाटते की तूच सांगावे,
(जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी )
हा विशेष आवडला.
...................................................
अवांतर- नागपूर येथील (७ऑगष्ट) गझकनवाझ श्री भिमराव पांचाळे यांच्या गझलेच्या कार्यशाळेत सकस गझल लिहिणारे म्हणून तुमचा उल्लेख झाला होता.
-----------------------------------------
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मनःपूर्वक आभार मानतो.
तसे नास्तिक्य माझे ठाम आहे,
तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !!.....अफाट..खूप छान आहे हा शेर...
कशाला आंधळा हा चाचपडतो रोज तार्यांना ?
कदाचित वाचता येते तयाला रात हातांनी...
हे नाही भावलं... तितक परीणाम करून नाही गेले..जितका इतर शेरांनी कहर केला...:(
नसू दे स्पर्श सोन्याचा, तरीही गर्व आहे की-
बनवल्या ओंजळी नाही उभ्या जन्मात हातांनी !.....हे तर ठेवणीत ठेवावं असं जमलय
मला कळते; तरीही वाटते की तूच सांगावे,
(जसे लाडावलेले मूल नाही खात हातांनी )....मस्त... फार म्हणजे फार आवडले...
किती हे पारदर्शी हासणे निद्रिस्त बाळाचे..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी !
माफ करा पण निद्रिस्त हा शब्द खटकला.. अर्थ जरी योग्य होत असला तरी.. जीवंतपणाला हा शब्द योजणं..जरा कससच वाटत..
संपूर्ण गझल खास ... खूप सुरेख झालिये गझल...
मस्तय
मस्तय
किती हे पारदर्शी हासणे
किती हे पारदर्शी हासणे निद्रेत बाळाचे..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी !
............................................................
असा ही बदलता येईल. निद्रिस्त मलाही खटकला.
बाकी गझल म्हणजे मस्काये भिडू!!!!!
व्वा... अप्रतिम.. एकसे बढकर
व्वा... अप्रतिम.. एकसे बढकर एक शेर सगळे..
क्या बात है!
क्या बात है!
मला गझल कळत नाही........ ....
मला गझल कळत नाही........
.... पण तुम्ही हे जे काय लिहिले आहे त्याने डोळ्यात पाणीच आले बघा.
<< तसे नास्तिक्य माझे ठाम आहे, मात्र जाणवते..
मला सांभाळले आहे कुण्या अज्ञात हातांनी !! >>>
प्रचंड उदंड सुंदर.
प्रचंड उदंड सुंदर.
>>बनवल्या ओंजळी नाही उभ्या
>>बनवल्या ओंजळी नाही उभ्या जन्मात हातांनी !
वाह!
अवघड रदीफ आणि सहज गझल..
एक छोटे तीट लावते.. नजर लागू नये म्हणून.. आणि आपण स्वतःच बार रेझ केलात म्हणून..
कुणी गोंजारते आहे जणू स्वप्नात हातांनी ! - फक्त इथला "हातांनी" नस्ता तरी चालले असते. असल्यानेही फार रसभंग होत नाहीये. आणि अर्थातच तोही शेर सुरेखच..
अतिशय आवडली गझल! सुरेख. आज
अतिशय आवडली गझल! सुरेख.
आज वाचायला मिळाली.
ज्ञानेश... केवळ केवळ अप्रतिम
ज्ञानेश... केवळ केवळ अप्रतिम गजल. काय आवडलं सांगायचं तर अख्खी गजल कॉपी-पेस्टावी लागेल...
आज आता ह्यानंतर काहीही वाचायचं नाही!!
Pages